s-201
| राजपुत्र तो रस अंगाला लावून राजाकडे गेला. |
s-202
| माझी राख माझ्या घरी पाठवा असे त्याने सांगितले. |
s-203
| हजारो लोक तो प्रकार पाहत होते. |
s-204
| चितेवर राजपुत्र निजला. |
s-205
| अग्नी देण्यात आला. |
s-206
| गहरी पेटली चिता. |
s-207
| राजपुत्र जणू शांत झोपला होता. |
s-208
| त्याच्या देहाची राख त्याच्या घरी पाठविण्यात आली. |
s-209
| रात्रीच्या वेळेस तो एक भाऊ ती राख घेऊन बाहेर पडला. |
s-210
| तो सर्प बनला. |
s-211
| राखेचे भांडे तोंडात धरून तो पाताळात गेला. |
s-212
| त्याने शेषाला सारा वृत्तान्त निवेदला. |
s-213
| महाराज, या राखेवर शिंपायला अमृताचे चार बिंदू द्या, सर्प म्हणाला. |
s-214
| हा साप तुझ्याबरोबर अमृतबिंदू घेऊन पृथ्वीपर्यंत येईल, शेष म्हणाला. |
s-215
| एक सर्प या सर्पाबरोबर निघाला. |
s-216
| दोघे पृथ्वीवर आले. |
s-217
| पाताळातील सर्पाने राखेवर अमृत शिंपले आणि तो निघून गेला. |
s-218
| राखेतून राजपुत्र उभा राहिला. |
s-219
| जवळ भाऊही होता. |
s-220
| तो म्हणाला, दादा, जा व राजाला सांगा की, त्याच्या वडिलांना स्वर्गात करमत नाही. |
s-221
| खुशमस्कऱ्याची आठवण येते. |
s-222
| त्याला लवकर पाठवून द्या! |
s-223
| राजपुत्र परत आलेला पाहून सारे आश्चर्यचकित झाले. |
s-224
| राजवाड्यासमोर ही गर्दी! |
s-225
| राजपुत्राने राजाला त्याच्या वडिलांचा निरोप सांगितला. |
s-226
| राजाने खुशमस्कऱ्यास बोलावले व सांगितले, अरे, माझे बाबा तुझी आठवण काढीत आहेत. |
s-227
| जा तू त्यांच्याकडे ! |
s-228
| मी कसा जाऊ? |
s-229
| या राजपुत्रास पाठविले त्याच मार्गाने तूही जा! |
s-230
| लोकांनी टाळ्या पिटल्या. |
s-231
| दुष्टाची बरी जिरली! कोणी म्हणाले. |
s-232
| राजपुत्र लगबगीने आपल्या राजवाड्यात आला व भावंडांना म्हणाला, हा राजा लहरी दिसतो. |
s-233
| वेडपट दिसतो, येथे राहण्यात अर्थ नाही. |
s-234
| चला आपण जाऊ. |
s-235
| रात्री चौघे भावंडे निघाली. |
s-236
| रात्रभर चालत होती. |
s-237
| बरोबर फराळाचे होते. |
s-238
| सकाळी प्रातर्विधी करून सर्वांनी फराळ केला. |
s-239
| ती पुन्हा चालू लागली. |
s-240
| तो एक भाऊ म्हणाला, दादा, मला निरोप दे! |
s-241
| मी जातो! |
s-242
| मला कंटाळलास? |
s-243
| दादा, मी साप होतो. |
s-244
| तुम्ही माझी भूक शमविण्यासाठी मांडीचा तुकडा कापून फेकलात. |
s-245
| तुमचे उपकार फेडावे म्हणून तुमचा काही दिवस मी भाऊ झालो. |
s-246
| आम्ही सापही केलेले उपकार स्मरतो. |
s-247
| येतो दादा, सुखी व्हा! असे म्हणून तो भाऊ साप बनला व थोड्या अंतरावर फण् फण् करीत निघून गेला. |
s-248
| थोड्या अंतरावर दुसरा भाऊ म्हणाला, दादा, मलाही निरोप दे! |
s-249
| का रे जातोस? |
s-250
| दादा, मी तो बेडूक. |
s-251
| सापाला मांडीचा तुकडा कापून देऊन माझे प्राण तुम्ही वाचविले. |
s-252
| तुमचे उपकार फेडण्यासाठी मी तुमचा भाऊ बनलो. |
s-253
| असे म्हणून तो भाऊ बेडूक बनला व टुणटुण उड्या मारीत निघून गेला. |
s-254
| पुन्हा थोड्या अंतरावर बहीण म्हणाली, दादा, मलाही निरोप दे! |
s-255
| तूही चाललीस? |
s-256
| पाडसे वाट पाहत असतील. |
s-257
| मी ती हरिणी. |
s-258
| तू माझ्यावर बाण सोडणार होतास; परंतु तुझे मातृप्रेम जागे झाले. |
s-259
| तू मला मारले नाहीस. |
s-260
| तुझे उपकार फेडायला मी बहीण झाले. |
s-261
| आता जाते. |
s-262
| सुखी हो. |
s-263
| असाच दयाळू-मायाळू हो! |
s-264
| बहीण हरिणी बनून कृतज्ञतेने मधून मधून मागे बघत वाऱ्याप्रमाणे पाडसांकडे पळत गेली. |
s-265
| राजपुत्र आता एकटाच राहिला. |
s-266
| विचार करीत तो निघाला. |
s-267
| पशु-पक्ष्यांतही केवढी कृतज्ञताबुद्धी! असे त्याच्या मनात येत होते. |
s-268
| मग माणसाने किती चांगले असले पाहिजे, असा विचार त्याच्या मनात आला आणि या विचारात तो आपल्या घरी आला. |
s-269
| पहाटेची वेळ होती. |
s-270
| मुलगा गेल्यापासून राणीला झोप येत नसे. |
s-271
| ती गच्चीत उभी होती. |
s-272
| देवाला प्रार्थना करत होती. |
s-273
| कोण आहे? |
s-274
| पहारेकऱ्यांनी दरडावले. |
s-275
| मी राजपुत्र. |
s-276
| माझा बाळ! |
s-277
| माझा बाळ! |
s-278
| म्हणत राणी धावतच खाली आली. |
s-279
| तिने राजपुत्राला हृदयाशी धरले. |
s-280
| राजाही आला. |
s-281
| पुत्र पित्याच्या पाया पडला. |
s-282
| शहाणा होऊन आलास? राजाने विचारले. |
s-283
| होय तात! |
s-284
| तो नम्रतेने म्हणाला. |
s-285
| राजाने राजपुत्राला गादीवर बसविले. |
s-286
| त्याचे लग्नही करून दिले. |
s-287
| राजा-राणी मुलाला व सुनेला आशीर्वाद देऊन तपश्चर्येसाठी वनात निघून गेली. |
s-288
| नवीन राजा-राणी उत्कृष्ठ राज्यकारभार चालवू लागली. |
s-289
| सारी प्रजा सुखी झाली. |
s-290
| तुम्ही आम्ही होऊया. |
s-291
| गोष्ट आमची संपली. |
s-292
| शेरभर साखर वाटली |
s-293
| हवामान आज चांगले आहे, खूप गरम आहे. |
s-294
| पण काल खूप गार होते! |
s-295
| ते तेंव्हा बाहेर खेळू शकले नाहीत. |
s-296
| जेम्स एक लहान मुलगा आहे आणि तो सहा वर्षाचा आहे. |
s-297
| ती छोटी मुलगी त्याची बहीण आहे, ती पाच वर्षाची आहे. |
s-298
| जेम्सचा एक छोटा कुत्रा आहे, कुत्रासुद्धा आता बागेत आहे. |
s-299
| त्या कुत्र्याला ह्या दोन मुलांशी खेळायला आवडते. |
s-300
| कुत्रा आता खूप खुश आहे. |