Dependency Tree

Universal Dependencies - Marathi - UFAL

LanguageMarathi
ProjectUFAL
Corpus Parttrain

Select a sentence

Showing 1 - 100 of 373 • previousnext

s-1 एक होता राजा.
s-2 त्याला एक मुलगा होता.
s-3 एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करित.
s-4 परंतु लाडामुळे तो बिघडला.
s-5 राजा मनात म्हणाला, 'याला घालवून द्यावे.'
s-6 'टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.'
s-7 राजाने राणीला हा विचार सांगितला.
s-8 आज ना उद्या सुधारेल तो.
s-9 'नका घालवू त्याला दूर!' ती रडत म्हणाली.
s-10 'तुम्हा बायकांना कळत नाही.'
s-11 'आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे,' तो म्हणाला.
s-12 राणी काय करणार, काय बोलणार?
s-13 रात्रभर तिला झोप आली नाही.
s-14 सकाळी राजा मुलाला म्हणाला, राज्यातून चालता हो.
s-15 आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये!
s-16 तुमची आज्ञा प्रमाण, असे म्हणून पित्याच्या पाया पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला.
s-17 तो आईच्या पाया पडला.
s-18 आईने त्याला पोटाशी धरले .
s-19 हे घे चार लाडू .
s-20 भूक-तहानेचे लाडू, ती म्हणाली.
s-21 आईचा आशीर्वाद घेऊन, ते लाडू घेऊन, धनुष्यबाण आणि तलवार घेऊन तो निघाला.
s-22 पायी जात होता.
s-23 दिवस गेला, रात्र गेली.
s-24 चालत होता.
s-25 थकल्यावर दगडाची उशी करून वडाखाली झोपे.
s-26 त्याला भूक लागली.
s-27 त्या लाडूंची त्याला आठवण झाली.
s-28 एक झरा खळखळ वाहत होता.
s-29 हातपाय धुऊन तेथे बसला.
s-30 त्याने एक लाडू फोडला तर आतून एक रत्न निघाले.
s-31 त्याला आनंद झाला.
s-32 आईला किती चिंता ते मनात येऊन त्याचे डोळे भरून आले.
s-33 लाडू खाऊन, पाणी पिऊन तो पुढे निघाला, तर त्याला एक हरिणी दिसली.
s-34 तिच्याभोवती तिची पाडसे खेळत होती.
s-35 राजपुत्राने धनुष्याला बाण लावला.
s-36 तो त्या हरिणीला मारणार होता; परंतु त्याला स्वतःची आई आठवली.
s-37 माझी आई मला, तशी ही हरिणी या पाडसांना.
s-38 त्याचे हृदय द्रवले.
s-39 त्याने बाण परत भात्यात ठेवला.
s-40 तो पुढे निघाला.
s-41 काही अंतर चालून गेल्यावर मागून कोणीतरी माणूस येत आहे, असे त्याला वाटले.
s-42 एक स्त्री येत होती.
s-43 साधीभोळी , निष्पाप दिसत होती.
s-44 तो थांबला.
s-45 ती स्त्री जवळ आली.
s-46 कोण तुम्ही, कुठल्या?
s-47 या रानावनातून एकट्या कुठे जाता?
s-48 मी तुझी बहीण होऊ इच्छिते.
s-49 मला नाही म्हणू नकोस, ती म्हणाली.
s-50 ये माझ्याबरोबर .
s-51 भावाला बहीण झाली. तो म्हणाला.
s-52 दोघे जात होती.
s-53 दोघांना भूक लागली.
s-54 एका खळखळ वाहणाऱ्या झऱ्याच्या काठी दोघं बसली.
s-55 त्याने एक लाडू फोडला.
s-56 त्यातून पुन्हा एक रत्न निघाले.
s-57 अर्धा अर्धा लाडू दोघांनी खाल्ला.
s-58 इतक्यात केविलवाणा शब्द कानी आला.
s-59 एका सापाने बेडकाला तोंडात धरले होते.
s-60 बेडूक वाचवावा तर सापाची भूक कशी शमवायची?
s-61 राजपुत्र जवळच्या तलवारीने मांडीचे मांस कापून सापाकडे फेकले.
s-62 तो लाल तुकडा पाहून बेडकाला सोडून साप तिकडे धावला.
s-63 बेडूक टुणटुण उड्या मारत गेला.
s-64 भावाची रक्तबंबाळ झालेली मांडी पाहून बहिणीचे डोळे भरून आले.
s-65 ती पटकन कुठेतरी गेली आणि पाला घेऊन आली.
s-66 तिने त्या पाल्याचा चोळामोळा करून तो पाला आपला पदर फाडून जखमेवर बांधला.
s-67 दोघे पुढे जाऊ लागली.
s-68 तो पाठीमागून कोणी येत आहे असे त्यांना वाटले.
s-69 दोघे थांबली.
s-70 एक तरुण येत होता.
s-71 कोण रे तू?
s-72 कुठला?
s-73 रानावनात एकटा का? राजपुत्राने विचारले.
s-74 मला तुमचा भाऊ होऊ दे, तो म्हणाला.
s-75 ठीक, हरकत नाही, राजपुत्र म्हणाला.
s-76 तिघे चालू लागली.
s-77 तो आणखी एक तरुण धावत आला.
s-78 तू रे कोण? राजपुत्राने विचारले.
s-79 मला तुमचा भाऊ होऊ दे.
s-80 नाही म्हणू नका.
s-81 तोही म्हणाला.
s-82 राजपुत्राने त्यालाही आपल्याबरोबर घेतले.
s-83 ती चौघे जात होती.
s-84 सर्वांना भुका लागल्या.
s-85 दोन लाडू शिल्लक होते.
s-86 एका सरोवराच्या काठी चौघे बसली.
s-87 राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले.
s-88 त्यांतूनही दोन रत्ने बाहेर निघाली.
s-89 अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला.
s-90 सर्वांना ढेकर निघाली.
s-91 आईच्या हातचा लाडू, त्याने नाही तृप्ती व्हावयाची तर कशाने?
s-92 जवळच एक शहर दिसत होते.
s-93 प्रासादांचे , मंदिरांचे कळस दिसत होते.
s-94 राजपुत्र दोन भावांना म्हणाला, त्या राजधानीत जा.
s-95 ही रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा.
s-96 तेथे नोकरचाकर ठेवा आणि हत्ती, घोडे विकत घ्या.
s-97 घोडेस्वार तयार करा.
s-98 मला सन्मानाने मिरवत नेण्यासाठी या!
s-99 दोघे भाऊ त्या नगरीत गेले.
s-100 दोन रत्ने त्यांनी विकली.

Text viewDownload CoNNL-U