mar-15
mar-15
View options
Tags:
Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.
हे लिखाण म्हणजे तुझ्या बाबाना उत्तम श्रद्धांजली . एवढ्या परीपक्व विचारांची उंची मुलीनी गाठल्यावर या जगाचा निरोप घेण , खरच परीपूर्ण जीवन . ग्रेट .
आमची जळ्ळी ना कुठे आहे ? आणि कशाला असेल ?
तुम्ही उल्लेख केलेली गज़ल मात्रावृत्तात आहे . पहिल्या दोन शेरांमधील मात्रा पाहू :
middle overs मधे spinners operate करत असताना मधे पठाण ला फ्री license देऊन सोडायला काय हरकत आहे ? इम्रान ताहिर किंवा peterson खेळत असताना मोकाट सुटलेला पठाण बघायला प्रचंड मजा येईल . > > > > > > मन की बात केलीस असाम्या ! ! ! ! काल आपल्या दोन विकेट्स झटपट गेल्या तेव्हा वाटून गेलं की पठाणला वर पाठवला तर प्रेशर एकदम कमी करुन टाकेल . तेव्हा मिड ओवर्स नव्हत्या सुरु हे मी जाणतो पण तू मांडलाय तो मुद्दा म्हणजे त्याला फ्री लायसन्स देऊन पाठवणे हा मला फार भारी वाटतो . पहिल्या बॅटिंगला तर हे फार उपयोगाला येऊ शकतं ! प्रतिस्पर्धी संघाच्या आत्मविश्वासाची पार वाट लागून जाते हे " युसुफमियां " सुरु झाले की . काल पण काय हाणल्या सिक्स ! ! ! ! जास्त ताकद ही लावताना दिसत नाहे म्हणजे टायमिंग पण भारी आहे त्याचं . चालताना पण एकदम गुर्मीत चालतो , जबरी बॉडी लँगव्जेज एकदम .
जणुं व्याधासाठीं जखमी वाघीण जाळींत टपली होती ॥
जेंव्हा तुम्ही एकाद्या वैयक्तीक अनुभवाबद्दल कथा लिहिता तेंव्हा चांगली लिहिता . म्हणजे भावना वै . छान व्यक्त होतात .
मुंबई - आदर्श सोसायटी गैरव्यवहारात सहभाग असल्याच्या संशयावरून मुंबई विभागाचे माहिती आयुक्त रामनंद तिवारी आणि मानवाधिकार आयोगाचे सदस्य सुभाष लाल यांना राजीनामा देण्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आदेश दिला असल्याचे समजते . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नगरविकास खात्याचे तत्कालीन सचिव रामानंद तिवारी आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव सुभाष लाल यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या दोन दिवसात राजीनामा देण्याचा आदेश दिला असल्याचे कळते . निवृत्त झाल्यावर तिवारी यांची मुंबई विभागाचे माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती . तर लाल यांना मानवाधिकार आयोगाचे सदस्यपद बहाल करण्यात आले आहे . दोन्ही अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला नाही , तर त्यांना निलंबित करण्यात यावे , असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे अंतर्गत सूत्रांनी सांगितले आहे . दरम्यान , आदर्श प्रकरणी दोन सनदी अधिकाऱ्यांना राजीनामा देण्यात सांगण्यात आल्याने आदर्श गृहनिर्माण सोसायटीशी संबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . येत्या काही दिवसात आणखी काही अधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचा आदेश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .
भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी । कर कटेवरी । ठेवोनिया । ।
ऍक्रेलिक ऑन कॅनव्हास आहे . ऑपेक कलर त्याच्या चित्रात येक सहजता असते , बघताना खुप सोप्पे वाटते पण कॉपी करायच म्हटले तर महा कठीण
मुंबई - & nbsp पाणीवाटपाचा 1960 पासून असलेला प्राधान्यक्रम बदलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून , आता पिण्याचे पाणी , शेती व नंतर उद्योग असा प्राधान्यक्रम राहील , हा निर्णय क्रांतिकारी व ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधान परिषदेत केले . महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण विधेयकावर सत्तारूढ आघाडीतर्फे दुरुस्ती सूचना मांडली जावी म्हणून आज विधान परिषदेचे कामकाज सहा वेळा 13 ते 30 मिनिटांसाठी स्थगित करावे लागले . अखेर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी , " राज्य मंत्रिमंडळ क्षेत्रीय वाटप निर्धारित करील ' ही दुरुस्ती सूचना मांडली आणि सभागृहाने ती एकमताने मंजूर केली . दुरुस्ती सूचनेमुळे विधान परिषदेत या विधेयकाच्या संमतीचा मार्ग सुकर झाला . मूळ विधेयकात हे अधिकार उच्चाधिकार समितीला राहतील , अशी तरतूद होती . आतापर्यंत पिण्याचे पाणी , उद्योग व मग शेती हा प्राधान्यक्रम होता आता तो बदलण्याचा निर्णय घेण्यात आला . शासनाला उद्योग नकोत , असा याचा अर्थ नाही पण उद्योगांना सांडपाणी शुद्ध करून वापरावे लागेल .
सुवर्णाचे पाच प्रकार भारतीय रसायनशास्त्रज्ञांनी मानले आहेत . त्यापैकी ३ दैवी आहेत . चौथा हा खनिजात सापडणरा , जो सध्या वापरात आहे . व पाचवा म्हणजे पार्या पासून बनवलेले सोने . जाम्बुनद हे पहिल्या ३ प्रकारातील सोने असावे . कदाचित ते पृथ्वीच्या क्रक्स मध्ये असेल . ( हा अंदाज आहे ) . पण जाम्बुनद हा शब्द , जांभळ्या रंगाचे सुवर्ण असलेल्या नदीशी संबंधित आहे . . .
वरील प्रश्नांची मी माझ्याकरता उत्तरे देता वैयक्तीक पातळीवर मला स्वत : ला स्त्री म्हणून मुक्त वाटते . आजकाल बर्याच मोठ्या शहरांमध्ये कमीअधिक प्रमाणात सुसंस्कृत , सुशिक्षीत घरांमधल्या मुलींचेही हेच मत असेल . पण तेच आपण शहरांकडून गावांकडे आणि गावांकडून खेड्यांकडे , मुक्त विचारांच्या कुटुंबांकडून कंझर्व्हेटिव्ह विचारसरणींच्या कुटुंबांकडे , काही लोअर इन्कम कुटुंबांकडे ( ह्या सगळ्यांमध्ये अपवादही असतात हे ही लक्षात घ्यावे ) जायला लागल्यावर चित्र बर्याच प्रमाणात पालटत असल्याचे दिसून येते . स्त्रीचा आयुष्यात लग्न करणे , मुले निर्माण करणे , त्यांचे संगोपन करणे , घर सांभाळणे , मोठ्याची सेवा कारणे ह्याच गोष्टी असतात ही भावना असते , किंबहुना त्याशिवाय त्यांचे काही विश्व असू शकते ही जाणिवही नसते . मी आणि माझ्या सारख्या इतर मैत्रीणी वैयक्तीक पातळीवर जरी स्वतःला मुक्त समजत असलो तरी आमच्या इतर असंख्य भागिनींना असे काही असते ह्याची कल्पनाही नसते . तो बदल घडवून आणण्याकरता , आत्मविश्वास वाढवण्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मुलींचे शिक्षण आणि त्यांना स्वावलंबी होण्यास मदत करणे . शिक्षाणाने किती नवनवीन दालने उघडू शकतात ह्याची त्यांना जाणीव करुन देणे .
अरे कुणीतरी कॅरॅमल कस्टर्डचा फोटोही इथे अवश्य द्या रे ! : )
अभ्याअसक्रम सोपा केल्याने संख्या वाढते , पण सकसपणा नाही वाढत . आजचा हा आनंदीआनंद , उद्याच्या बेकारीचे रडगाणे होणार आहे , याचा विचारच नाही . एका भाकरीसाठी जेव्हा अनेक वारसदार असतात , आणि त्यांच्या हक्का साठी सोपी स्पर्धा घेतली जाते , तेवा सगळेच जिंकणार आणे शेवटी युद्ध होणार , आणि त्यात कोणाचेच पोट भरणार नाही .
हे एक स्कॉटलंड येथचा सतराव्या शतकातला साम्राज्यवादी तत्वज्ञानी , डेव्हिड ह्युम याच्या सारखे वाटतात . कारण तो म्हणत असे की , ' गणित आणि तर्कशास्त्र या शिवाय जगात ज्ञान नाही . . . . ' तो असेही म्हणत असे की तुम्ही एखादे तत्वज्ञानावरील पुस्तक उचलले आणि त्यात गणित किंवा तर्क नसेल तर ते लगेच जाळून टाकले पाहिजे . उपक्रमावरील अनेक तथाकथित गर्वीष्ठ विज्ञानवादी अशाच प्रकारे चर्चा / वर्तन करतांना मला दिसून येतात .
हां ! भाइजान जाते हुवे वो इटलीच्या राजिंदरा कोबी घेवून जा बर्का ! लई कामाला येईल तुमाले तो वकील म्हनून् !
३ . तू तांडेल , मी तांडेल , तर घमत कोण सांडेल ? ही म्हण मी फक्त त्या पुस्तकातच वाचली . . पण मानवीस्वभावास लागू पडेल अशीच आहे . तांडेल म्हणजे छोट्या नावेचा कप्तान . आणि घमत म्हणजे समुद्राचं नावेत झिरपून येणारं पाणी . हे पाणी काही काळानं काढून टाकावं लागतं , नाहीतर घमत साठून साठून नाव बुडण्याची वेळ यायची . घमत काढण्याचं काम खलाशी / तत्सम खालच्या दर्जाचे लोक करतात . तर काही कारणांनी दोन बुडित तांडेलांनी एकत्र येऊन एक नाव घेतली व व्यवसाय सुरू केला . बाकी सगळं ठीक चालं होतं , पण नावेत घमत साठणं चालूच होतं . नावेवर दोघेच असल्याने दोघांचीही " मी तांडेल आहे , घमत काढणार नाही " अशी जुंपली . परिणामी नाव समुद्रात बुडाली . खोट्या प्रतिष्टेच्या कल्पनांना बळी जाऊन लोक स्वतःचा र्हास होत असेल तरी त्यांना त्याची पर्वा कशी नसते , यासाठी हे म्हण अगदी चपखल उदाहरण आहे .
उमेदवार मुस्लीम असण्यावर मूळ प्रतिसादकर्त्यांचा आक्षेप नसावा . तो मुस्लीम लीगचा असण्यावर असावा .
आनंद व माझी सुरवातीलाच चांगली मैत्री बनली व तो माझ्या बरोबर कधी गंगेच्या तीरावर तर कधी बिर्ला मंदिरामध्ये . . . तर कधी वेळ मिळालाच तर लक्ष्मण झुल्यावर फिरु लागला , शर्माजी व माझी आध्यात्मिक जोडी छान जमली व तेथेच पहील्यादां रामायण ही वाचले व महाभारत ही , तसेच अनेक . . कथा त्यांच्या सोबत वाचल्या , राजीव जी संस्थे मध्ये मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांच्या आज ईकडे उद्या तिकडे अशा वा - या चालतच असत , माझा हरिद्वारचा स्नेह बंध असा बांधला गेलाच होता पण त्यावर मानाचा तुरा खोवला तो राजीव जींनी एक दिवस एक बातमी घेऊनच ते कार्यालयात आले व मला बोलवले " राज , कल से तु अपने एक स्नेही श्री निरंजन जैन जी के यहां जायोगे तथा उन का एक कॊलेज है यहा रुडकी में तुम वहा काम करना ठीक है कल मैं तुम्हे एक पत्र के साथ वहा भेजूंगा लेकिन सुबह जल्दी जाना होगा करीब ६ . ०० बजे तुम्हे वह अपने कार्यालय में मिलेंगे . " वाह माझ्या तोंडातून दुसरे काहीच बाहेर पडले नाही व मी सकाळ सकाळी तयार होऊन जैन साहबांच्या कार्यालयात ५ . ५० लाच पोहचलो व त्यांचा फायदा देखील मला त्याच वेळी झाला व त्यांना माझ्या वेळेत कामावर येण्याबद्दल सागण्याची गरजच राहीली नाही . मी तेथे काम करु लागलो प्रथम प्रथम कार्यालयातीलच छोटे छोटे काम मला दिले गेले जसा एक चपराशी पण मी काही कुरकुर न करता काम करु लागलो दिवसामागून दिवस जात होते अशीच चार महिने गेली एक दिवस मी थोडा वेळ मोकळा होता म्हणून कार्यालयातल्याच संगणकावर बसून गेम खेळू लागलो कसा वेळ गेला कळालेच नाही पण त्याच वेळी जैन साहेब हे माझ्या पाठीमागे उभे राहीले होते , त्यांनी माझी गेम संपल्यावर मी जसा उठलो तसेच ते बोलले " राज जैन , आप मेरे साथ थोडी देर बात करोगें अभी " त्यांचा दरारा मला माहीतच होता मी नखशिखांत हादरलो होतो दरदरुन घाम फुटला होता व मी विचार करतो होतो आता काय उत्तर द्यायचे ह्यांना व नंतर काय सांगायचे राजीव जींना ज्यांनी आपला शब्द टाकून मला येथे कामावर लागले होते .
राहुल गांधीला देशाचा नेता बनवण्यात काँग्रेसपेक्षा काँग्रेसच्या विरोधकांनाच जास्त विण्टरेष्ट दिसतो आहे .
त्या रात्री पॉवेलनी मुशर्रफना फोन लावला . त्यावेळी कराचीला सकाळ झाली होती आणि मुशर्रफ राजभवनला एका बैठकीत होते . पॉवेलनी त्यांना बैठकीतून बाहेर बोलावले . पॉवेल अगदी स्पष्टपणे बोलले आणि त्यांनी आदल्या दिवशीचा आर्मिटेज यांनी अहमदना दिलेला संदेशच दिला : तुम्ही एक तर आमच्याबरोबर आहात किंवा आमच्या विरुद्ध ! मुशर्रफना तर तो निर्नाणीचा प्रश्नच वाटला . ते म्हणाले कीं पाकिस्तान दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिकेच्या बाजूने असून ती लढाई पाकिस्तान अमेरिकेच्या बाजूने लढेल . त्यांच्या दुसर्या कुटल्याही तडजोडी झाल्या नाहींत .
हा लेख विरंगुळा / मनोरंजनासाठी असल्याने तसेच कुणाच्या भावना दुखावण्यासाठी नसल्याने , त्याच प्रकारात केवळ गंमत म्हणून ही कॉमेंट धरावीत .
श्वासांचं गुदमरणं काही नवीन नाही आताशा तू मनात नुसता डोकावलास जरी . . तरी एक मोठ्ठा आवंढा घशात . . . आणि मनाची उलाघाल थेट डोळ्यांपर्यंत . . . . वर्तमानातल्या प्रत्येक गोष्टीला तुझ्याशी रिलेट करणं . . . . आपसूकच ! ! पण तू कुठेच नसल्यामुळे आलेलं रितेपण . . . असंच गुदमरतं . . . . व्यक्तच होता येत नाही त्याला . अधून मधून स्वप्नांचं खेळणं येतं मदतीला खेळत बसते तास् न् तास अगदी भान हरपून . . . . तुझ्याशीच असतो डाव मांडलेला पण जिंकणार तूच . . . मी मात्र तुझ्या विजयावर कायम खुश . . . तुझ्या जिंकण्याचं मला नेहेमीच कौतुक वाटतं . तुझ्यावर विजय मिळवावा असं कधी वाटलंच नाही मला पण . . . . एकदा तरी मलाही जिंकू दे ना . . . . मी जिंकल्यावर कधी तरी टाळ्या वाजव . . . अगदी मनापासून . . . मलाही आवडेल रे ते . . . . ! ! . . . राहिलं . . . . असू दे . पण खेळ नको संपवूस रे . . . मला खेळायचंय तुझ्यासोबत . तुझ्या प्रत्येक विजयी खेळीचा भागीदार व्हायचंय प्लीज . . . . . . कंटाळलास का रे . . . नाही त्रास देणार मी तुला . . . नाही बोलावणार खेळायलाही पण . . . . मला सांग . . तुला मी आठवेन ना रे . . . . खूप खूप दूर गेल्यावरही . . . कधी तरी . . . एकदा तरी . . .
मराठ्यांच्या युद्धतंत्राचे यथार्थ आकलन ग्रॅंट डफनेही प्रगट केले आहे ः " " मराठ्यांचे सामान म्हटले म्हणजे , थोडीशी कांदाभाकरी व एक घोंगडी एवढेच काय ते असे . रात्री कोठे उतरणे , तर ते घोड्याचे लगाम हातात धरूनच घोंगडी पसरून त्यावर काही वेळ अंग टाकून राहत . त्याचप्रमाणे दिवसा दोन प्रहरी काही खाण्याकरिता किंवा ऊन टाळण्याकरिता ते उतरले , म्हणजे पाच - पाच , सहा - सहा जण एखादे झाड असेल , तर त्याच्या छायेखाली उतरत ; परंतु उघडे मैदानच असले , तर ते जमिनीत भाले रोवून , त्यांस आपले घोडे बांधून , भाल्यांचे टोकावरून एखादी घोंगडी आडवी पसरून देत व तिच्या लहानशा छायेत फक्त डोकी ठेवून बाकी सर्व अंगास दुपारचे जबर ऊन लागत असतानाही जमिनीवर घोरत पडलेले आढळत . आपल्या तलवारी मात्र ते कुशीशी ठेवत . त्यांच्याजवळ उंट , बैल वगैरे काही नसून , फक्त लहान , खुजे , चपळ , कंटक असे तट्टे असत . मिळालेली लूट त्यांवर लादून त्यांना फार जलदीने लांबवीत . येणेप्रमाणे मराठ्यांची फौज अगदी सुटसुटीत असल्यामुळे मिजासी व काही अंशी बेकैद अशा बादशहाच्या फौजेस तिच्या पाठलाग करणे कठीणच पडे . त्यातूनही ती कधी गाठली जाऊन तिचा पराभव झालाच , तरे तिचे नुकसान ते काय होणार व तिचे सामानसुमान मोगलांचे हाती काय लागणार ? उलट मोगल फौजेचा पराभव झाला , म्हणजे लुटीने मराठ्यांची चंगळ उडून मोगलांचे हाल होत . "
धोंडू : मी सांगतो . आपण एक गुप्त गंमत करार करु . तुम्ही आमचा " धोंडू बाम " वापरत असालच . त्याचा शब्द गाण्यात वापरा . मग आम्ही आक्षेप घेवू . म्हणजे तुमची जाहिरात होईल . मग तुम्ही आम्हाला फुकटात मलई द्या म्हणजे मलईखा पोरा हीला आमच्या " धोंडू बाम " च्या जाहिरातीत फुकटात वापरू द्या म्हणजे आमची जाहिरात होईल . कशी वाटली आयडीया ?
डॅफोडिल्स , वारली पेंटिंग्जचे मग्ज खूऽप आवडले . कृपया इथे मायबोलीवर वारली आर्टचे वर्ग घ्या . ( मी आत्ताच नाव नोंदवते . )
माझा इंटरव्ह्यू सकाळच्या सत्रात होता . . सकाळी सकाळी सजून UPSC च्या दरवाज्यातून आत शिरलो . आजपर्यंत ह्या गेटला फक्त आसुसल्या नजरेने बघत आलो होतो . आत येवून एका हॉलमधे आम्हाला गोलाकार टेबलांभोवती , इंटरव्ह्यू बोर्डप्रमाणे बसवण्यात आलं . मला श्री . चलम ह्यांचा बोर्ड होता . एक बोर्ड सहा जणांच्या मुलाखती घेणार , आणि माझा नंबर पाचवा . . ऑब्व्हियसली , टरकत होतीच . . . शेवटी माझा नंबर आला . आधीच्याचा इंटरव्ह्यू सुरु असतांनाच तुम्हाला बोलावून बाहेर बसवतात . मी बाथरुममध्ये जावून , सगळी ताकत लावून हलका होवून आलो . काही लोक एकदम " कूल " बनत होते . आपण टेंस होतो ब्वॉ . . . बोलावणं आलं . .
हे भन्नाटेस्ट घर आहे , हे हत्तीच्या आकाराचं घर , ज्याला चाकं आहेत . . ते चालू शकतं आणि तुम्ही किल्लीने लॉक उघडलं की चाक वेगळि होतात आणि हत्तिला जे वरती पंख दिस्ताय्त ना त्यांनी हे घर उडु शकतं . . हत्तिच्या पोटात टॉफींचा साठा आहे . . . आणि जर कोणि शत्रु आले तर hidden पाण्याचा मारा आहे हत्तीच्या सोंडेमधुन आणि गंमत म्हणजे ह्या घराला हि - यांचं फेन्सिंग आहे : )
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे ( माकपा ) दिवंगत नेते ज्योती बसू यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमास केंद्र सरकार आणि कॉंग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणून अर्थमंत्री प्रणब मुखर्जी कोलकात्यात जाणार आहेत .
> > ही माझी खाजगी जागा आहे . इथे दुसरेच लोक एकमेकांशी भांडत आहेत , हे चालणार नाही . माझ्याशी भांडलात तर चालेल . धन्यवाद .
युरोपचा इतिहास साक्षीदार आहे की फासिझमच्या आणि नाझी तत्वज्ञानाच्या वाढीला इंग्लंड आणि फ्रांस या " लोकशाहीवादी " राष्ट्रांनीच फार मोठे खतपाणी दिलेले आहे . हिटलर आणि मुसोलिनी यांच्या सुरुवातीच्या आक्रमक आणि अत्याचारी राजकारणाकडे दीर्घकाळ डोळेझाक करण्याचे धोरण इंग्लंड , फ्रांस आणि अमेरिकेने स्वीकारलेले होते . तो भस्मासुर जगाचा ग्रास करील एवढे अक्राळविक्राळ रूप धारण करून उभा राहिला त्यामुळे त्या पापाची जबाबदारी इंग्लंड , फ्रांस आणि अमेरिकेने स्वीकारणे भाग होते . याचा दुसरा अर्थ असा की जे रोज लोकशाहीच्या नावाने जप करतात ते लोकशाहीवादी असतीलच असे नाही . हिटलर आणि मुसोलिनी दोघेही कम्युनिस्ट विरोधात होते , त्यामुळे युरोप मधून क्म्युनिस्टांचे उच्चाटन झाले तर इंग्लंड आणि फ्रांसला आनंदाच्या उकळ्याच फुटणार होत्या ना , त्यामुळे मुसोलिनीने अॅबिसिनियावर केलेले आक्रमण आणि हिटलरने र्हाईनलँडमध्ये घुसविलेल्या सेना इंग्लंड आणि फ्रांसने मिळून रोखण्याचे प्रयत्न केले असते तर सुरुवातीलाच हिटलरच्या महत्वाकांक्षेला लगाम बसला असता ( हे वाक्य खुद्द चर्चिलचे आहे , माझे नव्हे . . . ) . मात्र हां . . . इथे हेच चर्चिल महाराज हे त्यावेळी तसे का घडले नाही याचे उत्तर मात्र देत नाही , त्याला कारण असे की युरोपात वाढत्या कम्युनिझमचा नायनाट करण्यासाठी नाझीचा उदय आणि फासिझामचा फैलाव हे हत्यार चांगले आहे असे ह्या आपले साम्राज्य जतन करण्याची इच्छा असणार्या चर्चिलसारख्या लोकशाहीवाद्यांना वाटत होते . एक असूर दुसर्या असुराचा नाश करत आहे हे यांना टेम्स नदीकाठी मासेमारी करत पाहायला त्यावेळी आवडलेच होते . चर्चील सारख्या धूर्त लोकांच्या पुतना मावशी - प्रेमाचे गोडवे गाण्यापूर्वी हेही लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे की हिटलरनेसुद्धा जर्मनीत निवडणुका लढविल्या होत्या त्यादेखील संसदीय लोकशाहीने जनतेचे प्रश्न सोडविण्यात दाखविलेले अपयश याच मुद्द्यावर . पहिल्या महायुद्धात झालेली आपल्या देशाची मानहानी आणि त्यात ज्यु जमातीविषयी त्याच्या मनात खदखदणारा संताप या दोन बाबी त्याची पाठराखण करणार्यांना पुरेशा होत्या .
पुण्यात आल्यावर एक कल्पना डोक्यात भुंगा घालू लागली . जमीनीत मिळालेली मूर्ती . तिथे मिळाली , पुण्यात आपण का मिळवू नये ? आपण ती मिळवूच . आता ती जमीन खणतांना सापडण्यात मजा नव्हती . ती सर्वांसमोर जमिनीतून वर आली पाहिजे . तेही सोपे होते . न्युमॅटिच जॅक . पूर्व प्रसिद्धी . एक बर्यापैकी लोकप्रिय महाराज गाठून त्यांना साक्षात्काराची प्रेरणा व्हावयास पाहिजे होती . आमच्या मित्रमंडळीत एकाने ही जबाबदारी स्विकारली . माझा पुण्याजवळ एका टेकडीवर मालकीची जमीन होती . रस्त्यापासून जरा आंत . सुरवातीला भक्तांना थोडे कष्ट पडणे गरजेचे होते . नंतर रस्ता वगैरे होणारच होता . योजना अशी होती : ( १ ) जमिनीवर कुंपण बांधून थोडी झाडी लावणे . दोन तीन खोल्या बांधणे . तेथून न्युमॅटिक जॅकची सोय करणे . ( २ ) हा जॅक खाली पुराववाचा व तो जमीनीतून माती , दगड व मूर्ती वर उचलेल अशी व्यवस्था करणे . ( ३ ) अधिकस्य अधिकं फलं या न्यायाने एकाऐवजी दोन मूर्ती बाहेर काढवयाच्या ठरवले . एक गणपती होताच ; दुसर्याबद्दल एकमत होईना . शेवटी बालाजी ठरला . भक्तही कॉस्मॉपॉलीटन ( व श्रीमंत ) पाहिजेत ना . त्या वेळी सातारा रोडवरचे बालाजी मंदिर नव्हते . ( ४ ) मूर्ती लांबून म्हणजे बंगालमधून आणावयाचे ठरले . ( कलकत्ता नाही ! ) तिकडे आडगावातही चांगले सोनार असतात . एकेक किलोच्या आसपासच्या वजनाच्या मूर्ती त्या काळात १५ लाखांत होणार होत्या . कुणाला पाठपुरावा करावयास अवघड जावे म्हणून ही योजना . ( ५ ) मूर्ती जुन्या व पुरलेल्या अवस्थेत सापडणार असल्याने योग्य ती रासायनिक व मेकॅनिकल ट्रीटमेंट देण्याची जबाबदारी माझ्याकडे . ( ६ ) महाराजांनी त्यांच्या एका प्रवचनात सांगावयाचे की त्यांना साक्षात्कार झाला आहे . पुण्यात एका टेकडीवर दोन मूर्ती मिळणार आहेत . अंनिसच्या कार्यकर्त्यानी मोहोळ उठवले की सर्वांनी आमच्या जागेत येऊन खणाखणी करावयाची . काही मिळाले नाही की महाराजांची फजिती झाली असे सर्वत्र पसरावयाचे . पंधरा दिवसांनी महाराजांनी प्रसिद्ध करावयाचे की त्यांना परत साक्षात्कार झाला आहे . मूर्ती मिळणार नाहित ; त्या स्वत : होऊन प्रगट होतील . महाराज स्वत : च तेथे मुक्काम करणार आहेत . ते तेथे आले की दुसर्या दिवशी कडेकोट बंदोबस्तात मूर्ती वर उचलावयाच्या . वरचा मातीचा थर फक्त फूटभरच ठेवावयाचा . ( गुप्त धन नव्हे , सरकारची मालकी नाही ) . संशोधकांना बोलवून मूर्ती दाखवावयाच्या . ते सांगतीलच की मूर्ती फार जुन्या नाहित . ऍंटिक व्हॅल्यु शून्य . मग देवळे बांधावयाचा संकल्प सोडावयाचा . . . . . नंतर पैसे कोठे ठेवावयाचे एवढाच प्रश्न उरणार होता .
तिळाचं तेल कापसाची वात दिवा जळूदे सारी रात घरातली पीडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो देवो .
" नाही तरीही धीर आम्ही सोडीला काही कुठे ऐसे नव्हे की माकडाला , माकडी नसते कुठे " भाऊसाहेबांना हा जो काही आधार देऊन ठेवलाय नाऽऽऽऽऽ आभार मानावे तितके कमी आहेत ! : - p त्यांचेच दोन मुशायरे आठवत आहेत - " लागला धक्का तिचा , जोरात पण होता मऊ , ती म्हणे सॉरी मला , मी म्हणालो थॅंक यू ! ! " किंवा - " अपुल्याच दाती ओठ अपुला , चावणे नाही बरे , चान्स अमुचा अमुच्या समोरी मारणे नाही बरे ! "
दुसर्या दिवशी सकाळी चहा प्यायला , पाणी भरुन घेतलं आणि मामांचा निरोप घेऊन आम्ही तिघेजणं ऑर्थरसीटकडे रवाना झालो . आमच्यापैकी एक , संदीप , गाडी घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला ऑर्थरसीटला घ्यायला येणार होता .
भाऊ , अजून रैना , धोनी , कोहली आहेत , शिवाय हरभजन सिंग पण आहे . तेंव्हा नेहेमी पॉझिटिव्ह विचार करावेत , चांगल्या गोष्टींची इच्छा करावी .
आपला सकाळ चांगला वाटला . ताज्या बातम्या देण्यासाठी सकाळ बेस्ट आहे
२७ ) पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय ? वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे पहाणे म्हणजे गुणमेलन . पत्रिका - गुणमेलन करताना वर्णगुणाला १ , वैश्यगुणाला २ , तारागुणाला ३ , योनिगुणाला ४ , ग्रहमैत्री गुणाला ५ , गणगुणाला ६ , राशीकूटगुणाला ७ आणि नाडीगुणाला ८ अशा चढत्या क्रमाने गुण दिलेले असून सर्व गुणांची बेरीज ३६ होते . हे सर्व गुण वधू - वरांच्या पत्रिकेत चंद्र कुठल्या नक्षत्रात कितव्या चरणात आहे यावर ठरलेले असते . त्यासाठी पंचांगात रेकनर सारखे कोष्टक असते . ते पाहून ३६ पैकी १८ पेक्षा अधिक गुण जमले तर विवाह जमवण्यास हरकत नाही असा निकष असतो . खरं तर या गुणमेलनात फक्त चंद्राचाच विचार होतो म्हणून ते परिपूर्ण किंवा ' शास्त्रीय ` नाही असे काही ज्योतिष्यांचंच म्हणणं आहे . एकंदरीत , परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमात कुठल्या टॉपिकला किती गुण हे जसे दिलेले असते तसाच इथे प्रकार आहे . गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू - वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली असावी . प्रेम , त्याग , सांमजस्य , या गोष्टी सुखी वैवाहिक जीवनास पोषक असतात . दोन भिन्न प्रकृतीची माणसं जर एकत्र आली तर वैवाहिक जीवनाचा समतोल ढासळतो . तसे होउ नये म्हणून त्यांच्या प्रकृतीचे मूल्यमापन पत्रिकेच्या माध्यमातून करून त्याचा निष्कर्ष सांगण्याचा प्रयत्न गुणमेलनाद्वारे केला गेला असावा .
डॉक . . सुरवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या ट्रेकची बहुतेक छायाचित्रे ८ वर्षे जुनी असून डिजिटल नाहीत . ती काही वर्षांपूर्वी प्रिंट वरून स्कॅन केलेली आहेत . . .
चैत्र पौर्णिमेला अवतार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . यावेळी मोठी यात्रा भरते हि यात्रा तीन ते चार दिवस चालते . मार्गशीर्ष महिन्यातील षडःरात्रोत्सावा प्रमाणेच चैत्र शुक्ल नवमी ते पौर्णिमा असे चैत्र षडःरात्रोत्सव साजरे केले जाते . अधिक माहितीसाठी लॉग इन करा www . jejuri . in / yatra आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा . . . .
आपल्याकडे ज्योतिषाकडे अनेक दृष्टीकोनांतून पाहिले जाते . ज्योतिषाकडे बघायचा आणखी एक दृष्टीकोन मला अमेरीकेतील एका प्रसिद्ध ज्योतिषीबाईनी ( त्या आता हयात नाही ) मला दिला . त्यांचे नाव श्रीमती मॅरी डाउनिंग . त्यांच्या मते ज्योतिष हे मानवी जीवनातील चक्रीय वास्तवाची प्रतिकृती आहे ( Astrology is model of circular reality in human life ) . हे चक्रीय वास्तव सुख आणि दू : ख , अपेक्षापूर्ती आणि अपेक्षाभंग , प्रवृत्ती आणि निवृत्ती , अशा ध्रुवांमध्ये आंदोलित होत असते .
हे शास्त्र तुम्हाला सकारात्मक तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता प्रदान करेल . बहुतेक वेळेला आपण परमेश्वराला प्रार्थना करतो त्यात आपल्याला नक्की काय हवे हे सांगितलेलेच नसते व इतर चांगल्या वाक्यांचा पण ज्याला फापट - पसारा म्हणता येईल असाच सारा प्रकार असतो . ` देवा मला यश दे ' असे लोक म्हणतात पण यश म्हणजे नक्की त्याचे स्वरूप काय असावे हे कधीच स्पष्ट करीत नाहीत . ` माझे काम होऊ दे ! ' अशा प्रार्थनेने काम कसे होणार कारण तुमचे नक्की काय काम आहे हे तुम्ही स्पष्ट केलेलेच नसते . कारण हे सर्व हुडकण्याचे काम परमेश्वरानेच करायचे आहे असेच लोकांना वाटते कारण जर त्यांना स्पष्ट बोलण्याबद्दल सांगितले तर ` त्यात स्पष्ट काय सांगायचे , परमेश्वराला सगळे माहितच असते ' असे उत्तर येते .
क्या कहा . . . राखी की दुआ से प्रेग्नेंट हुईं ऐश्वर्या राय !
फोटो मस्त वाटताहेत अगदी . निखार्यावर किती वेळ लागले साधारण ? दतेम म्हणजे काय प्रकार ?
आता खरे प्रश्न असे दिसतात की त्या पार्टीला आलेल्या सर्वांना सुरक्षा - यंत्रणेने तपासून आत पाठवलेले असतानाही या मुलाला कसे मारले , त्याला मारावे असे त्याने काय केले होते , मुलांच्या हाती बंदूका कशा येतात , त्यांना शिक्षण का मिळत नाही इ . . आणि मग प्रश्न पडले आणि त्यासंबंधाने सहानुभूती वाटली तरी त्यात वेळ घालवण्याची इच्छा नाहीशी होते . हे होऊ नये . आणि ज्यांना हे मुद्दे तरीही वेळ घालवण्यासारखे वाटतात अशांच्या प्रयत्नांनी थोडी - थोडी सुधारणा होत राहते किंवा निदान त्यांना काही केल्याचा आनंद मिळत राहतो .
@ एक_मराठी याठीकाणी तुला माहिती द्यावीशी वाटते की राजीव गांधी व इतर बऱ्याच लोकांना भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर दिला गेला आहे . त्यामुळे बाबा आमटेंसारख्या खऱ्या योग्याला हा पुरस्कार देणे फार महत्वाचे आहे . आज त्यांच्यानंतर तिसरी पिढी बाबांचे कार्य अधिक जोमाने पुढे नेत आहे . त्यामुळे बाबांना हा पुरस्कार दिला तर तो त्यांच्या कार्यांचा जयजयकार ठरेल व समस्त महाराष्ट्र वासियांची छाती अभिमाने फुगेल . महाराष्ट्र शासनानेही बाबांचे नाव राष्ट्रीय स्तरावर उचलून धरायला हवे .
सांगलीचे श्री . शरद आपटे यांचा पक्षी निरिक्षणाचा छंद गेली कित्येक वर्षे अव्याहतपणे चालू आहे . सांगली बॅंकेतील आपली नोकरी सांभाळून शनिवार , रविवार वा सुट्ट्यांच्या काळात ते रानोमाळी भटकून पक्षी निरीक्षणाचा व पक्षांचे आवाज ध्वनीमुद्रीत करण्याचा आपला छंद जपत असतात . बलभीम व्यायाम … Continue reading →
( कित्येक संन्याशांच्या पंथात सन्याशी मेल्यावर त्याच्या डोक्यात खिळा मारून एक भोक पाडले जाते ! )
२८६ वर क्युबेसिक मध्ये स्नेक गेम आणि गोरिला , नंतर ३८६ वर टेट्रिस , पॅक - मॅन , बुक - वर्म , माईन - स्वीपर , ४८६ वर प्रिन्स , मारिओ , अल्लादिन , किन४ , रुबिक गेम्स , बायोमेनास , तैपेन आणि मस्त त्रिमितीय खेळ वुल्फ३डी ला कोण विसरू शकेल ? सोबत रोड - रॅश होताच .
तिच्या दुर्दैवाने अप आणि डाऊन दोन्ही बंगलोर एक्स्प्रेस एकाचवेळी त्या स्टेशनावर प्लॅटफॉर्म २ आणि ३ ला लागल्या होत्या . त्या माणसाने तिला एका बंगलोर एक्स्प्रेसच्या तिने सांगितलेल्या डब्यात चढवले आणि दोन्ही गाड्या एकदम सुटल्या . ती आपल्या मुलाला शोधू लागली पण हाय रे दुर्दैवा . . . . तो दुसर्या गाडीत होता . निरुपाने आक्रोश सुरु केला . आणि ती बेशुद्ध झाली . प्लॅटफॉर्मवर उभा तो फकीर मात्र गातच होता . . . . . " जगी सगळ्यांत मोठी सत्ता ईश्वराची . . . जगी सगळ्यांत मोठी सत्ता ईश्वराची . . . ईश्वरापुढे न सत्ता मोठी असे कोणाची . . . . बिछड जायें तो वो ही मिलाता है यारों . . . . "
यज्ञानिमित्त केल्या जाणार्या कर्माशिवाय दुसर्या कर्मांत गुंतलेला हा मनुष्यसमुदाय कर्मानी बांधला जातो . म्हणून हे अर्जुना ! तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर . ॥ ९ ॥
बोका - असं ? ? मग याची आई कधी आली त्याच्याकडे ? ?
हिलरीने शेवटच्या १३ पैकी ९ जिंकल्या . हिलरीच्या दृष्टीने उशीर झाला होता पण यातून काही धडा घ्यावा ओबामाने .
उरी कोंडला , पूर बेभान सारा असो भेसुरा ! कोरडा खास नाही
२१ तारखेला शत्रूकडून आता लढाईला आणि मृत्यूला तयार रहा असा निरोप आला आणि त्याच दिवशी यांच्या मदतीसाठी एक फौज येत आहे असाही निरोप आला . त्यामुळे सगळ्यांना आनंद झाला . हा आनंद आपल्याला कळायचा नाही . उपाशी पोटी चार महिने एका जागेत कोंडून काढणार्यांना , झोपेसाठी जमिनीला पाठही टेकू न शकणार्यांनाच तो कळावा .
लंडन - हॉलिवूडच्या महान कलाकारांच्या वस्तूंचा लिलाव करणे ही पाश्चात्त्य संस्कृतीची खासियत . त्यातही मर्लिन मन्रो , चार्ली चॅप्लिन , एल्विस प्रिस्ले यासारख्या कलाकारांच्या वस्तूंचा लिलाव म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच . आवडत्या किंवा " आयडॉल ' कलाकारांच्या गोष्टी विकत घेण्यासाठी चाहत्यांच्या अक्षरश : उड्या पडतात . जगाला आयुष्यभर हसवणाऱ्या चार्ली चॅप्लिनच्या विस्मृतीत गेलेल्या एका चित्रपटाला चांगली किंमत येईल असे संयोजकांना वाटले , दुर्दैवाने चार्लीच्या दुर्मिळ चित्रपटाचा लिलाव होऊ शकला नाही . लिलावात सहा आकडी किंमत येईल अशी अपेक्षा लिलावकर्त्याला होती . मात्र तो चित्रपट विकलाच गेला नाही . " झेप्ड ' या सात मिनिटांच्या लघुचित्रपटाची ब्रिटनमध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले जाते . प्रदर्शनाचा काळ पाहता त्यावर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता चॅप्लिनच्या या चित्रपटाचे सर्वत्र वितरण होऊ शकले नाही . जुन्या चित्रपटाचे संग्राहक मोरेस पार्क यांच्याकडे या लघुपटाचे रिळ होते . पार्क म्हणाले , " " युरोप आणि अमेरिकेतील चित्रपट तज्ज्ञांना मी भेटलो आणि एक प्रतिक्रिया समान होती .
आणि हो आता तो झेंडा राहिलेलाच नाही तर महाराष्ट्रीय अस्मितेचा ध्वज झालाय कारण तो सर्व राजधार्मिक आणि राजकार्मिक खाजकुल्ल्यावर रामबाण उपाय करून मगच बाहेर पडतोय …
कथेचं शीर्षक वाचून शेवट काय असेल त्याचा अंदाज सहज येतो , त्यामुळे शीर्षक देताना ते इतकं सूचक असणार नाही असं बघितलं तर वाचकांची उत्कंठा टिकून राहू शकेल . पु ले शु !
पुढे जाऊन स्त्रिया ह्या तर्कदुष्टपणे किंवा रॅशनली विचार करीत नाहीत असेही म्हणता येईल .
उत्तर कृपया तुमच्या खरडवहीत पाहा , इथे विषयांतर नको . .
देवा : जीवनाकडे कसली हमी मागितली आहे ह्याचे उत्तर वाचंकांच्या perception वर आहे . . ज्याला आपल्या अनुभुतीप्रमाणे जे वाटेल ते . . . कुणाला सुखाची , कुणाला आनंदाची तर कुणाला जगण्याचीही हमी हवी असू शकते . . .
" म्हंजे ? ? ? " चालक जरा कोड्यात पडले . . . " अन कसल कार्य म्हणायच आता ह्ये ? ? आरे होsssss आलं , आलं ! ! समद ध्येनात आल बघा ! ! जाईच लगीन ठरिवताय का ? ? आरे वा , वा , वा . . . . पन म्या काय म्हणीत व्हतो , बर का मास्तर , हितन तुमास्नी आस कितीस कर्ज भ्येटणार ? आँ ? त्यापरीस माझ्याकडे येक प्ल्यान हाय तो ऐका ! अन त्ये जाईच्या लग्नाला आपल्या संस्थेचा हॉल वापरायचा बर का , आगदी संकोच म्हून करायचा न्हायी ! ! आन त्येच भाडं घेणार नाही आम्ही ! ! आमची बी ल्येकच की ती . . . " गोड गोड शब्द वापरून चालक आपले योजना मास्तरांच्या गळी उतरवू पाहत होते . . . " तर आस बघा मास्तर , आपल्याकडे सरकारी पावण येणार हायती , ह्येच हो , आपल शाळा बघत्याल , पोरांची प्रगती बघत्याल . . . आन सध्ध्या त्येंच्या काय योजना बी हाये म्हणत्यात . . त्यातून आपल्या शाळेला काय अनुदान वगैरे पदरात पाडता येत का ते बघतो बघा मी . . . तुम्ही बघताच आता , किती खर्चिक काम आसतय शाळा चालवण . . . "
ह्म्म्म . . . सालं काढलेल्या कडधान्याच्या आमटीला सिकेपी लोकं ( माझ्या मामाकडे ) बिरडं म्हणतात .
बेफिकीरजी , ही झाली माझी वर्गवारीची कल्पना , तुम्हीच आठवण करून दिलेल्या माझ्या इथल्या दुसर्या वाढदिवशीची ! पुढच्या वाढदिवसालाही ही तशीच असेल याची हमी नाही ! !
माहितीये मला वाजलेत किती घरच्यांची तुला वाटतीये भीती पण कारण बनवण्यात तर तू किती हुशारे निघू नकोस इतक्यात अजुन वेळ व्हायचीये
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन . आपले नम्र फटु आणि गणा मास्तर - भोकरवाडी ( बुद्रुक )
पण हे गाणं तसं पहायला गेलं तर चांगलं आहे की . हे या क्याटेगिरीत मोडेल असं वाटत नाही . १ नि २ विषयी सहमत .
विश्वास पाटलांच्या लेखनीतुन उतरलेली कथा म्हणजे भयानक मनस्पर्षी असनार हे माहित होतेच . . त्यात भर म्हनुन दिगदर्शन कमालीचे उच्च झालेले आहे . . वस्तुस्थीती . . परिस्थीती खुद्द आपल्या गावातीलच आहे असे बघताना वाटत राहते . . . प्रत्यक प्रसंग म्हणजे आपल्याच कुटंबावर होत असलेला अत्याचार वाटतो आहे . . आणि माणुस म्हणुन आपण या भुमिपुत्रांचे देणे लागत नाहि का ? असा प्रश्न आपल्या पुढे उभा राहु पाहतोय . . .
शेवटी कात्यायनीच्या माळावर कोजागिरी ठरली . उ प्या मटण आन भरपूर कांदा कापून आणणार , शीटट्या लय शाना म्हणून दारू आन चखणा ( चा बरुबर खाल्ला तर शेव चिवडा म्हणत्यात याला , पण दारू बरोबर खाताना याच नाव बदलत ! ) ( माझं जनरल नॉलेज भलतच वाढत होत . ) शम्या त्याच्या खानावळ वाली कडन चपात्या करून आणणार . तिथनच रश्श्या साठी मोठ भांड आन चार ताट वाट्या आणायचं ठरलं . माझ्या गळ्यात पडल मसाला भाजून वाटून आणण ! !
छान लिहिले आहे . अभिनंदन , आयुष्यात तुम्ही दाखवलेली जिगर फार कमी लोक दाखवू शकतात .
ऐकून हे मी आनंदाने धावत सुटले अंगणात अन् जलधारांचा स्पर्श लाभता झरे मुखातून विस्मृत गान
" ते तर काहीच नाही , त्या जानकीला काही दिसत नाहिये तरी म्हणे नरसिंहासाठी तिला त्याच्या आवडीची डिश बनवायची आहे . कुठली माहित आहे का ? रव्याचा गोड शिरा " गाजराचा हलवा शिरा ताणून ओरडला .
पण तुम्ही म्हणता अवयवांना इच्छा असतात . ( येथे " मनुष्यव्यक्ती " हे अवयवी असून " त्वचा " हा अवयव आहे , असे मानले आहे . हे चुकले असल्यास सुधारून सांगावे . ) अवयवांच्या इच्छा त्या कुठल्या ? अवयव इच्छापूर्तीसाठी काय - काय निर्णय घेतात ?
मराठी चित्रपटांमध्ये दिवसेंदिवस कमी खर्चात आणि कमी दिवसात चित्रपट करण्याची साथ आलेली आहे , मात्र अनेकदा ही काटकसर विषयाला चालणारी नसते , आणि मग तिचा परिणाम दर्जा खालावण्यात होतो . मात्र जर विषयच असे निवडण्यात आले , जे आपोआप खर्चात कपात आणतील , तर चित्रपट चांगले होणं शक्य असतं , उदाहरणार्थ , ब्लेअर विच प्रोजेक्ट चित्रपटाच्या वेळी चित्रिकरण विद्यार्थ्यांनी केलंय असं वाटणं ही चित्रपटाच्या विषयाचीच गरज होती . त्यामुळे मुळात भूतकथा असूनही चांगले कॅमेरे , त्यांचे रॉ स्टॉक , स्पेशल इफेक्ट्स हा सर्व खर्च आपोआप मोडीत निघाला . या प्रकारचं सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने मर्यादित वेळात आणि बजेटमध्ये केलेलं उत्तम काम , म्हणजे स्टीव्हन स्पीलबर्गचा ड्यूएल . चित्रपटात शिरण्याआधी टेलिफिल्म म्हणून बनवलेला हा चित्रपट त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटातला एक मानला जातो यातच सगळं आलं . ड्यूएल प्रसिद्ध लेखक रिचर्ड मथीसन यांच्या लघुकथेवर आधारित असलेला आणि काटकसरीच्या अनेक शक्यता मुळातच दाखविणारा आहे . कथानक साधारण दोन अडीच तासात , जवळ जवळ रिअल टाईम घडवणारं . लोकेशन म्हणजे रस्ता , एक वाटेवरचं रेस्तराँ आणि दोन पेट्रोल पंप . नट एक . इतर सामुग्री म्हणजे दोन गाड्या . एक छान उच्चमध्यमवर्गीय वाटणारी , तर दुसरी एक मोठा ट्रक . हा ट्रक दिसायला थोडा भीतीदायक , कारण चित्रपटातला खलनायक तो हाच . कथा म्हणाल तर जवळ जवळ नाहीच . सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालणारा हा एक पाठलाग . मात्र परिणाम विचाराल तर कमालीचा . जवळजवळ दीड तासांचा हा चित्रपट एका छोट्याशा कल्पनेवर आधारित आहे . डेव्हिड मॅन ( डेनिस वीव्हर ) काही कामानिमित्त जवळच्या गावी जायला निघालाय . प्रवासात काही क्षुल्लक कारणावरून त्याचं एका ट्रकबरोबर ( ट्रक ड्रायव्हरबरोबर म्हणता येणार नाही . कारण तो आपल्याला कधीच दिसत नाही . स्पीलबर्गचा प्रयत्न हा या ट्रकलाच व्यक्तिरेखेप्रमाणे वापरण्याचा आहे . ) बिनसतं . डेव्हिडला कळत नाही की आपली चूक तरी काय ? पण ट्रक मात्र एखाद्या खुनशी जनावरासारखा त्याच्या मागे लागतो . लवकरच स्पष्ट होतं की पाठलाग संपेल तो कोणा एकाच्या नाशाबरोबरच . ड्यूएल पाहताना अनेक जागी आपल्याला स्पीलबर्गवरचा हिचकॉकचा प्रभाव जाणवत राहतो . अगदी विषयाच्या निवडीतही तो आहे . हिचकॉकच्या चित्रपटात अनेकदा सामान्य वाटणा - या घटना भयंकर रुपात आपल्या समोर येतात . बर्डसमध्ये पक्षांनी माणसांवर उलटणं , सायकोमध्ये प्रवासात लागणारं साधंसं मोटेल हा मृत्यूचा पिंजरा असणं . नॉर्थ बाय नॉर्थवेस्टमध्ये पिकांवर किटकनाशकं फवारणा - या विमानाने नायकावर हल्ला चढवणं अशी कितीतरी उदाहरणं देता येतील . इथल्या साध्या प्रवासाचं दुःस्वप्नात होणारं रुपांतरही त्याच प्रकारचं आहे . क्लासिक हिचकॉक म्हणावासा आणखी एक प्रसंग इथे आहे . तो म्हणजे डेव्हिड कसाबसा जीव वाचवून रेस्तराँमध्ये थांबतो तो . गर्दीच्या ठिकाणी एकटं , असहाय्य असणं हे हिचकॉकच्या चित्रपटांत नेहमी दिसतं . जिथे नायक - नायिका आपली अडचण कोणाला सांगू शकत नाहीत , कोणाची मदत मागू शकत नाही . भोवतालचा समुदाय हा इथे नसल्यासारखाच असतो . ड्यूएलमध्ये डेव्हिड रेस्तराँमध्ये पोचतो . तोच गर्भगळीत झालेला . निदान जीव वाचला याचं समाधान मानत असतानाच त्याला कळतं की ट्रकही बाहेर उभा आहे . म्हणजे खोलीतलाच कोणीतरी हा ट्रक ड्रायव्हर आहे , आपल्या जीवावर उठलेला . डेव्हिडला ड्रायव्हरचा चेहेरा माहिती नाही . केवळ बूट त्याने पाहिले आहेत . पण इथे तसे बूट दोघातिघांच्या पायात आहेत . स्पीलबर्ग हा प्रसंग केवळ त्यातला ताण वाढवून उत्तम त - हेने सादर करतो , आणि पुढे येणा - या प्रसंगांची अतिशयोक्ती लपली जाईल अशी सोय करतो . ड्यूएलचा भर त्यात पाठलाग असूनही अँक्शनवर नाही . तर तो आहे नायकाच्या व्यक्तिरेखेच्या मानसिक ताण तणावावर . प्रेक्षक हा नायकाशी पहिल्या दहा मिनिटांत समरस होतो आणि ही पकड सुटत नाही . मग नायकाच्या डोक्यात चाललेल्या गोष्टी आपण सहज समजून घेतो . पहिल्यांदा घरच्या काळजीत , आणि दुस - या गावी वेळेवर पोहोचण्यासाठी निघालेला डेव्हिड पुढे पुढे हे विसरतो आणि केवळ जीवाची भीती त्याला ग्रासून टाकते . ट्रकही हॉर्न मारणं , साईड न देणं अशा तुलनेने क्षुल्लक गोष्टींपासून सुरुवात करून डेव्हीडच्या अंगावर गाडी घालण्यापर्यंत येतो . या दोघांमधलं द्वंद्व हे डावपेचांवर आधारलेलं आहे . प्रत्यक्ष पळणं किंवा पकडणं याहून महत्त्व आहे ते व्यूहरचना आणि तिची अंमलबजावणी याला . स्पीलबर्गचा पुढचा काळ अधिक श्रीमंती , भव्य कलाकृतींनी भरलेला आहे , पण त्याच्या कारकिर्दीचा पाया किती मजबूत आहे . हे ड्यूएलवरून लक्षात येईल . हा दिग्दर्शक हाती असलेल्या प्रत्येक गोष्टीचा फायदा कसा करून घेता येईल , हे पाहणारा आहे , मात्र त्यातल्या कोणत्याही गोष्टींवर तो अवलंबून नाही . हेच इथे स्पष्ट झालेलं दिसतं . - गणेश मतकरी .
आत्ताच १० मिनिटांपूर्वी , आणि हे लिहिताना देखील . . : )
गोरक्षकरकडे बघितलं , तर तो शनायाकडेच एकटक बघत होता . त्याचे डोळे भरले होते . जोएल एकदम " शी हॅज ओव्हरडन ड्रग्ज मॅन , " असं काहीतरी बरळत उठला . आणि गोरक्षकरने त्याच्यावर उडी मारून त्याला जमिनीवर दाबून धरला . " खाली जा . लेफ्ट साईडने पाच मिनिटं ड्राईव्ह कर . पोतदार नगर पोलीस स्टेशन दिसेल . तू जा आणि पोलीस घेऊन ये तिथूनच , " गोरक्षकर म्हणाला . " आपण फोन लावूया ना पोलीसला , " मला नीट बोलताही येत नव्हतं . " फोनवर जास्त वेळ जाईल . जा लवकर , " गोरक्षकर माझ्यावर ओरडला तेवढ्यात जोएल परत बरळला , " यू विल पे फोर धिस , " असं काहीतरी . " शट अप . ऑर आय विल किल यू फॉर धिस यू बास्टर्ड , " गोरक्षकर किंचाळला . मी बधीरपणे खाली येऊन बाईक काढली … पोलीस वगैरे आल्यावर त्यांनी आधी बिल्डींगमधून बाहेर जाण्याची वाट ब्लॉक करायला एक कॉन्स्टेबल उभा केला . मग त्याच्यासोबत मी खालीच थांबलो . परत वर जायची माझी हिम्मत नव्हती . नंतर गोरक्षकरलाही मी एकदम दोन दुस - या दिवशी भेटलो . आम्हांला स्टेटमेंट घ्यायला पोलिसांनी बोलावलं तिथे . तिथेच साठेलापण बोलावलेलं होतं . ते सगळं झाल्यावर मी गोरक्षकरला विचारलं , " तुला काय झालं एकदम ती चॅट बघून ? " तेव्हा त्यानं मला सांगितलं , " त्या चॅटमधे तुला अडकवण्याचं इंटेन्शन क्लीअर दिसत होतं . आणि मी तर शनायाला तिने या कामासाठी तुझा फोन वापरला म्हणून इतकी गिल्टी झालेली बघितली होती की इट वॉज इम्पॉसिबल की ती तुला यात अजून जास्त अडकवेल . मग पुढे जेव्हा एमएमएस क्लिपचं काहीतरी नॉन एक्झीस्टिंग ती बोलली तेव्हा आय बिकेम शुअर . आणि नीट बघितलंस ? विलीनं त्या पूर्ण चॅटमधे " कौन कर रहा है ये ? " आणि " तू उसके प्रेशर में क्यू आ रही है ? " अशी दोन वाक्यं हिंदीत विचारली होती . आणि शनायाला तेवढीच दोन कळली नव्हती . शी सेड ' शी कान्ट रीड हिंदी इन रोमन . टू अपसेटिंग . ' मी तिच्यासोबत एकत्र रूम शेअर केलीय यार . हिंदी शब्द रोमनमधे टाईप करून चॅट करण्याची स्वत : शनायालाही सवय होती . ती अपसेट कशी होईल ? मग माझ्या लक्षात आलं की हिंदी न येणारं कोणीतरी तिच्या नावानं चॅट करतंय . एंड आय वॉज टेरीफाईड , बीकॉज जोएल वॉज रीसेंटली सीइंग हर . एक दोन महिन्यांपूर्वीच कधीतरी तिने त्याला फ्लॅटची तिसरी चावी दिली होती . आणि हे फक्त मला माहीत आहे . " गोरक्षकर थांबू शकत नव्हता . त्यालाही बोलून सगळं साठलेलं बाहेर काढायचं होतं . तो बांध फुटल्यासारखा बोलत राहिला . " ती गेल्या महिन्याभरातच म्हणायला लागली होती की शी इज प्रोबेबली गेटिंग यूएस व्हिसा . समबडी इज गोइंग टू हेल्प हर . जोएलनं तिला यूएस प्रोजेक्टवर नेण्याचं प्रॉमिस करून या डेटाथेफ्टमधे अडकवलं . ऑफ कोर्स शी वॉज एट फॉल्ट . मी तिला त्यातून वाचवू शकलो नाही . कारण शी वॉज ऑलरेडी इंव्होल्व्ड विथ जोएल . "
आजकाल जरा वातावरण चांगलं असतं . थंडी खूपच कमी झाली आहे पावसानेही जरा उसंत घेतली आहे . त्यामुळे सकाळी मुलाला चालतच सोडायला जाते स्कूलबसच्या थांब्यापाशी . आजही मस्त चालत गेले . . बस गेल्यावर मी घरी आले . येऊन बसते न बसते तोच . . ली पॅटीओच्या काचेतून आत डोकावून पहाताना दिसला . मी उठून दार उघडलं . . ( अरेरे ! ! नवरा गेला होता ऑफिसला : ( आता मलाच भांडायला हवं याच्याशी तेही थोबाडावर सौजन्य ठेऊन ! ! ) . " तू आत्ता १५ मिनिटांपूर्वी आलीस का घरी ? " ली . मी म्हणाले " हो . . पण मी हाँक नाही केलं . कारण मी आज कार नेलीच नव्हती बाहेर . " तो म्हणाला , " आर यू शुअर ? " मी , " ऑफ्कोर्स , माझी कार बघ . . इंजिन थंड आहे . कारण काल रात्री मी पार्क केली ती अजूनही काढलेली नाही . " मग ओशाळून म्हणाला , " ओह ! ! आय एम सॉरी . . पण मी हाँक ऐकला आणि दचकून उठलो . . आणि . . . . " मी मनात म्हंटलं , ' झालं ! ! ! ! याची पुन्हा टेप सुरू झाली हायवे वाली . ' मी मध्येच त्याला तोडत म्हणाले , " इथे खूप गाड्या आहेत हाँक करणार्या . . तुला माझी गाडी माहिती आहे म्हणून तू माझ्याकडे येतोस . तू त्यादिवशी सांगितल्यापासून मी रिमोटचं बटन फक्त एकदाच दाबते . पण मी बाकीच्या गाडीवाल्यांना नाही सांगू शकत ना . . " आज माझ्याकडे हुकुमाचा एक्का होता . कारण माझी गाडी मी बाहेर नेलीच नव्हती . " यॅऽऽऽह , आय नो . . . तू जे करतेस त्याबद्दल तुझं खरंच खूप कौतुक आहे मला . मी खूप आभारी आहे तुझा याबद्दल . . पण मग कोण करतंय ते आता कसं कळणार ? आपल्याला शोधावं लागेल . " यातला ' आपल्याला ' हा शब्द ऐकल्यावर माझं डोकंच सणकलं तरीही मृदू आवाजात म्हणाले , " हे बघ , मी सकाळी ६ ला उठते त्यामुळे बाहेर कोणी हॉर्न वाजवला काय , किंवा आणखी काय वाजवलं काय मला दचकायला होत नाही . त्यामुळे मला कोण हाँक करतंय हे शोधून काढायची अजिबात गरज नाहीये . तूच शोध . " हे ऐकल्यावर बहुतेक त्याला त्याची बोलण्यातली चूक समजली . म्हणाला , " खरंय . पण मी तुझा खूप आभारी आहे . . तू अगदी लक्षात ठेऊन हाँक करणं टाळते आहेस . . . तुझं खूप कौतुक वाटतं मला . मी तुझ्यासाठी काय करू शकतो . . काही मदत हवी असेल तर नक्की सांग . " मनांत आलं , " घरी येणं बंद कर " असं सांगावं . पण त्याचा हा पराभूत पावित्रा बघून मी पण जरा नमतं घेत म्हणाले , " हे बघ , तू काहीही करण्याची आवश्यकता नाही . जस्ट फर्गेट इट . " तो पुन्हा पुन्हा ' थँक यू व्हेरी मच ' असं मच्मचंत आपलं म्हणत म्हणत निघून गेला . मी जरा निश्वास टाकला आणि चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात आले . इतक्यात आई म्हणाली , " अगं तो बघ तुझा चायनीज मित्र बहुतेक मिठाई घेऊन आलाय . " मी पाहिलं तर हातात दोन कसलीशी पॅकेट्स घेऊन हा पॅटीओच्या काचेतून आत डोकाऊन पहात होता . जरा हसूच आलं . पण जाऊन दार उघडलं . ते पॅकेट्स माझ्यासमोर धरत म्हणाला , " दिस इज फॉर यू . तू इतकं करते आहेस माझ्यासाठी . . तुला थँक्स कसं म्हणावं हे कळेना . . म्हणून हे घेऊन आलो तुझ्यासाठी . तू पोर्क खातेस का ? " मी म्हणाले , " नाही . मी पोर्क खात नाही . " तर पुन्हा एकदा ओशाळून म्हणाला , " ओऽऽऽह . . . ! आय एम सॉरी ! ! आर यू व्हेजी टेरीयन ? ? " मला चायनीज लोकांची व्हेजीटेरियन ची व्याख्या जरा वेगळी असते हे माहिती आहे . त्यामुळे ठसक्यात मी सांगितलं , " येस्स ! प्युअरली व्हेजीटेरीयन . . . ! नो मीट . " त्याला जरा दु : ख झालं . . पण पुन्हा एकदा , " आय एम सॉरी . . आय जस्ट वाँट टू अॅप्रिशियेट यू . मला तुझ्यासाठी काहीतरी करायला आवडेल . . काही लागलं तर नक्की सांग . " असं म्हणाला . मी म्हणाले , " तुला हे सगळं करायची गरज नाहीये . जस्ट रिलॅक्स . त्यातून काही मदत लागली तर मी सांगेन . . " असं लवकर सुटका करून घेण्याच्या दृष्टीने म्हणाले कारण माझा चहा गॅस वर उकळत होता . तर , " दॅट वुड बी माय ऑनर . . थँक्स . . थँक्स अ लॉट ! " असं म्हणत तो निघून गेला . आमच्या मात्र हसू हसून पोटात दुखायला लागलं . आई म्हणाली . . " तू हाँक करत नाहीस म्हणून तो तुझ्यावर फिदा झालाय . . तू पोर्क खात नाहीस तर कदाचीत संध्याकाळ पर्यंत तो तुझ्यासाठी काहीतरी व्हेजीटेरियन खाऊ घेऊन येणार . . ! ! " हे ऐकून आणिकच हसू आलं . मी नंतर मात्र बुचकळ्यात पडले . म्हणजे हा माणूस खरंच मनोरूग्ण आहे की , ओव्हर वेल मॅनर्ड आहे हेच समजेना . आभार प्रदर्शन . . हे असं ? ? ? बघू आता पुढे काय काय अनुभव येतात या ली माणसाचे . . . !
कण्हूनये कोरडा बघूनी घरात शॉवर तहान मिटणे खरी समस्या ज्वलंत आहे
पण अशा अभिनव प्रकारे गणेशोत्सव साजरा करुन मायबोलीचे एक कुटुंब तयार करणार्या मायबोली प्रशासनाचे आणि संयोजकांचे हार्दीक अभिनंदन ! या उत्सवामागच्या मूळ प्रयोजनास या कारणाने तुम्ही जो हातभार लावत आहात तो अतिशय स्तुत्य विचार आहे !
- उगमापासून नवीन शरीरापर्यंत जंतू ज्या साधनाद्वारे येतात त्याला आपण रोगवहनाचे माध्यम म्हणू या . उदा . क्षयरोगाचे वाहन हवा किंवा दूषित वस्तू आणि पटकीचे माध्यम पाणी किंवा अन्न , इत्यादी .
तुम्ही आम्च्यातुन जाऊन ३ वर्ष जहाली . पण आजही मला तो दिवस आठवतोय , तुम्ही इतक्या ज़टकन प्राण सोडला की आम्हाला कलालेच नाही . मला कायम आठवते नेहमी शनिवारी तुम्ही मला , भाबिला भेटायला येत आणि कायम गप्पा मारत , आपले प्रॉब्लम शेयर करत होतो . आता आसा शनिवार कधीही येणार नाही . आसा नुसता विचार पण मनात आला तरीही खुप रडायला येते . तुम्ही आमच्या आयुष्याचा खुप महत्वाचा हिस्सा आहात , तुम्ही जेथे आसल तेथे आनंदात आसल हीच ईच्छा . आपली पुतणी
रैना , किती जणांचा समुह आहे ? मराठी येतं ना वाचायला ? मग त्यांच्याच आवडीचे शब्द त्यांनाच विचार - उदा . आईस क्रीम - मग ते शब्द एका कार्डवर उच्चार मराठीत आणि आणि खाली अॅक्च्युअल इंग्रजीत लिहून दे कार्डस वर . . ( कदाचित मी जरा लांबची उडी मारतेय का ? ) पण जे शब्द त्यांच्याकरता महत्त्वाचे आहेत / त्यांच्या कुतुहलाचे आहेत त्यापासून सुरुवात केली तर त्यांचा रस टिकेल . त्यांनाच विचारायचं की कुठलं वाक्य इंग्लिश मधे बोलायचय . . किंवा कुठला शब्द इंग्लिश मधे बोलायचाय . काही वाक्य : , " खूप कामं पडलीत " , " कुठे चाल्लास " , " काय करतेयस ? " , " कशी आहेस " , " चला जाऊया " , " कंटाळा आलाय " , " मारामारी नका करू " , " खूप महाग आहे " , " आत्ता नको " , " आज सोम ( कुठलाही ) वार आहे " गाण्यांचा खूप उपयोग होऊ शकतो . आमच्या फ्रेंच क्लास मधले काहीकाथेला ही शब्द केवळ गाणी ऐकलेली म्हणून मला आठवताहेत तर सरळ उच्चारातली - पण छान ट्युन असलेली गाणी ऐकवू शकतेस .
सज्जन्गडावरचे प्रसादाचे जेवण खुप चांगले असते असे ऐकले आहे . . तसेच गोंदवल्याचे सुद्धा .
शिवजन्मापासुन ते दादोजी कोंडदेव विजापुरकरांचा सुभेदार होण्यापर्यंतच्या काळामध्ये दादोजी हा , जिजाऊ व शिवाजींच्या सेवेत असण्याचा काडीमात्र संबंध येत नाही . इ . स . १६३२ ते १६३६ अखेरपर्यंत शहाजी राजे मुर्तुजा निजामशहास मांडीवर घेऊन . निजामशाही सिंहासनावर बसुन कारभार करीत होते , मोगल आणि विजापुरकर यांच्याशी सतत संघर्ष व लढाई करीत होते , त्यावेळेस दादोजी कोंडदेव हा , शहाजी राजांच्या विरुध्द असलेल्या विजापुरकरांसाठी काम करीत होता . मुरार जगदेवाने पुणे जाळल्याने व शहाजी राजांचे मोगल व विजापुरकर यांच्या बरोबरील सततच्या लढाईमुळे पुणे परगणा ओसाड बनला होता१ . अखेर अदिलशहा व मोगल शहाजहान यांच्यात करार झाला . मोगलांचा सेनापती खानजमान हा शहाजी राजांवर माहुली किल्ल्यावर चालुन गेला . येथे काही बाबी अदिलशहाच्या लक्शात आल्यानंतर खानजमान या मोगलाकडील सेनापतीचा हात ढिलाइने चालु आहे हे कारण पुढे करुन अदिलशहाने रणदुल्लाखानास पुढे करुन खानजमानच्या मदतीस पाठवीले . त्याने शहाजी राजास अदिलशहाकडे वळविले . आणि शहाजीराजांबरोबर करार केला . या करारानुसार मुर्तुजा निजामशहास खानजमान या मोगलाचे हवाली करुन माहुलीचा किल्ला आदिलशाहीत देऊन शहाजी राजे आदिलशाहीत सामील झाले२ . तेव्हा पुणे परगणाही विजापुरांकडे गेला . आदिलशहाने विजापुर येथे शहाजी राजांचा सत्कार केला . त्यांना हत्ती , घोडे , जवाहीर देऊन पुणे , सुपे , बारामती , इंदापुर व बारा मावळे यांचा सरंजाम दिला३ . परंतु त्याच वेळी आदिलशहाने त्याच्या फायदयाची एक महत्वाची गोष्ट केली , ती म्हणजे , पुणे प्रांताची सरंजामी दिलेल्या शहाजी राजांस पाठवीले कर्नाटकात , विजापुरच्याही दक्षिणेकडे आणि पुणे प्रांताचा कारभार सोपविला आपला विश्वासू माणुस दादोजी कोंडदेवाकडे ! म्हणजे विजापुरकराने शहाजी राजांची जहागिरी कायम ठेवली परंतु विजापुरकरांकडे नोकरीस असलेल्या दादोजी कोंडदेवाकडे परगण्याचा कारभार पाहणेसाठी आला४ . यावरुन दादोजी कोंडदेव कोणासाठी काम करीत होता हे लक्षात येते . तत्पुर्वी म्हणजे सन १६३६ च्या अगोदर पुणे परगणा निजामशहाकडे शहाजी राजांची जहागीर म्हणुन होता . तेव्हा त्याचा कारभार शहाजी राजांकडेच होता . त्यावेळेस दादोजी कोंडदेव विजापुरकरांचा चाकर असल्यामुळे त्याचा शहाजी राजांशी तथा शहाजी राजांतर्फे पुणे परगण्याच्या कारभाराशी संबंध नव्ह्ता . मुरार जगदेवाने पुणे जाळल्यापासुन पुढे सात - आठ वर्षे कसबा ओस पडला होता५ . शहाजीराजे आदिलशाहीत आल्यानंतर , त्याचा कारभार दादोजी कोंडदेवाकडे आल्यानंतर म्हणजे इ . स . १६३६ - ३७ नंतर दादोजीने पुणे , इंदापुर व सुपे परगण्यांचा कारभार विजापुरकरांसाठी इमाने - इतबारे हाकण्यास सुरुवात केली . तत्पुर्वी पुणे परगण्याची स्थिती अत्यंत वाईट होती . त्याने त्यानंतर जंगली श्वापदांचा नायनाट करुन शेतीस उत्तेजन दिले . त्याने मलिक अंबरची महसुलाची पध्द्त - मलिक अंबरी धारा - स्वीकारुन विजापुरकराच्या खजीन्यात भर घातली व शहाजी राजांच्या जहागीरीत सुधारणा केली६ . दादोजीच्या या इमाने इतबारीच्या सेवेबद्दल विजापुररांनी त्यास कोंडाण्याची सुभेदारी दिली . दि . २६ जानेवारी १६३८ मध्ये त्याने तंट्याबद्दल दिलेला एक महजर आहे . त्यात दादोजी कोंडदेऊ सुभेदार किल्ले कोंढाणा असा ऊल्लेख सापडतो७ . त्याचप्रमाणे कोंढीतचा मोकादम बाबाजी नेलेकर याच्या हातुन गावची लावणी होइना यामुळे जनाजी खैरे व रुद्राजी जाधव परिंचेकर यांना मोकादमीचा वाटा देऊ करुन त्यांनी काम चालवील्यामुळे उत्पन्न झालेल्या तोट्याबाबत दिलेल्या महजरात दादोजी कोंडदेव सुभेदार८ असा उल्लेख सापडतो .
मी मे २००९ पाहून ओंन लाईन बिल भरतो आहे . अतिशय छान व जलद सुविधा . केवळ ग्राहक क्रमांक टाकून पटकन बिल भरता येते . तसेच User Registration केले तर मागच्या बिलांचा Graph पण पाहता येतो . URL : http : / / billing . mahadiscom . in /
टीका करणे सोपे आहे हे नेहमीचे वाक्य अशावेळी आठवते .
एक चांगला कल्पवृक्ष कोसळला , . ह्या जेष्ट समाजसेविकाना आमचा लाख प्रणाम . , त्यांच्या आत्म्यास शांती लाभो .
गेली अनेक दिवस साप्ताहिक मंत्रिमंडळ निर्णय अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित केले जात नव्हते . याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला असता आज पासुन हे नियम पुन्हा नियमित प्रकाशित केले जात आहेत .
जानकारी और संगीत वीडियो के लिए धन्यवाद . आनंद आ गया . अगर कलाकार का नाम भी पता लग जाता तो क्या खूब होता .
दर्शन घेउन इथुनच मग आम्ही दुसर्या टोकाकडे असणार्या " जटा " मंदिराकडे वळालो . . इथे शंकराने आपल्या जटांमधील गोदावरीला बाहेर काढण्यासाठी तांडवनृत्य करत जिथे जटा आपटल्या होत्या तिथे वळ उमटलेले दिसतात असे ऐकुन होते . . त्यामुळे उत्सुकता होती . . हे देखील छोटेच मंदिर आहे . . आत प्रवेश करताच एका बाजुस दोन खड्डे दिसतात जिथे म्हणे शंकराने आपले गुडघे टेकवले होते तर एका बाजुस खडकावरती त्या जटांच्या खुणा दिसल्या . . तिथेच गोदावरीचे पाणी झिरपताना दिसते . . ! ! - - - - - - - - - - - - - - - - - - -
राजसाहेब आपले म्हणणे चुकीचे नाही . पण त्याआधी तुमच्या नऊ आमदारांनी विधानसभेत काय काम केले ते सांगा ना ? सभा हे भाषण करण्यासाठी असते आणि विधानसभा हि लोकांचे काम करण्यासाठी असते . तुम्ही तुमचा हिशेब आधी सांगा . तुम्ही चांगले काम केले तर लोक तुमच्या हाती सत्ता देतील आणि काम न करता कॉंग्रेस शी गुप्त समझोता करत राहिलात मैदाने भाषणासाठी मिळून सुधा घरी जावे लागेल . कोर्टाला मैदाने काय मागता , विधान सभेचे मैदान गाजवा
या सगळ्या उद्विग्नतेतून एका रात्री आजूबाजूचे सगळे खुळे सहकारी ( पाटण्याला मर्ढेकर सरकारी वसतिगृहात रहात ) झोपी गेल्यावर शांततेत कवीला आपल्या पहिल्या पत्नीची आठवण येते . आजुबाजूचे जग , आकाश आणि दूरवर पसरलेले अंतराळ कवी शब्दात लिहितो . स्वतःच्या प्रतिभेबद्दल तो ' इश्वराचे देणे ' असे म्हणतो . पण ऑफिसचे खर्डेघाशी काम करताना त्यात प्रतिभेपेक्षा प्रयास ज्यास्त आहेत . उशीर झाल्याने त्या प्रयासांना पण पेंग आली आहे पण संसारासाठी ते करणे गरजेचे आहे . कामात चुका काढतील , त्रास देतील म्हणून भ्यायचे तरी किती . त्याचे काय भले व्हायचे ते होवो . आजुबाजूची सगळी वेडीवाकडी मने . माझ्या कामांना चाळण्या लावून , चौकशा करून विचारांतली मातीच दाखवत आहेत . प्रतिभा आटत चालल्याने माझा खुजा तारा झाला आहे . अशात जर खटल्यामुळे बदनामी झाली तर तो काळाही होईल . पण या सगळ्याशी अलिप्त अशी विश्वाची शक्ती निळ्यावायूतून आपली वाट संथपणे कापत आहे . या अशा वेळी तू तुझ्या करिअरसाठी ( आंबोण ) आपल्या दोघांच्या सुखांना ( चंद्र ) मागे ठेवून का गेलीस ? तुझी सगळ्यात ज्यास्त गरज असताना अशी अवेळी का गेलीस ? होमाय यांच्यावरचे मर्ढेकरांचे हे उत्कट प्रेम त्यांच्या ' दवात आलीस ' , आणि ' रहा तिथे तू ' या कवितेंमध्येही दिसते .
गाडी हायवेवर आली होती . " मी तुला आयुष्यात खूप सुखी ठेवेन . कधीही काहीही वेळ आली तरी तुझा हात सोडणार नाही , हा मी दिलेला शब्द आहे . जगातल्या कुठल्याही रिती रिवाजापेक्षा , नात्यापेक्षा आणि संस्कारापेक्षा महत्वाचा . माझा शब्द . . . माझं वचन . असंच एक वचन डॅडने आईला दिलं होतं आणि पंचवीस वर्षापर्यन्त निभवलय . सात फ़ेरे त्यानी कधीच घेतले नाहीत . सप्तपदीपण चालले नाहीत . " नातिचरामि " अशी शपथ कधीच घेतली नाही . पण त्याचं पालन मात्र केलं . "
आत्ता या रस्त्याने जाताना ते सर्व आठवून आणि ३ महिन्यानंतर आपली पण अवस्था अशीच होणार या कल्पनेनेच अंगावर सरसरुन काटा आला . खरंतर मी या असल्या निराशावादी विचारांच्या अगदी विरुध्द आहे . तसा परिस्थितीला शरण जाणार्यांपैकी मी नाही . पण येथून दर वर्षाला एक कंपनी बंद तरी पडत होती किंवा बाहेर तरी जात होती . हजारो कामगार बेकार होत होते . कधी थांबणार हे सगळे , कोणास ठाऊक . आता आमची पाळी दिसतेय !
आता क्र २ सुरु केला आहे अभ्यास . पिकअप चांगला वाटतो आहे . नववीत शिक्षण सोडले आहे . इंग्रजी आणि गणिताची भयानक भिती आहे . ( गणिताची तशी तर मलाच अॅलर्जी आहे . पण आता अंगावर पडल्यामुळे भिऊन जाऊ कुठे ? ) सापशिडीसारखी गत असते कायम . २ घरं पुढे , ४ घरं मागे . साम , दाम , दंड सर्व वापरावे लागते . आधीच्या अनुभवामुळे मीही बर्यापैकी शिकवू शकते आहे . पाहुयात . सध्या माझे ' इंग्रजी भाषा अतिशय सोपी आहे ' हे बीजभाषण मध्यरात्रीच्या झोपेतून उठुन तयार असते .
मागे ३ - ४ वर्षापुर्वी अभिशृती ह्यांनी माबो वर एक लेख लिहिला होता . त्यात त्या म्हणाल्या होत्या . . . कुठे थांबायचे हे कळले म्हंजेच शिक्षणाचा उपयोग झाला असे समजायचे ! . . . पण हल्ली शिक्षण संस्था चालवुन पन डोक्यात उजेड नाही ! दिव्याखाली अंधार् . दुसरे काय ! !
सुर्याच्या अंतरंगात ( किंवा त्याच्या वातावरणात ) सामान्यतः हायड्रोजन ( ९० % ) आणि हेलिअम ( ९ % ) असते , प्रयोगशाळेत या वायुंना देखील रंग नाही , अशी निरिक्षणे आहेत .
मेघा मुळ्याचे बी पेरले आणि मुळ्याला ५ - ६ पाने येउन ती थोडी मोठी झाली की मुळा काढायचा असतो . लगेच होतो मुळा अगदी १५ दिवसांत काढता येतो . आता नव्याने बी लाव .
राजेंद्र आमिरचा घजनी आल्याबरोबर बर्याच तरूणांनी ' घजनी कट ' मारला . ते पाहून नाक मुरडणारे त्यांचे काका - मामा म्हणाले , " काय ही आजकालची पोरं ! काहीतरी फ्याड आहे झालं . " अर्थात ते त्यांच्या काळात देव आनंदसारखा केसांचा कोंबडा ठेवत होते ते सोडा . पण खरेच ही गोष्ट फ्याड म्हणून सोडून देण्याइतकी क्षुल्लक आहे का ? की यामागे काही वेगळेच कारण आहे ?
चक्रव्यूहात शिरण्यापूर्वी मी कोण आणि कसा होतो हे मला आठवणारच नाही . चक्रव्यूहात शिरल्यानंतर मी आणि चक्रव्यूह यात फक्त होती जीवघेणी जवळीक हे मला कळणारच नाही . चक्रव्यूहाबाहेर पडल्यावर मी मोकळा झालो तरी चक्रव्यूहाच्या रचनेत फरक पडणारच नाही . मरावं कि मारावं मारलं जावं की जीव घ्यावा याचा कधीच निकाल लागणार नाही . झोपेतला माणूस झोपेतून उठून जेव्हा चालायला लागतो तेव्हा स्वप्नातलं जग त्याला पुन्हा दिसणारच नाही . निर्णायक प्रकाशात सगळं सारखंच असेल का ? एका पारड्यात षंढत्व दुसऱ्या पारड्यात पौरुष आणि तराजूच्या काट्यावर नेमकं अर्धसत्य ? - दिलीप पुरुषोत्तम चित्रे ( एकुण कविता - २ ) भयानक दाट पोकळीत हरवल्यावर गरगरत्या आवर्तात असल्या भयानक कविता का आठवाव्यात ? कुठलंही नातं चक्रव्यूहासारखं का भासावं ? कि प्रत्येक नातं भयानक मोहक असतं - ज्याचे धडे गर्भातच मिळतात - आणि बाहेर आल्यावर नुस्ती एका नात्यातुन दुसरीकडे ओढाताण , फरफट ? अर्धसत्यापासुन स्वत : ला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात सत्य - असत्याच्या भेदाने एवढं कन्फ्युजन का व्हावं ? जगातल्या - आणि स्वत : तल्याही - पीटर कीटिंग्जचा कुठल्याही हॉवर्ड रॉर्कवर एवढा खार का असावा ? मन मनास उमगत नाही - आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा - हातास कसा लागावा ? गर्भाशयात असह्य झालो की बाहेर तिथं असह्य नकोसे झालो की अजुन पुढे तिथे तिथूनही सर्वत्र बोचू नाही म्हणून अजून अजून पुढे पुढे पुढे लांब लांब लांब दूर होत गर्भाशयापासून अगोदरच्या प्रत्येक सहन करुन शकत नाही हे सगळं स्वत : सकट आवडीनिवडीच्या हवाल्यावर नेहमीच आपलं अस्ताव्यस्त गबाळ आखडुन घ्यायला बघतो वेळ आल्यावर म्हणून होऊ शकत नाही आपलं समूळ स्थलांतर दुसरीकडे एकदम एखाद्या परग्रहावर जाईन मी त्यापेक्षा फट्कन सगळं नवं अपरिचित कोरं वस्तु व्यक्ती त्यांचे प्रकार वेगळे लैंगिकतेच्या प्रजननाच्या पद्धतीही विनिमय चलनवलन चालीरिती व्याख्या वेगळ्या नवी नाती मूल्यं धेयं जातीपाती नीतिरचना यशापयश सुखं दु : खाच्या कल्पनाही वेगळ्याच वेगळ्या संवेदना , अनुभव तो घ्यायच्या पद्धतीही ज्ञान - अज्ञान वेगळं संवेदनांच्या फल : श्रुतीच वेगळ्या विश्वाच्या श्रेयाच्या ज्ञानाच्या न्यायाच्या सौंदर्याच्या करुणेच्या कल्पनाच वेगळ्या त्यांच्या जागाही तिथं थियरींच्या थापा कशा मारतील तिथं शोध कसे लागतील तिथं कविता कशा करतील वाङ्मय कसं असेल विषय काय असतील मृद्गंध कसा असेल तिथं पाऊस पाणी एच२ओ च असेल असं नाही पदार्थ रेणूसूत्रं अणुभार अणुक्रमांकही कसे ? हायब्रिडायझेशनच्या बॉडिंगच्या एनर्जीस्टोरेज - डिस्ट्रीब्यूशन - कक्षा सुद्धा कशा इथल्यापेक्षा चवी रंग पोत पैस कसे कसे तिथं मी सजीवांना - नीर्जीवांना जे कोणी जे कसे असतील त्यांना नव्या भाषेनी हाक मारीन नातलग करीन माझ्याळवीन लिपिन ते माझ्या विश्वजाणीवेचा अतूट अंश असतील आम्ही पूर्ण क्षमतेनी पणाला लागलेले असू मी त्यांना माझ्याळवीन मी मला त्यांच्याळवीन - सलील वाघ - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - बहुतेक रद्द केलेला पिक्चर , आणि जागुन काढलेल्या रात्रीचं सार म्हणजे - सगळा जमाखर्च बघण्यासाठी जुनी कॅलेंडरं घेउन बसल्यावर समजतं आपण किती निरर्थक भर्कटतो निष्पर्ण झाडांतून सरकत जाणारा चंद्र नदीत तरंगणारी इमारतींची प्रतिबिंब समुद्र आकाश टेकड्या विजा सूर्य तारे भावल्यांसारखी माणसे अन पावसाळे हे सगळेच असतात पुन्हा पुन्हा येणारे तरी क्षणांच्या चिमटीत पकडता आलं नाही यातलं सगळंच आपल्याला त्यांनी एकमेकांना दिलेल्या शिव्यांचाच आपण अभ्यास केला इमान्दारीत उगीच जबडे दुखावले प्रश्नांच्या बडबडीनी अन पळ काढला खरी उत्तरं आली तेव्हा भीतीनी बसून राह्यलो कवितेच्या टिकाऊ वळचणीला बेमालूमपणे - सलील वाघ व्हईल ते जाईल . . . . .
कॉलेजमध्ये असताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांहून अगदी मोकळी अनौपचारिक आणि स्वतंत्र अशी त्यांची वागण्याची पद्धत होती . दडपण , संकोच अशा गोष्टींचा त्यांच्या ठिकाणी मागमूसही नव्हता . त्यांच्या वागण्याला उचित मर्यादा अवश्य होत्या व त्या ते स्वयंप्रेरणेने पाळत असत . त्यांच्यामध्ये केवळ बौद्धिक विषयांतच नव्हे तर वेगळी अशी अभिजात रसिकता आणि कलांविषयी मार्मिक जाणही होती . त्या काळात मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रांत होणारे अनेक जलसे , संगीताच्या मैफली , नाटके , कला प्रदर्शने यांचा आस्वाद ते घेत असत . एल्फिस्टन कॉलेजात वसतिगृहात विनोद आणि त्यांचे मित्रवर्य प्रो . दामले यांचे रात्रीच्या जेवणानंतर सुरू झालेले चर्चासत्र पहाटेपर्यंत रंगलेले असायचे . चर्चेचे विषय . . अभ्यासक्रमाबाहेरचे , अनेक ग्रंथांवर - कूट प्रश्नांवर थोडक्यात म्हणजे Everything Under the Sun असे असत . विश्वाच्या पसाऱ्यातील कोणतीही क्षुल्लक वाटणारी घटना किंवा कल्पना पूर्णपणे समजून घ्यायची असेल तर तिच्या मुळाशी जाऊन अधिकाधिक विचार करायला लागते . नंतर आपोआपच इतर अनेक महत्त्वाच्या व आनुषंगिक गोष्टींचा विचार करायला लागतो , हे लक्षात घेऊन त्यांची चर्चा सांगोपांग होत असे . श्रेष्ठ संस्कृत वाङ्मयामधल्या आवडलेल्या ओळी मोठ्यांदा येता - जाता म्हणणे हा त्यांचा आवडता उद्योग होता . चर्चा करताना आपले म्हणणे ते काहीसे अतिशयोक्तिपूर्ण आणि Paradoxical पद्धतीने बोलायला सुरूवात करीत व मुद्दे मांडीत . कुणी जर मत विचारले तर ते स्पष्ट , मनमोकळं , नि : संकोच आणि दिलखुलास , कौतुक आणि टीका असे दोन्ही व्यक्त करीत असत . त्यांना खेळाची आवड नव्हती पण संध्याकाळी समुद्रकिनारी फिरायला जाणे त्यांना आवडत असे .
कधी कधी जेव्हा blur अथवा light trails effect किंवा धबधब्या मधील पाणी दुधासारखे दिसायला हवे असते तेव्हाही shutter जास्ती वेळ उघडे ठेवून तो साधता येतो . दिवसा shutter जास्ती वेळ उघडे ठेवून फोटो काढायचे असल्यास lens वर filter लावावे लागते जेणेकरून प्रकाश कमी प्रमाणात film वर पडेल .
चांगली कल्पना आहे . पण ते " एखाद्या सदस्याला त्रास न देणे हा नियम आहे का ? " ह्यावर अवलंबून आहे .
३ ) रामदास आठवले : - राजकीय पार्श्वभूमी असून ही आपली मते संथ लयीत आणि खर्जातील आवाजात स्प्ष्टपणे मांडणारा असा हा नेता . राजकीय प्रतिमा काही असो , माणूस मनाला भिडला . आठवले पूर्ण निर्व्यसनी आहेत ही नवीन माहिती म्हणजे सुखद धक्काच होय
आमच्या दुनियेत अस लई जीव हाईत ज्यांना कुणीच नाही . एका घासाकरता हे जीव रडतात . त्यांना घास द्या . प्ररतेकाचे भोग संपल्यावाचुन त्यांना गती नाही . माणसात ताकद नाही की यांचे भोग संपवु शकेल . पण एक घास दिला तर त्यांची तळमळ तर थांबल . सगळे जीव हे बोलु शकत नाही . बोलाव म्हणल तर ऐकाया कुणी नाही . ऐकल तर विश्वास ठेवणारे कमीच . अन विश्वास असणारे , ध्यानात ठेऊन घास देणारे त्याहुन कमी .
प्रत्येक पुस्तक वाचले पाहिजे , असे माझे मत नाही . श्री . चंद्रशेखर यांनाही हे ठाऊकच आहे . " पुस्तक वाचणार नाही " पुढे ते ही सुयोग्य पुरवणी जोडतात :
Sashal आपन की कि काहि मुथभर सन्धिसाधु ( राजकारनि ) लोकानि ? आनि आपन त्याचे मूक प्र्केक्शक ?
मायंदे साहेब , माझे तुम्हाला थेट प्रश्न आहेत की , सरसकट सर्व महाराष्ट्रीय शेतकर्याला फुकटात काय मिळते ? ते कोण देते ? विद्यापीठ देते की कुलगुरू देते ? शासन देते की शासनकर्ते देतात ? किती देतात ? कोणत्या स्वरूपात देतात ? निदान चालू आर्थिक वर्षात शेतकर्यांना फुकट वाटलेल्या रकमेचा आकडा सांगा . त्या रकमेच्या आकड्याशी महाराष्ट्रातील एकूण शेतकरी संख्येचा भागाकार करा . दरडोई मिळणारी रक्कम किती , रुपयात की नव्या पैशात तेही जाहीर करा .
कारण ( ३ ) मानणारी व्यक्ती उपक्रम संकेतस्थळावर बहुधा सापडणार नाही : - )
पावसाळ्यापर्यंत राहील आणि नंतर वाढेल . सांगायला या लल्लू लोकांची काय गरज आहे . शहाण्यांना ते आधीच माहिती आहे .
नव्यांचे काय ? या नव्या आणि काही एक होऊ इच्छिणार्या संकेतस्थळाची अशी वाताहात होऊ नये अशी मनापासून इच्छा आहे . - - - सहमत आहे . याबाबतीत तात्यांशी बोलणे झाले आहे माझे मागे एकदा व्य नि तून . तो व्य . नि आणि त्याला तात्यांचे उत्तर आणि नवीन सदस्यांचे काय होत असेल , या प्रश्नाला तात्यांचे उत्तर येथे वाचता येईल . सहजराव , तुमच्या कवितेतील प्रश्नांची उत्तरेही त्याच दुव्यावर मिळतील , असे मला वाटते . तुमची आणि इतर सदस्यांचीही व्यथा अगदी समर्पकपणे , समयोचितपणे मोजक्या शब्दांत मांडलीत , याबद्दल तुमचे कौतुक वाटते . ( दुवादार ) बेसनलाडू
पण समजा , देवाला गणित येत असेल आणि तोही पती हा पत्नीपेक्षा मोठा हवा असा पूर्वनियम पाळत असेल तर तो पत्नीला कशाला पुन्हा जन्माला घालेल पती आधी ?
जल कमी की समस्या पर काम करें कंपनियां - कोका कोला
ही आम्च्या धन्याची गोष्ट . धन्या डीग्रीला आसताना धन्याची चांदी म्हयिस म्हातारी झाल्यापाय म्येली . धन्याचं बारकं भाव पन डाकटरी बिक्टरी शिकायला ग्यालावर धन्याच्या बाबानी ढॉरा कमी केली घरची . सॉना कालवड आता गाय झाली व्हती . आनी राकायला कोन नाय म्हनून त्याज्या मामाच्याच गावाला परत न्हेलं . नाय म्हनायला गवरी घरी व्हती . धन्याच्या बाबानी ती मारायला येते म्हनून तिला यिकायची म्हनून ठरवली व्हती . पन धन्यान तसा काय करुन दिला नाय . धन्याचा तिज्यावर लय जीव व्हता . फुडं धन्या आमेरिकंला आसताना धन्याच्या बाबानी धन्याला येक दिवस फोनवर सांगितला का गवरीला यिकून टाकली . लय मारायला यत व्हती . . . .
उदय जी , मोहन दास कि अभिनेत्री का साक्षात्कार करने का अवसर आज समाज में रहते हुए मुझे मिला था कामरान से भी बात हुई थी . . जब यह फिल्म फिल्मोत्सव में चर्चा का विषय बनी थी , आज आपकी पुरानी पोस्ट में भी एक ताजगी है . और एक गंभीर प्रश्न भी . आजकल कुछ लेखक ही ऐसे जिनकी लेखनी में बेबाकी है , जो इस तरह से लिखते हैं . एक शिकायत भी है . मोहनदास को साहित्य अकादमी मिलने पर मैंने आपका भी साक्षत्कार लिया था लेकिन आपने इस प्रसंग का उल्लेख नहीं किया . ईश्वर आपका साहस बरकरार रखें . ३२वी सालगिरह कि अग्रिम बधाई .
डोंबिवली - मुंबईतील बिल्डर अंबरनाथ - शीळ मार्गाने काल रात्री उशिरा गाडीने घरी परतत असताना अनोळखी मारेकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला . या घटनेत गाडीचा चालक जखमी झाला आहे . त्याला डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . मुंबईतील बिल्डर संजय दरगड यांचे बदलापूर येथे इमारत बांधण्याचे काम सुरू आहे . काल ( ता . 21 ) रात्री उशिरा ते अंबरनाथ - शीळमार्गे गाडीने मुंबईला जात होते . त्यांच्या गाडीचा काही लोकांनी पाठलाग केला . पाठलाग करणाऱ्यांनी गाडी अडवून गाडीच्या दिशेने गोळीबार केला . यात चालक उमेश रमेश कोंडलेकर ( 23 रा . बदलापूर ) याला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला . या वेळी गाडीत असलेले बिल्डर दरगड यांनी गाडीचा दरवाजा उघडून जीव मुठीत धरून रस्त्याने पळाला . ही घटना अंबरनाथ - शीळ मार्गावरील हेदुटणे गावानजीक घडली . चालक उमेश कोंडलेकर याच्या डाव्या खांद्याला आणि बरगडीला गोळी लागली असून , त्याला उपचारासाठी डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे , अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त मारोतराव टकले यांनी दिली .
तुम्हाला घटनाच मान्य नाही तेथे तुमचे युक्तीवाद बरोबर का चूक याबद्दल काय बोलणार ? ते निव्वळ स्वतःच्या घटना बायपास करण्याच्या युक्त्या बरोबर आहेत हे दाखवण्यासाठीचे वाद आहेत .
हा हा हा . . आज पाहिला हा लेख ! पोह्याच्या उकडीबद्दलच लिहिलेलस , म्हणजे स्वस्तात सुटलीस वर्षा ! ( इमॅजिन आपण काय काय लिहू शकतो )
एक दिवस आई मला शाळा सुटल्यावर आणायला वेळेत आली नाही . माझे वय असेल तेव्हा साधारण चार - साडेचार वर्षांचे . शाळेच्या दारात साधारण १० मिनिटे उभे राहून कंटाळल्यावर मी सरळ दप्तर उचलले व आपली आपण टिळक रोड ओलांडून घरी आले . मोठ्या विजयी मुद्रेने व अपेक्षेने आईकडे बघितले , वाटले की आपले आता मस्त कौतुक होणार ! कसले काय ! ! घरी अचानक पाहुणे आल्यामुळे आईला निघायला उशीर झाला होता . तिने त्या पाहुण्यांसमोरच अस्मादिकांच्या पाठीत रट्टा दिला व माझा हात धरून तरातरा उलट पावली मला शाळेत घेऊन गेली . तिला माझ्या मुख्याध्यापकांना , म्हणजे पिले सरांना जाब विचारायचा होता . पिले सर शाळेच्या इमारतीतच खालच्या मजल्यावर राहात . आम्ही तिथे पोचल्यावर पाहिले की शाळेचे मुख्य गेट आतून बंद होते . मी कंबरेवर हात ठेवून जोरात , खणखणीत स्वरात हाक मारली , ' ' ओ पिले , माझ्या आईला तुमच्याशी बोलायचंय . . . . बाहेर या . ' ' आता गोरीमोरी व्हायची आईची पाळी होती ! बिचारे पिले सर , काहीही बोलले नाहीत , आम्हाला आत घेतले , आईचे म्हणणे ऐकून घेतले आणि माझ्या ' ' ओ पिले , मला घसरगुंडीवर खेळायचंय , ' ' ला मुंडी हालवून संमतीदेखील दिली ! !
माझ्या भाचरांना ही गोष्ट आवडली की नाही ते नक्की कळवा . अजुन एक सांगेन मग
मागच्या दारात खूप पाचोला साठलेला होता , दररोज झाडला तरी तो रोज जमा व्हायचा , तसाच पुढे गेलो , समोरच्या विहिरीमागच्या पिंपळाच्या पारावर पाय सोडून बसलो , हा पिंपळ खूप अवाढव्य , मिठीत मावणार नाही असा त्याचा बुंधा , एव्हड मोठ खोड असल तरी त्याची साल अगदी ताजी तवानी होती , कुठेही वार्धक्याच्या खुणा दिसत नवत्या , त्याच्या खोडावर शिरा ताठल्यावर जशा कातडी सोडून वर येतात तशा त्याच्या मोठाल्या नसा दिसत होत्या , त्या बुंध्यावर हळुवार एका रांगेत बारीक बारीक मुंग्या चालल्या होत्या , वर खूप खूप फांद्या होत्या , त्या सर्व पानांनी भरून गेलेल्या दोन्ही हाताचे तळवे एकत्र जोडाव्या एवढी काही काही पान , तसच काही नुकत्याच जन्मलेल्या पोरांच्या लालबुंद गालासारखी सुद्धा पान होती , पिंपळा समोरच ती मोठ्या आकाराची विहीर . पाणी खूप खाली गेलेल , तसा ह्या विहिरीला खूप पाणी फक्त पावसाळ्यात , बाकी वेळेस ५ ते ६ पुरुष खोल पाणी असत , विहीर तशी १२ ते १३ पुरुष खोल , चांगली दगडी बांधकामाची , त्यात गोलाकार वर येण्यासाठी चाल सोडलेली . मी भाऊला त्या चालीवरून अर्ध्यावर खाली जाऊन पाण्यात मूठ मारताना पाहिलंय . मूठ म्हणजे मांडी घालून पाण्यात उडी मारणे , जेव्हा पाण्यात अशी उडी मारतो त्या वेळी खूप मोठा पाण्याचा आवंढा वर येतो , आणि बुद्दुक असा दोनवेळा आवाज करून सगळ पाणी हलून ठेवतो , भाऊ तसा पट्टीचा पोहणारा . ह्या विहिरीला दोन फेऱ्या जरी मारल्या तरी दम लागायचा एवढी मोठी आहे हि . परामागे खूप अडचण होती . टनटनीची खूप मोठी झुडूप होती , जीथ कात्यांमुळे जातासुद्धा येणार नाही अशी .
आमच्या गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे मासिक " काव्यसंध्या ' कार्यक्रम काल , शनिवारी पार पडला . प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी कविमित्रांची ही मैफल जमते . गेली चार वर्षे . प्रत्येक वेळी त्याच उत्साहाने , तेवढ्याच दमदारपणे . सर्व प्रकारच्या कविता तिथे सादर केल्या जातात . हसविणाऱ्या , काळजात रुतणाऱ्या , कुणाला प्रीतीत न्हालेल्या मुग्ध क्षणाचे आठव रोमरोमी हुळहुळवणाऱ्या , कुणाचे विसरू म्हणणारे सल जागविणाऱ्या , अवखळ बाल्याचे आल्हाद फुलविणाऱ्या , तर कधी समाजातल्या दाहक वास्तवाची आच पेलणाऱ्या , कारुण्याचे आर्त प्रकटवणाऱ्या . ही संध्याकाळ काव्याच्या असीम सामर्थ्यानिशी भेटते . कधी खूप आनंद देऊन जाते , कधी अस्वस्थतेचे बीज उरात पेरून जाते . तिच्या सर्व रंग - भावानिशी मैफलीत सहभागी होणाऱ्या , रमाणाऱ्या सर्वांना मात्र ती नेहमी हवीहवीशीच वाटते .
मंदार् . . खूप सुरेख लिहितोयस ही मालिका . . गोल्डी ला कोण विसरू शकणार . . गाईड तर आमचं बायबल आहे . . आठवड्यातून एकदा पाहिलाच पाहिजे . . तू वर लिहिलेले सर्व सिनेमांची डीवीडीज आहेत आमच्या कलेक्शन मधे . . तुलसी सोडून आता या मालिकेतील तिसरा लेख कोणावर लिहिणारेस् . ही उत्सुकता लागून राहिलीये
श्याम सुन्दर चौधरी पताः एच - 61 / 4 , साहनी कालोनी , केन्ट , कानपुर - स्मृति शेष - कानपुर की होली ( लेखनी अंक 1 - वर्ष 2 - मार्च 2008 )
स्पायडरमॅन , हॅरी पॉटर वगैरे गोष्टीही रिअलीस्टीक नसतातच पण त्या मुलांना आवडतातच आणि प्रश्नही मनात येत नाहीत त्यांच्या . मग त्यांच्यामधे रंगून जाऊन काय मिळतं मुलांना ? कुठले संस्कार की जस्ट एंटरटेनमेंट ?
अण्णांना पाठिंबा देण्यासाठी खुनासाठी शिक्षा भोगत असलेल्या माजी खासदार पप्पू यादव यानीही उपोषण केल्याचे बातमी वाचली > > >
बंगळुरू - काँग्रेस आणि संयुक्त जनता दलाकडून सातत्याने करण्यात येणारे आरोप आणि हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदारांकडून पुन्हा हल्ला होण्याची शक्यता , यामुळे अडचणीत आलेल्या कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी . एस . येडीयुरप्पा यांनी यापुढे ऑपरेशन लोटस चालू ठेवण्याची काहीच गरज नसल्याचे स्पष्ट केले . आपले सरकार बहुमतामध्ये असल्यामुळे अशा प्रकारची मोहीम राबविण्याची कोणतीच गरज उरलेली नाही , असे मत त्यांनी व्यक्त केले .
घरी पोहचलो , अगदी नेहमीप्रमाणे पिल्लीची आई फुलटूल ( झोपेने ) झाली होती . म्हणजे आता मलाच खाली उतरून वेलकम मॅन च्या रुपात दार उघडून उठ म्हणावं लागलं . बाईसाहेब उठल्या खर्या पण आता पिल्लीला कडेवर घेऊन बेडरूम पर्यंत घेऊन कोण जाणार ? हा नेहमीचाच प्रश्न समोर उभा राहीला . अश्या अतितटीच्या प्रश्नासमोर माझा निभावच लागणार नाही हे समजून मी पिल्लीला उचलून थेट बेडरूममधे एका कडेला झोपवलं .
सगळ्यात डोक्याला किडा आणणार्या गोष्टी म्हणजे " हे वापरा व ते वापरू नका " असा उपदेश करणारे मेल्स . कोणी सांगते ' कोकोकोला ' हा उत्तम पचनास मदत करतो तर लगेच दूसर्या मेल मध्ये असते की तो ' फक्त संडास साफ करण्यास वापरतात ' . ' डिओ मधल्या घटकांनी कॅन्सर होईल म्हणून वापरणे बंद करावे तर शरीराला मेलेल्या ' उंदरासारखा वास ' येतो . तब्येतीस चांगले असताना पण ' बाहेर कापलेली फळे खातान आपल्याला पण संसर्गजन्य ' रोग होईल काय अशी भीती वाटते . कूणी ' एड्स ' चे इंजेक्शन टोचेल अशी भिती नेहमी थेटरात गेल्यावर वाटते . कुणी सांगते गररोज एक ग्लास ' वाईन ' प्या तर कोणी म्हणते ' दारूच्या एका ग्लासामागे ' तुमचे आयुष्य ३ तासांनी कमी होते [ मग मी आज जिवंत कसा ? ] . " सिगारेटचे दूष्परिणामचे ' तर एवढे मेल्स आले की आपण तर कंप्लीट सोडून दिले , " सिगारेट " नाही असे " मेल्स " वाचणे . . . . . . वास्तूशात्राप्रमाणे , फेंग् - शूई प्रमाणे मेल्समधून मिळाल्या सल्याप्रमाणे मी जर घर बांधले तर ते घर न होऊन ' एक तर ते राहण्याच्या लायकीचे राहणार नाही आणि वर ते एक एंटीक पिस बनून प्रसिद्ध होईल " आजकाल तर फोनवर येणारे अनोळखी नंबर चे कॉल ऊचलताना कोणी आपला फोन हॅक करत नाही ना अशी शंका येते कारण तसे झाल्यास तुम्हाला ' मेल्समध्ये लिहल्याप्रमाणे युरोप , कॅनडा , सोमालिया , कुवेत . . . . या थिकाणी कॉल लेल्याबद्दल ३५००० बिल येईल " .
अक्षर चोबीस परम पुनिता ईनमे बसे शास्त्र श्रुति गीता . शाश्वत सतोगुणी सतरूपा सत्य सनातन सुधा अनुपा हंसारूढ श्वेतांबर धारी स्वर्णकांति सुचि गगन बिहारी पुस्तक पुष्प कमंडल माला शुभ्रवर्ण तनु नयन विशाला ध्यान धरत पुलकित हिय होई सुख उपजत दु : ख दुरमित खोई कामधेनुं तुम सुर तरू छाया निराकारकी अदभुत माया तुम्हारी शरण गहै जो कोई तरै सकल संकट सो सोई सरस्वती लक्ष्मी तुम काली दिपै तुम्हारी ज्योति निराली तुम्हारी महिमा पार न पावै जो शारद सतमुख गुण गावै चार वेद की मातु पुनिता तुम ब्रह्माणी गौरी सीता महामंत्रे जीतने जग माही कोउ गायत्री सम नाहि सुमरन हिय मे ज्ञान प्रकाशे आलस पाप अविद्या नासै सृष्टि बीज जग जननी भवानी कालरात्रि वरदा कल्याणी ब्रह्मा विष्णु रुद्र सुर जे ते तुमसो पावै सुरता तेते तुम भक्तन की भक्त तुम्हारे जननिहिं पुत्र प्राण ते प्यारे महिमा अपरंपार तुम्हारी जय जय जय त्रिपदा भय हारी पुरित सकल मे ज्ञान विज्ञाना तुम सब अधिक न जग मे आना तुम्ही जानि कुछ रहि न शेषा तुम्ही पाय कुछ रहि न कलेशा जानत तुम्ही तुम्ही है जाई पारस परसि कुधातु सुहाई तुम्हारी शक्ति दपै सब ठाई माता तुम सब ठौर समाई ग्रह नक्षत्र ब्रह्मांड धनेरे सन गतिवान तुम्हारी प्रेरे सकल सृष्टि की प्राण विधाता पालक , पोषक , नाशक त्राता मातेश्वरी दया व्रत धारी तुम सन तरे पातकी भारी जापार कृपा तुम्हारी होई तापार कृपा करे सब कोई मंद बुध्धि ते बुद्धि बल पावै रोगी रोग रहित हो जावे दारिद्र मिटै कटै सब पीरा नाशै दु : ख हरै भव भीरा ग्रह क्लेश चित चिंता भारी नासै गायत्री भय हारी संतति हीन सुसंतति पावै सुख संपत्ति युत मौद मनावे भूत पिशाच सब भय खावै यम के दूत निकट नहि आवे जो सवधा सुमिरे चित लाई अछत सुहाग सदा सुखदाई घर वर सुखप्रद लहै कुमारी विधवा रहे सत्य सत्य व्रत धारी ज्यति ज्यति जगदंबा भवानी तुम सब और दयालु न दानी जो सदगुरू सो दिक्षा पावै सो साधन को सफल बनावे सुमिरन करे सुरूचि बडभागी लहै मनोरथ गृही विरागी अष्ट सिध्धि नव निधि की दाता सब समर्थ गायत्री माता ऋषि , मुनि , यति , तपस्वी , योगी आरत , अर्थी , चितिंत भोगी जो जो शरण तुम्हारी आवै सो सो मन वांछित फल पावै बल , बुध्धि , विद्या , शील , स्वभाउ , धन , वैभव , यश तेज उछाउ सकल बढै उपजे सुख नाना जो यह पाठ करै धरि ध्याना .
जनरल ब्रुलार्डची नियुक्ती जर्मन सेनेला फ्रान्सच्या हद्दीत पुढे येण्यापासुन रोखण्यासाठी झालेली असते . प्रत्यक्ष जबाबदारी मात्र त्याच्या हाताखालील पण तेवढ्याच तोलामोलाच्या जनरल मिराउ वर असते . जनरल ब्रुलार्डची अॅण्ट हिल या अतिशय मोक्याच्या ठाण्यावर हल्ला करुन तिथुन जर्मन सेनेला हुसकावुन लावुन तो परत कब्जात घेण्याची महत्वाकांक्षी योजना असते . अर्थात त्याची जबाबदारी जनरल मिराउ ने स्वतःच्या डोक्यावर घ्यावी अशी त्याची इच्छा असते . जनरल मिराउ मात्र ठाम नकार देतो . आपले सैन्य थकले आहे आणि सोपवण्यात आलेली कामगिरी अशक्यप्राय नसुन केवळ अशक्यच आहे अशी त्याच्या खात्री असते . अपुर्या सैन्यानिशी आणि सामग्रीनिशी हल्ला करणे , ठाणे बळकावणे आणि ते राखणे केवळ अशक्य आहे हे तो जनरल ब्रुलार्डला तळमळीने सांगतो . मात्र सैन्यात मुरलेला आणि राजकीय डावपेच कोळुन प्यालेला ब्रुलार्ड मिराउला बढतीचे गाजर दाखवतो आणि ही मात्रा अचुक लागु पडते . कामगिरी अशक्यप्राय आहे पण म्हणजे माझे सैन्य ती पार पाडु शकत नाही असे मात्र नाही . माझ्या सैनिकांनी यापुर्वी देखील अशक्यप्राय कामगिरी फत्ते करुन दाखविली आहे हे तो अभिमानाने सांगतो . एका अधिकार्याच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सैन्याची एक आख्खी तुकडी पणाला लावली जाते .
" मला दु : खी - पीडीतांची सेवा करण्यात आनंद मिळत नाही " , एक कर्मचारी उत्तरतो . झटक्यात सगळ्यांच्या नजरा ' हा आहे तरी कोण प्राणी ' हे बघायला त्याच्याकडे वळतात .
गुलझार च्या आवाजातील ही कविता इथे मिळेल का ऐकायला ?
' मनासारखं घर मिळेल . ' रविवारी सकाळी नेहमीप्रमाणं इ - सकाळ उघडून साप्ताहिक राशीभविष्य वाचलं ते हे . मनात म्हटलं , ' ज्योतिषीबुवा , भविष्य तर बरोबर लिहीलंत पण एक महिना उशीरानं . ' आपले ज्योतिषी आणि हवामानखातं , दोघांमध्येही फारसा फरक नाही कारण दोघांचीही भाकितं कधीच वेळेवर खरी होत नाहीत . नवीन घरात राहायला येऊन आता तीन आठवडे होत आले . मनासारखं घर मिळेल असं ज्योतिषीबुवांनी लिहीलं तरी टोकियो किंवा योकोहामामध्ये मनासारखं घर मिळण्यासाठी कोणत्या दिव्व्यातून जावं लागतं हे त्यांना कसं कळणार म्हणा . जपानमध्ये दोन वर्षं संपली तसा Hiyoshi International House या विद्यापीठाच्या वसतीगृहातला मुक्कामही हलवायची वेळ आली . नवीन मुलांना राहण्याची संधी मिळावी म्हणून तिथं दोन वर्षांपेक्षा जास्त दिवस राहाता येत नाही . जागा शोधताना काय काय उपद्व्याप करावे लागतात त्याचं ट्रेलर मागच्या वर्षी सिनीअर्सबरोबर जागा शोधताना पाहायला मिळालं होतं . इथं नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात एप्रिलमध्ये होते . त्यावेळी जागा मिळण्याची शक्यता अधिक असल्यामुळं त्यावेळीच नवीन जागा शोध असा सल्ला सिनीअर्सकडून वारंवार मिळाला होता . पण HIH ची well furnished room , वीज , पाणी , इंटरनेट , फोनच्या बीलाची फिकीर नाही , दर महिन्याला लॉंड्रीहून येणारे चार चकचकीत बेडकव्हर्सचे सेट , तिथला इंटरनॅशनल मित्रपरिवार , त्यांच्याबरोबरच्या वीकेन्ड मूव्हीज् , पार्ट्या अश्या five star dormitory ला सहा महिने आधीच मुकण्यासाठी कोण तयार होणार ? माझा नॉर्वेचा एक मित्र नेहमी म्हणत असे . " We are ruined by HIH . " खरंच होतं ते . We were ruined . त्यामुळं ऑगस्ट २५ म्हणजे अखेरच्या दिवसापर्यंत HIH चा किल्ला लढवायचा निर्णय आम्हा मित्रपरिवारानं घेतला . जपानमध्ये घर शोधणं सोपी गोष्ट नाही . घर शोधायला सुरुवात केली की त्याचा प्रत्यय लगेच यायला लागतो . इथं तुम्हाला थेट घरमालकाकडून घर भाड्याने मिळवता येत नाही . भाड्याच्या घरासाठी किंवा घर विकत घेण्यासाठी real estate agents कडे जावं लागतं . त्यांना ' फुदोसान् ' म्हणतात . फुदोसानला तुमच्या गरजा आणि बजेट सांगितल्यावर तो तुम्हाला त्याच्या गाडीतून तुमच्या आवाक्यातली घरं दाखवून आणतो . त्यातलं एखादं घर तुम्हाला पसंत पडलं तर मग घरमालकांच्या संमतीने तुम्हाला तिथं भाड्यानं राहाता येतं . सुरुवातीला घरात राहायला जाण्यापूर्वी घरमालकाला रेइकिन् ( Thank you money ) दोन महिन्यांचं भाडं , शिकीकिन् ( deposit , जे घर सोडताना परत मिळण्याची शक्यता कमीच असते ) दोन महिन्यांचं भाडं आणि राहायला जातानाच्या महिन्याचं भाडं असं पाच महिन्याचं भाडं द्यावं लागतं . फुदोसानला त्यानं घर हुडकून दिल्याबद्दल एक महिन्याचं भाडं द्यावं लागतं ते वेगळंच . तुम्ही नोकरी करत असाल तर ठीक . पण विद्यार्थी असाल तर वर्षभर बचत करुन किंवा part - time job करुन मिळवलेल्या सहा महिन्यांच्या भाड्याची रक्कम एका दिवसात अकाउंटमधून नाहीशी झाल्याचा धक्का पचवणं वाटतं तितकं सोपं नसतं . बरं इथल्या घरांचं भाडंही थोडंथोडकं नसतं . एवढं अव्वाच्या सव्वा भाडं देऊन घर पाहावं तर ती असते एक ९x९ ची खोली आणि टीचभर किचन . जागांच्या किंमतीच्या बाबतीत जपान जगातला सर्वात महागडा देश असावा . रेइकिन किंवा शिकीकिन हे प्रत्येक घरमालकानुसार बदलत असलं तरी साधारणपणे सुरुवातीला ५ - ६ महिन्यांच्या भाड्याची रक्कम द्यावीच लागते . तुम्ही जपानी असाल तर हे सहा महिन्यांचं भाडं भरुन तुम्हाला लगेच राहायला सुरुवात करता येते . पण परदेशी असाल तर प्रश्न एवढ्यावर सुटत नाही . ९० - ९५ % घरमालक आपल्या घरात परदेशी लोकांना भाडेकरू म्हणून ठेवून घेण्यास तयार नसतात . त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भाषेचा अडसर . शिवाय परदेशी लोकांचा बेशिस्तपणा , नियमानुसार न वागण्याची वृत्ती आणि एकंदरीतच इथं परदेशी लोकांबद्दल असलेलं discrimination अशी आणखीही कारणं असू शकतील . पण तुम्ही परदेशी आहात हा घर शोधण्याच्या मार्गातला सर्वात मोठा अडसर आहे . या सर्व गोष्टींची कल्पना असल्यामुळं थोडीफार बचत सुरु होतीच . जुलै महिना सुरु झाला तशी नवीन जागा पाहण्यासाठी सर्वांची कसरत सुरु झाली . फुदोसानकडे जाण्यापूर्वी युनिव्हर्सिटीतून काही मदत मिळते का पाहावी म्हणून ऑफिसमध्ये गेलो . त्यांच्याकडे परदेशी मुलांना राहाता येईल अशा काही जागांची माहिती होती . त्यातली एक जवळची जागा पाहावी म्हणून एका इंडोनेशिअन मित्राबरोबर जागा पाहण्यासाठी गेलो . जपानीत घरमालकाला ' ओयासान् ' म्हणतात . बहुतांश जागी ' ओयासान् ' म्हणजे मालकिणबाई असतात . फोनवरुन ओयासान् ला आम्ही येतोय असं सांगितलं . मालकिणबाई साठीच्या आसपास असाव्यात . त्यांनी आम्हाला एक खोली उघडून दाखवली आणि एकेक एकेक अटी सांगायला सुरुवात केली . त्यांचं बोलणं आणि एकेक अटी ऐकून मला ' अशी ही बनवाबनवी ' मधला सुधीर जोशी दिसायला लागला . मी आणि मित्र खोली बघत ऐकत होतो . काकूंच्या अटी संपायचं नावच घेत नव्हत्या . " इथं राहताना मोठ्या आवाजात बोलायचं नाही . गाणी लावायची नाहीत . रात्री १० नंतर मित्र रुमवर आलेले चालणार नाहीत . खोलीत अभ्यास आणि अभ्यासच करायचा . आमचे हे अधुमधून येऊन अभ्यासाची चौकशी करतीलच . खोलीत जेवण बनवणार असला तर उग्र वास येईल असं काही बनवायचं नाही . मोठा आवाज मला आणि आमच्या ह्यांना अजिबात आवडत नाही . त्यामुळं रात्री १० नंतर टी . व्ही . लावला तर हेडफोन लावून ऐकायचा . खोलीत पाळीव प्राणी आणलेले चालणार नाहीत . . . " शेवटी एकदाच्या त्यांच्या अटी संपल्या . मी कुठून आलो आहे , काय शिकतो वगैरे ऐकल्यावर त्यांनी बाल्कनी उघडून दाखवली . " मुलगा तसा चांगला आहे हो . दंगा करणा - यालातला वाटत नाही . " काकू माझ्या मित्राला म्हणाल्या . ' अरे वा ! सुधीर जोशींची एकदम काळभोर मावशी कशी काय झाली ? ' मला अचानक सुधीर जोशीच्या जागी ' अशी ही बनवाबनवी ' मधली मोतीबिंदुचं ऑपरेशन झालेली ' काळभोर मावशी ' दिसायला लागली . माझ्यातला ' धनंजय माने ' अचानक जागा झाला . " तुम्हाला एखादी मुलगी आहे का हो काकू ? " वाक्य अगदी ओठांवर आलं होतं पण मी जिभेला आवर घातला . " दोन दिवसांत मला काय ते सांग बरं का . " काकू म्हणाल्या . " ठीक आहे " असं म्हणून मनातल्या मनात मी आमचा टीपीकल आर्मी स्टाईल ' सायोनारा ' सलाम ठोकला आणि तिथून सटकलो . एवढ्या अटी ऐकल्यावर काकूंना मुलगी असली तरी तिथं राहण्याचा प्रश्नच नव्हता . तशीही ती रुम माझ्या दृष्टीनं लहानच होती . आणखी एक - दोन फुदोसानकडे चौकशी केली . पण परदेशी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे फारश्या जागा नव्हत्या . इंटरनेटवरुन काही ठिकाणी जागा शोधून तिथे फोन केले . पण तिथेही तोच प्रकार . पुन्हा एकदा युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल सेंटरमधून एका फुदोसानचा पत्ता मिळवला . त्याच्याकडे ब - याच जागा होत्या . पण प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी प्रॉब्लेम होताच . पाच - सहा घरं बघितल्यावर शेवटी लॅबमधल्या चीनी मुलाच्या शेजारची अपार्टमेंट निवडली . घर थोडं जुनं होतं पण प्रशस्त होतं . दोन मजल्यांवर वन रुम किचनच्या प्रत्येकी दोन अपार्टमेंटस् होत्या . माझी अपार्टमेंट तळमजल्यावर होती . आत जपानी पध्दतीची तातामी असलेली एक खोली होती . तातामी म्हणजे जपानी मॅट्रेस . आपल्याकडच्या चटईसारखी . गवतापासून बनवलेली . साधारणपणे सहा तातामीची एक खोली असते . अलिकडच्या घरांमध्ये wooden flooring असतं . पण अजूनही ब - याच जपानी लोकांना घरात तातामीच आवडते . त्यावर टेबल खुर्च्या ठेवता येत नाहीत . भारतीय बैठक किंवा जपानी बैठक . तातामीच्या खोलीला जोडून छोटंसं किचन होतं . तिथं मात्र flooring होतं . बाहेर कंपाऊंडच्या आत छोटीशी झाडं लावली होती . बाहेरच्या दरवाज्यापाशी एक मॅपलचं छोटं झाड होतं . आजूबाजूचा परिसरही शांत होता . एकंदरीत जागा राहण्यासाठी चांगली होती . शिवाय शेजारी लॅबमधल्या चीनी मुलाची सोबत असल्यामुळं फारसा विचार न करता हो म्हणून टाकलं . त्यानंतर मालकिणबाईंबरोबर मला कितपत जपानी बोलता येतं हे पाहण्यासाठी एक रीतसर इंटरव्ह्यू झाला . मालकीणबाई आधीच्या काकूंच्याच वयाच्या होत्या पण शांत आणि प्रेमळ स्वभावाच्या वाटल्या . त्यांची खात्री पटल्यावर कॉन्ट्रॅक्ट बनवलं आणि फुदोसाननं पुन्हा एकदा घरात राहण्यासाठीच्या आणि कचरा टाकण्याच्या अटी समजावून सांगितल्या . कचरा कसा स्वतंत्र करावा हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल . आठवड्याच्या कोणत्या वारी कोणत्या प्रकारचा कचरा टाकायचा , आणि तो कसा टाकायचा यासाठी वॉर्डाकडून मिळालेलं एक खास पुस्तक त्यानं मला दिलं . मनात म्हटलं आता असं आणखी काय काय मिळणार आहे कुणास ठावूक ? एखाद्या लहान मुलाला समजावतात तश्या कॉन्ट्रॅक्टमधल्या अटी त्यानं पुन्हा एकदा समजावून सांगितल्या . आलीया भोगासी म्हणत जड अंतःकरणानं सहा महिन्यांच्या भाड्याचं पाकिट त्याच्या हातावर ठेवलं आणि घराच्या किल्ल्या घेतल्या . शेवटच्या दिवसापर्यंत HIH सोडायला मन तयार होत नव्हतं . शेवटी ठरल्याप्रमाणं शेवटच्या दिवशी सामान हलवलं आणि नवीन रुममध्ये राहायला गेलो . हळूहळू सामानाची खरेदी आणि पत्ताबदल अशा छोट्याछोट्या गोष्टी आवरत एकदाचं बस्तान बसलं . HIH मधलं विलासी जीवन संपल्याची खंत मनात होतीच . पण दारावरच्या मॅपलनं हळूहळू रंग बदलायला सुरुवात केली तशी मनातली हळहळही दूर होत गेली . नवीन घरात गेल्याचा उत्साह टिकून आहे तोपर्यंत बाहेर थोडं बागकाम करावं म्हणतो . येताय का मदतीला ?
यु ट्यूबवरच मग या पांडेची बॅटींग बघीतली . . होतकरु वाटतो . . टेक्निक पर्फेक्ट नाही पण आत्मविश्वास तरी जबरी दिसतो . . मधे मनोज तिवारी म्हणुन एक प्लेयर आला होता . . मला वाटते १ - २ वन डे पण खेळला पण फिल्डिंग प्रॅक्टिसमधे जखमी झाला तो अजुन परत आलाच नाही . . तोही असाच पांडे सारखा आक्रमक फलंदाज होता . .
भारताने सोळा डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता . हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो . भारतीय सैन्याने जे काही अतुलनिय शौर्य या युद्धात दाखवले नि पाकिस्तानच्या सैन्याला पाणी पाजले , हे भारतीय जनता कदापी विसरू शकणार नाही असे म्हंटले गेले . मात्र आज परिस्थिती पाहता , असे काही झाले होते याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे की काय असे वाटते . कारगील युद्धाच्या वेळी चर्चगेटला , जीन्स ची स्टायलीश फाटकी पँट , अंगात यु एस ए लिहिलेला टी शर्ट व हातात पेप्सि ची कॅन घेवून " हेय व्हॉट्स् कागील ? " असे विचारणारे लोक होते ते लोण आता सगळीकडेच पोहोचले आहे की काय असे वाटावे , अशी परिस्थिती दिसून येते आहे . असे काही दिन आले की ( माझ्या सारख्या काही ) लोकांना जाग मग नंतर , " मरोत ते सीमेवरील सैनीक , पैले पैसा दिखाव " ; असा काहीसा भाव असलेला समाज पाहून अजूनच अस्वस्थ व्हायला होते .
नवी दिल्ली - लोकपाल विधेयकासाठीच्या संयुक्त समितीचे नागरी प्रतिनिधी ज्येष्ठ विधीज्ञ शांतिभूषण यांना अडचणीत आणणारी वादग्रस्त सीडी बनावट आहे . अमरसिंह या कथित सीडीचे जनक असून , यात सरकारमधील काही व्यक्तींचाही हात असू शकतो , असा खळबळजनक आरोप समितीचे सदस्य आणि शांतिभूषण यांचे पुत्र प्रशांतभूषण यांनी आज येथे केला . काही प्रभावशाली व्यक्तींकडून भ्रष्टाचारविरोधी चळवळ क्षीण करण्यासाठी आणि स्पेक्ट्रम प्रकरणाच्या खटल्याचा निकालावर प्रभाव टाकण्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला . शांतिभूषण आणि अमरसिंह यांच्यातील फेब्रुवारी 2006 मधील ध्वनिमुद्रित संवादाचा काही भाग उचलून आणि त्याला शांतिभूषण यांची वेगळ्या संदर्भातील विधाने जोडून ही सीडी बनविण्यात आल्याचा दावा प्रशांतभूषण यांनी केला . ते म्हणाले , की अमेरिकेतील ध्वनी क्षेत्रातील तज्ज्ञ जॉर्ज पॉपकुन आणि हैदराबादमधील " ट्रुथ लॅब ' या संस्थेकडे सीडी तपासणीसाठी पाठविण्यात आली होती . त्यातील 3 . 26 मिनिटांच्या संवादात सहा ठिकाणी आवाज खंडित झाल्याचा , सोयीस्कर संपादन केल्याचा आणि वेगवेगळ्या वेळी ध्वनिमुद्रित आवाज जोडल्याचा निष्कर्ष दोन्ही संस्थांनी नोंदविला आहे . शांतिभूषण यांच्या बदनामीबरोबरच स्पेक्ट्रम परवान्यासंदर्भातील न्यायालयीन खटल्याच्या निकालावर प्रभाव टाकण्याचे हे षडयंत्र आहे . काही प्रभावशाली व्यक्तींबरोबरच प्रसारमाध्यमांचा गटही त्यात सहभागी आहे . वादग्रस्त सीडीच्या सत्यतेबद्दल कोणतेही पुरावे किंवा तपास संस्थेचा उल्लेख न करता सीडी सत्य असल्याची बातमी " टाइम्स ऑफ इंडिया ' मध्ये असून , तशाच आशयाचा लेख " हिंदुस्थान टाइम्स ' या वृत्तपत्रात असल्याची टीकाही प्रशांतभूषण यांनी केली . दिल्ली पोलिसांकडून याबाबत सुरू असलेल्या तपासावर विश्वास नसल्याचे सांगून ते म्हणाले , की हे प्रकरण माध्यमांमध्ये चिघळत ठेवण्याचा आणि त्यामुळे भूषण पिता - पुत्रांनी संयुक्त समितीतून बाहेर पडावे , असाच दिल्ली पोलिसांचा प्रयत्न आहे . " न्यायालयात जाणार ' सरकारने या प्रकरणाच्या मुळाशी जावे , अशी मागणी करतानाच " अमरसिंह यांनीच ही बनावट सीडी तयार केली ' , असा आरोप प्रशांतभूषण यांनी केला . न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांवर प्रभाव टाकण्यासाठीचे हे षडयंत्र असून , आपण अमरसिंहांविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले . " " सीडीमागे सरकारमधील काही लोकही असू शकतात . तसे असल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते ' ' , असा सूचक इशारा देणारे विधान करून त्यांनी संशयाची सुई सरकारकडे वळविली . अलाहाबाद येथील जमिनीच्या वादासंदर्भात शांतिभूषण यांच्यावर कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केलेले आरोप निराधार असून , त्यांच्यावरही मानहानीचा खटला भरण्याचा इशारा प्रशांत भूषण यांनी दिला . संयुक्त समितीचे सदस्य आणि माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अरविंद केजरीवालही या वेळी उपस्थित होते . केजरीवाल यांनीही या प्रकारामागे भ्रष्टाचाराच्या विरोधातील चळवळ क्षीण करण्याचा डाव असल्याचा आरोप करीत आपल्यालाही अशा प्रकारे लक्ष्य केले जाऊ शकते , अशी भीती व्यक्त केली . समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव आणि शांतिभूषण यांच्या संभाषणाची ही वादग्रस्त सीडी आहे . " प्रशांतभूषण हे चार कोटी रुपयांमध्ये न्यायाधीशांना अनुकूल करून घेतील ' , असे शांतिभूषण हे मुलायमसिंह यांना सांगत असल्याचे संभाषण त्यात आहे . संबंधित सीडी विधेयकाचा मसुदा तयार करणाऱ्या संयुक्त समितीची पहिली बैठक होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाल्याने जोरदार खळबळ उडाली होती . सीडी बनावट असल्याचा प्रतिवाद भूषण पिता - पुत्रांद्वारे करण्यात आला होता . तसेच , याबाबत योग्यवेळी खुलासा करू , असेही सांगण्यात आले होते . मात्र , आज एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्रात ही सीडी सत्य असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषद बोलावली होती .
हॉर्न ओके प्लीज ( सॉरी मंडळी , पण ' पयलं नमन ' बाप्पालाच की नाही ? तसंच हेही ! )
४ ) खर्चामध्ये किरकोळ खर्च , बैलांचा चारा , शेतीचा इन्शुरन्स धरलेला नाही .
मा . बिपीनरावचंद्रजी कार्यकर्तेसाहेब आगे बढो , हम तुम्हारे साथ है . . .
नवी दिल्ली - भ्रष्टाचार व काळ्या पैशावरून आपण सुरू केलेले आंदोलन दडपण्याचा सरकारने प्रयत्न केल्यास आपण 11 हजार शस्त्रसज्ज अनुयायांची फौज घेऊन दिल्लीला जाऊ व सरकारचा प्रतिकार मोडून काढू , अशी धमकी रामदेवबाबांनी आज हरिद्वार येथे दिली . त्यावर रामदेवबाबांनी सशस्त्र सेना उभारल्यास सरकार त्यांना कायद्याचा बडगा दाखवील , असा इशारा केंद्रीय गृहमंत्री पी . चिदंबरम यांनी दिला . रामदेवबाबांना पाठिंबा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही सशस्त्र लढ्याच्या कल्पनेला विरोध केला . कॉंग्रेसनेही सशस्त्र सेना उभारून केंद्र सरकारच्या विरोधात लढा उभारण्याच्या रामदेवबाबांच्या योजनेचा तीव्र शब्दांत धिक्कार करून याबाबत केंद्र सरकारने कायदा व राज्यघटनेनुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे . यामुळे रामदेवबाबा व सरकार यांच्यातील संघर्ष वेगळ्याच वळणावर पोचल्याचे स्पष्ट झाले आहे . रामलीला मैदानावरील लाठीमारानंतर बचावात्मक भूमिकेत गेलेल्या सरकारला रामदेवबाबांच्या धमकीमुळे बळ मिळाल्याचे दिसून येत आहे . चिदंबरम यांनी सांगितले की , रामदेवबाबा यांनी योग शिबिर घेण्याचे आपले लेखी आश्वासन मोडून रामलीला मैदानावर हजारो लोक जमविले . खुद्द त्यांच्याही जीविताला तेथे जमलेल्या गर्दीतील काही जणांकडून धोका असल्याचे गुप्तचरांचे अहवाल होते . दिल्ली पोलिसांनी याबाबत चर्चा करूनही रामदेवबाबांनी आपला आंदोलनाचा हट्ट न सोडल्याने पोलिस कारवाई करावी लागली . सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिशीला दिल्ली पोलिस उत्तर देणार आहेत . रामदेवबाबांच्या आंदोलनामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच हात असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला व बाबांच्या योग शिबिर किंवा आंदोलनात पडण्याचे संघाच्या राष्ट्रीय प्रतिनिधी सभेला काय कारण आहे ? असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला . अण्णा हजारेंच्या नागरी समितीने अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना दूरचित्रवाणीवर समोरासमोर चर्चेचे आवाहन केले आहे . त्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले . देशाचे अर्थमंत्री अशा चर्चांसाठी टीव्ही स्टुडिओत जाऊ लागले , तर मग संसद कशासाठी आहे ? अशी विचारणा त्यांनी केली . दिल्ली पोलिसांना जनतेने समजून घ्यावे , असे आवाहनही चिदंबरम यांनी केले . मात्र , ज्यांच्या अनुयायांवर लाठीमार केला त्याच रामदेवबाबांना केवळ तीन दिवस आधी सरकारचे चार - चार मंत्री विमानतळावर जाऊन का भेटले ? , या प्रश्नाचे उत्तर त्यांनी टाळले . " " मी देशाचा गृहमंत्री आहे . सरकारने का चर्चा केली हे मी कसे सांगू , ' ' असे ते म्हणाले . सशस्त्र कार्यकर्त्यांची संघटना उभारण्याची कल्पना मांडून रामदेवबाबांचे खरे " फॅसिस्ट ' रूप स्पष्ट झाल्याचे सांगून कॉंग्रेस प्रवक्त्या जयंती नटराजन म्हणाल्या की , अशा लोकशाहीविरोधी घोषणा करणाऱ्या बाबांना लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या व भाजपच्या प्रमुख नेत्या सुषमा स्वराज भेटायला जातात , हे आश्चर्यकारक आहे . स्वराज यांनी यासंदर्भात भाजपची भूमिका स्पष्ट करावी . नागरी संघटनांकडून तीव्र नापसंती रामदेवबाबा आणि त्यांच्या अनुयायांवर पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महात्मा गांधींच्या समाधीवर एक दिवसाचे उपोषण करून बाबांना पाठिंबा दिला . मात्र , " सशस्त्र सेना ' स्थापन करण्याच्या रामदेवबाबांच्या घोषणेवर नागरी संघटनांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे . " " आपल्याला गांधीजींच्या मार्गाने अहिंसक आंदोलनच हवे असून , रामदेवबाबांनी अशी सेना स्थापन करण्याचे म्हटले असेल तर आम्ही त्यांच्याशी सहमत नाही ' ' , अशा शब्दांत अरविंद केजरीवाल आणि प्रशांतभूषण यांनी नागरी संघटनांची भूमिका स्पष्ट केली आहे . या मुद्यावर बाबांशी मतभेद व्यक्त करताना प्रशांतभूषण यांनी आजचे उपोषण बाबांना पाठिंब्यासाठी नव्हे , तर भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्याच्या प्रत्येकाचा मूलभूत अधिकार जपण्यासाठीच होते , असे स्पष्ट केले .
खान यांच्या पत्राच्या कथेत काही वळणे आहेत आणि विसंगतीही आहेत . ही बाब आधीच नमूद करणे आवश्यक आहे . त्यांचे पत्र ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आणि अन्य देशांतील माध्यमांमध्येही त्याचे वृत्त आल्यानंतर ( अमेरिकेमधील मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रांनी मात्र हे वृत्त लगेचच प्रसिद्ध केले नाही ! ) खान यांच्याशी संपर्क साधला गेला . हे पत्र खरोखरीच त्यांनी लिहिलेले आहे काय , असे विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला . याचा एक अर्थ असा काढला जाऊ शकतो , की पत्रातील स्फोटक मजकूर पाहता , पाकिस्तानमधील व्यवस्थेने - म्हणजेच इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सने ( आयएसआय ) - खान यांना ही भूमिका घेण्यास भाग पाडले असेल . याला जणू पुष्टी देण्यासाठीच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने " पाकिस्तान - चीन ' आण्विक संबंधांच्या वृत्ताचे स्पष्ट शब्दांत खंडन केले .
पुणे - & nbsp पुणे महापालिका व पुणे राष्ट्रीय तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 28 व 29 मार्च रोजी पुणे जिल्हास्तरावर महापौर केसरी कुस्ती स्पर्धा होणार असून विजेत्यांना एकुण दोन लाख 36 हजार 500 रूपयाची पारितेषिके व करंडक दिले जाणार आहेत . मंगळवारपेठ येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मैदानावर माती विभागात होणारी स्पर्धा पुणे शहर , पिंपरी - चिंचवड व पुणे जिल्हाताली खेळाडूंसाठी खुली आहे . खुल्या गटातील स्पर्धा 55 किलोखालील , 60 , 66 , 74 किलोखालील व 74 किलोवरील ते 120 किलो खुला अशा पाच वजन गटात तर कुमार गटातील स्पर्धा 30 , 35 , 40 , 45 व 50 किलोखालील अशा पाच वजन गटात होईल . खुल्या गटातील विजेत्यास " महापौर केसरी ' किताबासह रोख 50 हजार रूपये , चांदीची गदा तर दुसरा व तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूस अनुक्रमे 20 व 10 हजार रूपये आणी करंडक दिला जाणार आहे . तसेच प्रत्येक गटातील पहिल्या तीन खेळाडूंना रोख बक्षिस व करंडक देण्यात येणार आहेत . खुल्या गटातील विजेत्यांना एऐक लाख 60 हजार तर कुमार गटातील विजेत्यांना 76 हजार 500 रूपयाची बक्षिसे दिली जाणार आहेत . या स्पर्धेत उद्या ( ता .
काल साऊंड ऑफ म्युझिकची डिवीडी घेतली , ४० वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त काढलेली , तेव्हा तिथे मुगलेआजमची डिवीडी पण होती . . . चित्रपट पुर्ण असेल तर घेईल
१६४६ पूर्वी डचांची असणारी ही वखार इंग्रजांनी जिंकून पुढे स्वतः वापरली .
१ . सर्वप्रथम तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी काम करणार्या स्त्रियांना सुरक्षित , लैंगिक शोषणापासून मुक्त वातावरण देणे ही तुमची कायदेशीर जबाबदारी आहे हे जाणा . तुम्हाला तुमच्या नोकरीत असणारे नोकरदार कर्मचारी लैंगिक शोषणासाठी कायद्याने जबाबदार धरु शकतात .
2 ) बोईंग कंपनी - भारतीय वायुसेना कराराची रक्कम : 4 अब्ज 10 कोटी डॉलर अमेरिकेत निर्माण होणा - या नोक - या : 22 , 160 ( 650 उपकंपन्या ) ( एक वर्ष ) भारतीय वायुसेना बोईंग कंपनीकडून दहा " सी - 17 ग्लोबमास्टर 3 ' ही प्रचंड सैनिकी वाहतुक विमाने खरेदी करणार आहे .
शाळा कॉलेजात असताना परिक्षा आली कि वादळ , भूकंप , दंगल वगैरे काहीतरी होऊन परिक्षा पुढे ढकलली जावी असं वाटायचं . आता ही परिक्षा कधी एकदाची संपतिये असं झालं असताना ' वॉशिंगटन बोर्ड ऑफ प्रोफेशनल इंजीनियर्स ' चं पत्र कि मी एक फॉर्म भरायला विसरल्याने एप्रिल मध्ये परिक्षा देऊ शकत नाही ! च्यायला पोपट ! ! मी आऊच्या काऊला सांगुन ठेवलेलं माझ्या परिक्षेबद्दल . आता परत अभ्यास , परत टेन्शन , आणि ऐन फुटबॉल सीझन च्या स्टार्टला परिक्षा ! त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे ' रिव्ह्यू क्लास ' आत्ता अटेंड करतोय तो पुन्हा करावा लागणार नाही . : ) त्या रिव्ह्यू क्लासवरुन आठवलं - आयटमचं भूत ! त्याचं झालं असं कि या क्लाससाठी मला युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंगटन मध्ये जावं लागतं . पार्किंगच्या आणि ट्राफिकच्या ( जागतिक ) प्रश्नाने बरीचशी जनता बसने येते . मला बसने वगैरे जायचं म्हणजे लई वैताग येतो . मग मी रेहमान ची गाणी वगैरे ऐकत १५ मिनिटांच्या रस्त्यावर तासभर काढुन युनिव्हर्सिटीत पोचतो . पहिल्याच दिवशी वर्गात गेलो तर - आयटम पहिल्या बाकड्यावर बसलेली दिसली . मी सवयीने शेवटच्या रांगेत गेलो . आयटम म्हणजे - उंच , नाजुक , ब्राऊन ब्लॉन्ड केस , नाजुक चष्मा वगैरे . क्लासमध्ये आणखी पोरी नाहियेत असं नाही , पण मास्तर शिकवत असताना ही हरणासारखी मान पुढे ओढुन पाण्याच्या बाटलीतुन पाणी ( अर्थात नाजूकपणे ) पिते आणि ( मागच्या बाकावरुन ) समोर बघणाऱ्या अनेक माना मग आपसुक उजवीकडे वळताना दिसतात . आयटमचं पाणी पिणं , चष्मा नीट बसवणं , आसनं बदलणं - हे अडीच तास अखंडपणे चालू असतं . तर पहिल्याच दिवशी पार्किंग लॉटकडे चालत जाताना कुणीतरी तिला विचारलं - तु कुठे रहातेस ? ती म्हणे - रेडमंड . च्यायला मी पण रेडमंडलाच चाललेलो . ती बस स्टॉपकडे जाताना मी विचार केला कि तिला विचारावं का कि मी सोडु का ? म्हणजे त्यामागचा ( आणखी एक ) उदात्त हेतू म्हणजे - दोघं असल्यावर एच . ओ . व्ही . ( हाय ऑक्युपन्सी व्हेहीकल ) लेन मध्ये गाडी चालवता येईल आणि ट्राफिक आपसुकच टळेल . पण च्यायला ( तेंडल्यासारखं ) फुटवर्क आणि टायमिंग - दोन्ही गंडलं . बॉल गेल्यावर बॅट फिरली . ती बस स्टॉपकडे चालत गेली . पण तिचं भूत गाडीत येऊन बसलं ! म्हणजे झालं असं कि पार्किंग लॉटमधुन गाडी काढुन कॅम्पस रोडवर संथपणे जायला लागलो . म्युजिक सिस्टिम वर ' तु हि रे . . . . ' सुरू झालं . तेव्हा वाटलं , आयटम गाडीत असती तर मी ते पटकन बंद करुन नॅशनल पब्लिक रेडिओ किंवा तत्सम काहीतरी लावलं असतं . मग ती म्हणाली असती - असु दे ना ! ( या एका ' ना ' ने पुरुषांच्या जगात किती उलथापालथ होते हे पोरीबाळींना काय कळणार . . . . ) मग तिने मला गाण्याबद्दल विचारलं असतं . मग मी तिला म्हणालो असतो - हा पिक्चर वेगळाच . याला लव्ह स्टोरी , अ व्हायलंट लव्ह स्टोरी , किंवा लव्ह ड्युरिंग रायट्स वगैरे कसलीच विशेषणं फिट् होत नाहीत . आमच्याकडे ना , एकतर हिंदु मुसलमान वगैरे लग्न चालत नाहीत . खेडेगावामध्ये वगैरे तर नाहीच नाही . तर पिक्चरची स्टोरी अशी कि - तो , ती , निळंशार पालम्पुर , समुद्र , किल्ला . . . . किल्ला - हां . . . . तर तिथे हे गाणं घडतं . म्हणजे हा पिक्चर आला तेव्हा याच्यासारखं काही आम्ही कधी पाहिलंच नव्हतं . म्हणजे आमच्याकडे प्रेम वगैरे प्रकार असतो आणि तो आमच्या पिक्चरमध्ये रापचिक प्रकारे वगैरे दाखवतातही , पण हे म्हणजे अगदीच ' रॉ ' होतं . अगदी खरं वाटावं एवढं रॉ . . . . अजुन कशात काही नाही आणि व्याकुळ होऊन हीरो रडतोय . अजुन कशात काही नाही आणि सगळं काही सोडुन हीरोईन जीव तोडुन पळत येतिए . अजुन कशात काही नाही आणि जगातली शेवटचीच असल्याप्रमाणे प्रत्येक लाट किनाऱ्यावर आपटतेय . . . . अजुन कशात काही नाही आणि आम्ही चिंब भिजत पिक्चर बघतोय . . . . मला त्या काळात तो हीरोने घातलेला पट्ट्या - पट्ट्याचा टी - शर्ट घ्यायचा होता . पुढे जाऊन त्याच्यासारखं ' जर्नालिजम ' करावं का असा विचार केल्याचंही आठवतंय . हीरोचं नाव ? अरविंद स्वामी . ते सोड . हिरोईन होती मनीषा कोईराला ! तिचे वडिल कि आजोबा नेपाळचे पंतप्रधान वगैरे होते , पण ती ऍक्टिंग करायची . का ? ते महत्वाचं नाहिये . तर हिरोईन मनीषा होती . असं म्हटल्यावर तुफान हळहळ आणि गुदगुल्या वगैरे वगैरे आम्हाला तेव्हाही व्हायच्या आणि आताही होतात ! कारण . . . . ते जाऊ दे . पण या पिक्चरने तुफान कॉन्ट्रोव्हर्सी झालेली . म्हणजे जनतेच्या धार्मिक भावना वगैरे दुखावल्या . नाही या गाण्याने नाही , पण दंगली , राजकारण , राममंदीर वगैरे . . . . संगीत ? रेहमान . सवालच नाय . . . . साधना मावशीच्या घरी कुठल्याशा पूजेला व्हि . डि . ओ . वर ' रोजा ' नामक कुठलासा मद्रासी पिक्चर लागलेला . खतरनाक स्टार्ट वगैरे झाल्यावर ' दिल है छोटासा . . . ' म्हणत धबधब्या खालच्या लोखंडी शिडीवर उभं राहुन आम्ही - बरसणारा रेहमान झेलायचा प्रयत्न तेव्हा जो सुरू केला तो आजतागायत चालू आहे . . . . हे पुढचं ऐक . बोगद्यात जाता जाता हे गाणं सुरू होतं . बोगद्यात अंधार . आय नो - ते ऑबव्हिअस आहे , पण तरीही . अंधार . मागुन कुठुन आर्त - राजस्थानी वाटावेत असे ' जिनके सर हो इष्ककी छॉंव . . . . ' चे सूर येईतो बोगद्यातुन बाहेर पडता पडता जगण्याची टोटल उर्मी एकेक ठेक्यात तोलत शाहरुख जे . . . . आई शपत - तुला कसा माहित शाहरुख ? हा . . . . तोच . पण तो पिक्चर ' वीर जारा ' कि झारा होता . अशा चुका होतात लोकांकडुन अधे मधे . मी गाडी फास्ट तर चालवत नाहिये ना ? पण मला सवयीचा आहे रस्ता . शिवाय स्पीड लिमिटला गाडी चालवली कि मला मी आयुष्यातला वेळ वाया घालवतोय असं वाटतं . म्हणजे तो वाचवुन मी काही फार तीर मारतो अशातला भाग नाही , पण वाटतं . च्यामारी - ' जब पास है तो एहसास है तू ' चा अर्थ . . . . एवढ्या डीटेल मध्ये नको जाऊस . आमच्या सारखा गुलजार ' फील ' करायला शीक . म्हणजे त्याचं असं कि - गुलजार गुलजार म्हणजे काय चीज आहे , ते आम्हाला ' माया मेमसाब ' पाह्यल्यावर कळलं . म्हणजे एकतर पिक्चर टॅक्स - फ्री , ते पण ' वेस्ट - एंड ' ला , शिवाय त्यात दीपा साहीचा एक बोल्ड सीन आहे वगैरे आवश्यक माहिती काढून मी आणि योगेश तो पहायला गेलेलो . १५ ऑगस्ट १९९३ ला ! आता काय करणार . . . . रहातं असलं काही माझ्या लक्षात . . . . हो तर - बोल्ड सीन होताच , आणि तो कधी नव्हे ते पिक्चरच्या कथानकासाठी आवश्यकही होता , पण ' इस दिल मे बस कर देखो तो . . . . यह शहर बडा पुराना है ' ने एवढं झपाटलं कि त्या एका दिलापायी हजार शहरं बदलत आम्ही अजुन भटकतोय . . . . तर सांगायचा मुद्दा असा कि गुलजार असा फील करायचा असतो ! पण तो सगळ्यांनाच झेपत नाही . खोटं कशाला बोला , कधी कधी मला पण झेपत नाही . नाही ग्रेस वगैरे एवढा अवघड नाहिये , पण एकंदर अवघडच . म्हणजे नाही कळला तरी अवघड आणि कळला तर आणखीनच अवघड . . . . या गाण्यात लडाखमधल्या कुठल्याशा तळ्याकाठी एका चादरीत शाहरुख आणि मनीषा जे काही करतात - नाही ते एवढं ऑबव्हिअस नाहिये , पण ते हिंदी पिक्चरमध्ये न भूतो न भविष्यति आहे . सतरंगी गात ते दोघे जे काही एक रूप , एक रंग होतात आणि त्यावर शाहरुख एका सूफी धुनीत जे पिसाळल्यासारखं नाचतो , ते लक्ष्मीनारायण मध्ये अपर - स्टॉल्स मध्ये बसुन जेव्हा पाह्यलं तेव्हा वाटलं कि आता या पिक्चरनंतर मणिरत्नम , रेहमान , गुलजार , मनीषा , शाहरुख या सगळ्यांनीच संन्यास घ्यावा . . . . कारण पर्फेक्शन कॅनॉट बी इम्प्रुव्हड् . . . . . बऱ्याच लोकांना हा पिक्चर पटला नाही आणि मला त्यांना तो ग्रेट का आहे ते कधीच समजावुन देता आलं नाही . असो . चार गाण्यात घरी - नॉट बॅड ! आठवड्यात दोन दिवस क्लास - आणि या दोन दिवसांत क्लासवरुन येताना मी आणि आयटमचं भूत . आणि आमच्या गप्पा ! गम्मत आहे . हे बरेच दिवस मनात घोळत होतं , पण लिहायला जमलं नव्हतं . भूत पण शिस्तीने फक्त क्लासवरुन येतानाच गाडीत असायचं . पण आज हे लिहायला घेतलं आणि क्लासवरुन येताना आयटमचं भूत हरवलं . किंवा यायला विसरलं . आज आयटमने स्वत : ची गाडी आणलेली . कदाचित ते तिच्याबरोबरच गेलं असेल . भुताबरोबर गप्पा मारताना कधी पडला नव्हता तो प्रश्न पोस्ट लिहायला घेतल्यावर पडला . प्रश्न म्हणजे असा कि जणु काही अभ्या म्हणतोय कि मामा काय हे - आता लग्न बिग्न झालंय तुझं ! मग मी पण विचारात पडलो . च्यायला हो की ! मग असं भूत गाडीत येऊन बसलंच कसं ? मी त्याला बसु दिलंही कसं ? पण का कुणास ठाऊक , मला याबद्दल फारसं गिल्टी वगैरे वाटत नाही . भूत मी न विचारता आलं . बसलं . आणि आम्ही ( खरं तर मी ) रेहमानच्या गाण्यांवर आठवणींना उजाळा दिला - हे खरं . आठवणींना उजाळा तो पण कसला ? १५ ऑगस्ट १९९३ च्या त्या रात्रीचा ? कि ' बॉम्बे ' पाह्यल्यावर पहिल्यांदा प्रकर्षाने प्रेमात पडावंसं वाटलेलं - त्याचा ? काय माहित . तसं आज मी भुताला मिस पण केलं नाही . त्यात एक बबन रस्ता अडवुन स्पीड लिमिट मधे गाडी चालवत होता . त्याला ओव्हरटेक करेपर्यंत घर जवळ पण आलेलं . तर मी या भुताला अभ्याच्या त्या ' टुटा सितारा तो . . . ' च्या पोस्टमधल्या मित्राप्रमाणे मानतो . कदाचित भुताला त्या तुटलेल्या सिताऱ्यात इंटरेस्ट नसेलही , पण मी त्याला माझा इंटरेस्ट न चुकता ऐकवतो . या निमित्ताने मग ते भूत मला आवडणाऱ्या गोष्टी मला का आवडतात ते नव्याने आठवायला लावतं . सवयीच्या आवडी मग फक्त सवय न रहाता फक्त आवडी म्हणुन रहातात . त्यांची उगमस्थळं आठवली कि कात काढल्यासारखं ' नविन ' वाटतं . पुढे जाऊन जर्नालिजम कधी केलं नाही . टी - शर्ट बद्दल तर सपशेल विसरुनच गेलो . स्वत : च्याच शहरात अजुन भटकतोय आणि सापडत नाहिये . पण त्या बुरुजावरच्या लाटांचा ध्रोंकार अजुन ऐकु येतोय . तेव्हा लागलेली ओढ आणि ओल अजुन जाणवतेय . आणि का कुणास ठाऊक - बरं वाटतंय . . . .
अनीशा , कुंटेंवरचा लेख अतिशय छान जमला आहे - मुलाखत ती म्हणजे . सर्वच नीट आहे पण त्यांनी जे शेवटी लिहीले आहे ते अगदी अमुल्य आहे . आपण एक अत्तर वाट्त फिरणारे फुलपाखरूच आहोत असेच मला वाट्ले . पर्यावरणावरील विचार पण मस्त आणि बरोबर आहेत . त्यांनाही छान पेरेंटिंग मिळाले आहे . हे वाचूनच किती बरे वाटते . मीपण मुठा नदीत असलेले साप पाहिले आहेत एकेकाळी व लोक त्या नदीत मासे पकड्त असत हे खरे वाट्ते का ?
सही जवा ऽ ऽ ऽ ब . असा फोन दुसरा होणे नाही . ( १६०० पण चांगला आहे ) .
त्यामुळे अंतर्गत उत्पादनात फक्त ठोकशाहीच ( किंवा कलम १४४ ) चालते असे नाही ; - )
सचिन , खरच तू great आहेस , एक चांगला खेळाडू आणि माणूस म्हणून .
लेवल असतात प्रत्येक गोष्टीला , छोटी चुक झाली तर किडनी काढायची मोठी झाली किडनी सोडुन बाकी सगळं काढायचं . ऐकावं ते नवलच म्हणायचं कि . . .
जे जसं समाजात आहे , त्याचे प्रतिबिंब पडणार , ते प्रतिबिंब बरेवाईट कसेही असु शकते , मग पात्रांनी का ' योग्य ते ' ( आपल्याला योग्य वाटते ते ) करावे ? मग ते किंचीत प्रचारकी होत नाही का ? मला नाही वाटत प्रचारकी होईल . किंबहुना प्रचारकी न होता पुढे जायचा मार्ग दाखवणे हेही लेखनीय कौशल्याचा एक भाग असु शकेल .
फाळणीपूर्वीच्या या लाहोरमध्ये कृष्णानगर , संतनगर नावाच्या वस्त्या होत्या . भारत नावाची इमारत होती . गीता नावाचं सभागृह होतं . मोहिनी नावाचा रस्ता होता . सनातन धर्ममंदिर होतं . कपूरथळा , नाभा , पतियाळा संस्थानातील राजेरजवाडय़ांचे बंगले होते . या लाहोरमध्ये गुजराती लॉज नावाची खाणावळ होती आणि तिथे . . .
मार्टिनिक हे अजूनही फ्रेंच वसाहत आहे का ? ( हा ध्वज भारी आहे . नागालँडचा म्हणूनही खपावा ! )
परिच्छेदामागुन परिच्छेद येत आहेत असे जे वाटले ते मला पण खटकलेच . पण एरवी चित्रपटाच्या गतिमानतेमुळे ते खुप जास्त अंगावर आले नाही असेच मलादेखील म्हणायचे होते .
वा ! मतल्याचा शेर एकदम जबरदस्त आहे . शैशव , वारा आणि मक्त्याचा शेरही आवडले . फक्त > > हीच का मरेस्तोवर फाशी ? या शेराचा अर्थही छान पण मात्रांची गडबड फ्लो मधे बाधा आणतेय .
तिथे उभे बंधु यांचा चहाचा स्टॉल आहे . मस्त चहा मिळायचा !
लग्नाच्या वेळी डॉ . रवींद्र कोल्हेंच्या चार अटी होत्या . रोज 40 किलोमीटर पायी चालण्याची तयारी हवी . चारशे रुपयांत महिनाभराचा संसार खर्च भागवता आला पाहिजे . पाचशे रु पयात रजिस्टर्ड लग्न करायचं आणि स्वत : साठी नाही पण इतरांसाठी भीक मागण्याची तयारी हवी .
५ . आपल्या योगसामर्थ्याने काळावरही मात करणारे , संपूर्ण आयुष्य विश्वाच्या कल्याणासाठी कठोर अनुष्ठाने करणारे , अशुभाचा नाश करून शुभफल प्राप्त करून देणारे योगतज्ञ प . पू . दादाजी वैशंपायन यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण !
५ कल्ट ची हास्यास्पद गृहितके केवळ कमिटेड सदस्यांनाच सांगणे : अथर्वशीर्षातच सान्गुन ठेवलय , इदम अथर्वशीर्षम अशिष्यायन देयम ! अर्थात " अशिष्या " ला यातिल विद्या सान्गु नका , हे स्तोत्र सान्गू नका ! अथर्वशीर्ष रचणार्यान्चा कल्ट लेखकुन्नी भारीच ओळखला म्हणायचे ! नै ?
या प्रयोगात चौकटीची वाक्ये तगवण्याची क्षमता ( " कॅरिइंग कॅपॅसिटी " ) = २ वाक्ये मात्र प्रत्येक वाक्याची प्रजननक्षमता = तिप्पट .
नी . . . . . . . मी पण यातले अर्धे अधिक पदार्थ कधीच वापरले नाहीयेत . माझी पण एक डिश राखून ठेव
पण मुशर्रफना काळजी करायची गरजच नव्हती कारण बुश - ४३ यांचे सरकार इराकच्या नरसंहारक शस्त्रास्त्रांवर एकाग्रचित्त होते . त्यांचे सरकार पाकिस्तानबद्दल मौनव्रत धारण करून बसले होते ! उपपरराष्ट्रमंत्री आर्मिटेज यांच्याकडे खानसाहेबांच्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी " अमेरिकेच्या चिंता पूर्वी पाकिस्तानच्या परमाणूप्रकल्पात काम करत असलेल्या व आता सेवानिवृत्त झालेल्या लोकांवर केंद्रित आहेत " असे निवेदन केले ! पण सेरेना हॉटेलमधील मेजवानीनंतर लगेच अमेरिकेच्या गुप्तहेर उपग्रहांच्या कॅमेर्यांनी प्रक्षेपणास्त्रांचे सुटे भाग प्योंग्यांगबाहेर एका पाकिस्तानी C - 130 विमानात चढवले जात असल्याची छायाचित्रें घेतली होती . हा माल कहूताच्या परमाणू तंत्रज्ञानाच्या मोबदल्यात पाठविला जात होता असे अनुमान काढले होते . खानसाहेब तर सेवानिवृत्त झाले होतेच पण अण्वस्त्रप्रसार मुशर्रफ यांच्या राजवटीत चालूच होता !
एका अतिशय गंभीर विषयाबद्दल कळकळीने खूप सारी माहिती संकलीत करून हा विषय सर्वांपुढे मांडल्याबद्दल अरुंधतीचे कौतुक करावे तेव्हढे कमीच .
मला यासाठी मोबू हा शब्द आवडतो . शब्द वापरला जाईल की नाही हे लोकांना तो किती आवडतो आणि सोपा वाटतो यावर अवलंबून असते असे वाटते . हा निकष धरल्यास मला मोबू किंवा दुसरा पर्याय म्हणजे भटक्या वापरायला आवडतील . चल्वाक शब्द नेहेमी आठवेल की नाही सांगता येत नाही .
' ह्या माफ़क अपेक्षेप्रमाणे नविन प्रतिसाद मिळतील काय ? ' असं आपणं लिहिलं म्हणून लिहावसं वाटलं .
~ तीन भागानंतर आता या विषयावर प्रतिक्रिया देताना एक विलक्षण अशा आनंदाची अनुभूती येत आहे . . . ती अशासाठी की आतापर्यंत चित्रपट म्हटला की , कथा , अभिनय , चित्रण , वेग , निर्मितीमूल्ये आणि सर्वात शेवटी दिग्दर्शन या रिंगणातच वैचारिक पालखी नाचायची . पण आता ' लग्न ' हा विषय घेऊन लेखिकेने ज्या समर्थपणे आपले या संदर्भातील विचार प्रकटले आहेत ते त्या त्या चित्रपटाकडे नव्याने पाहाण्याची दृष्टी वाचकाच्या मनी निर्माण करतात .
संपादक मंडळाने नवीन रुपड्यांबद्दल येत असलेल्या विविध सुचनांचा विचार करू असे आश्वासन अन्य ठिकाणी दिलेले आहेच , त्यामुळे अपेक्षीत असे अनेक सुंदर रूप मिसळपावला येईल हे नक्कीच .
पृथ्वी व अग्नी ही क्षेपणास्त्रे यशस्वी आहेत का ? कल्पना नाही . माहित नाही . पण त्याच्या तुलनेत चीनकडे कितीतरी अधिक क्षेपणास्त्र सज्जता आहे . भारत त्याच्या जवळपासही नाही . तुलनात्मकदृष्ट्या , सैन्यशक्तित बरोबरीसाधण्याइतकाच निकष असेल तर , पृथ्वी व अग्नी यशस्वी नाहित * . पण निकष इतरही असावेत असं वाटतं . स्वातंत्र्यदिन व प्रजासत्तक दिनाला मात्र ही क्षेपणास्त्र का ह्यांची कुठलीतरी भावंडं सैन्याच्या परेडमध्ये डौलानं मिरवली जातात .
जोगवा व ' हरिश्चंद्राची फॅक्टरी ' च्या सर्व कलाकारांचे व टीम चे अभिनंदन .
श्रीलङ्काया द्वीप हिंद महासागरय् ला । थ्व टापू बंगालया खाडीया दक्षिण पश्चिमय् व अरब सागरया दक्षिणय् ला । थ्व टापू मन्नारया खाडी व पाक जलसन्धि ( स्ट्रेट ) द्वारा भारतीय उपमहाद्वीप नाप बायाच्वंगु दु । हिन्दू पौराणिक बाखंकथं भारतीय मुख्य भूमिं श्रीलङ्का तक्क रामसेतु नांया छगू तां वानर वास्तुकार नालं निर्माण याःगु ख । एडम ब्रिजया नामं म्हस्युगू थ्व संरचना आ वयाः चूनालोंहया छुं पुचःले जक्क सीमित दु । औपनिवेशिक ब्रिटिश रिपोर्टतेगु अनुसार थ्व छगू प्राकृतिक संरचना ख व थ्व संरचनां सन् १४८० तक्क भारत व श्रीलङ्कायात स्वानातःगु जुसां लिपा वना छगू हिंसक आंधीं थुकियात स्येंकाबिल । थ्व टापूइ प्रायः मैदानी तटीय भूभाग दू व गुं आपालं दक्षिण मध्य भागय् दु । थ्व गुंइ दक्ले तःज्जाःगु च्वका पिदुरुतलागाला ख । थ्व च्वका समुद्र सतह स्वया २५२४ मिटर ( ८ , २८० फिट ) च्वे ला ।
एका १००० जणांच्या समूहातील लोकांविषयी आपल्याला बरीचशी माहिती आहे . अर्थात ही सर्व तांत्रिक माहिती आहे - - नांव , वय , पत्ता , दूरध्वनीक्रमांक , . . . ( यांतील दूरध्वनीक्रमांकाचा पुढे उपयोग करणार आहोत . ) पण आपल्याला अगदी नाजूक माहिती हवी आहे - या समूहातील किती लोक अफूसेवन करतात ?
त्यामुळे या चर्चेत रस वाटतो . पण विकिपीडिया वाचल्यानंतर याविषयी मला त्याहून अधिक काहीच माहीत नाही , असे लक्षात आले . तेव्हा या चर्चेतून शिकत राहीन .
राष्ट्रद्रोह कशाला म्हणावे हा प्रश्नच आहे . सरकारविरोधी बोलणे , कृती करणे हा राष्ट्रद्रोह अर्थातच नाही . परंतु स्टेट , राज्य , विरुद्ध सशस्त्र लढा पुकारणे म्हणजे waging war against the state हा कायद्याने गुन्हा आहे . आता असे आहे की असा लढा पुकारणारा हा त्या कायद्याच्या निर्मितीलाच आव्हान देत असतो . त्याने केवळ एक कायदा मोडलेला आहे . या दृष्टीने त्याला राष्ट्रद्रोही म्हणावे तर बाकीचे कायदे मोडणारे पण राष्ट्रद्रोही होतात असे म्हणावे लागेल . त्यामुळे एखादा कायदा मोडणे हा काही राष्ट्रद्रोह म्हणता येणार नाही . नक्षल तर म्हणतात की आम्ही राष्ट्राच्या भल्यासाठीच शस्त्र हातात घेतले आहे . सध्या राष्ट्राचे नियंत्रण करणारी व्यवस्थाच त्यांच्यामते राष्ट्रद्रोही आहे . रॉय बाई म्हणतात की प्रचलित व्यवस्थाच घटनेचे नीट पालन करीत नाही . मग त्या व्यवस्थेला आव्हान देणारे लोक तर घटनेच्या नीट पालनाकरताच लढत आहेत . पुन्हा , राष्ट्र कशाला म्हणावे हे स्पष्ट नाही , एकमत नाही . भारत हे एक राष्ट्र आहे की अनेक हा अजून एक वादाचा विषय . त्यामुळे बाई ( किंवा कुणीही ) राष्ट्रद्रोही की कसे याविषयी काहीही बोलणे मला योग्य वाटत नाही . ( राष्ट्र म्हणजे सकल भारतीय लोक अशा अर्थाने तर मला नक्षलही राष्ट्रद्रोही असावेत का असा प्रश्नच पडतो . चुकीचे अर्थातच वाटतात . अयोग्य मार्गाने सत्तासंघर्ष करणारे आहेत , झालं . हिंसात्मक मार्गामुळे घातक अर्थातच आहेत . )
घनश्याम हा राम लावण्यरूपी । महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥ करी संकटी सेवकांचा कुडावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥
तृषार्ततेच्या काठावरील पाखराला आपल्या असण्यामुळे पाणी पिण्यास संकोच वाटला तर , आपला म्हटले त्यानेच परका मानल्यावर आपण करतो तेच करायचे ; त्याच्या वाटेतून त्याच्या सोयीसाठी दूर व्हायचे . . . . तरीही पक्षी कुठल्या पाइपलाईनमधून थेंब थेंब ठिबकून जमलेल्या निवळशंख पाण्याला शिवत नसेल तर पाण्यात आपण आहोत असे जाणून आणखी दूर जायचे . पक्ष्याला पाण्यात फक्त आकाश दिसेपर्यंत कसलाच भरवसा वाटणार नाही . . .
प्रयोगाच्या संदर्भात लक्षात राहिलेली एक मजेदार आठवण म्हणजे एकदा आमचा ' म्हातारी व भोपळ्या ' च्या गोष्टीवर आधारित खेळ होता . कधी नव्हे तो आम्ही प्रयोगाला भोपळाच न्यायला विसरलो ! मजा म्हणजे ही गोष्ट आमच्या चौघींपैकी कोणाच्याच लक्षात आली नाही . आणि जेव्हा प्रयोगासाठी एकेक बाहुली , साहित्य काढून रचू लागलो तेव्हा ही गोष्ट लक्षात आली . आता इतक्या आयत्या वेळेला भोपळा आणणार तरी कोठून ? मग एक शक्कल लढवली . आमच्याकडे एक हॅट होती . चांगली नेहमीच्या आकाराची . एरवी आमच्या खेळात एक उंदीरमामा त्या हॅटला घालून नाचतो व पळून जातो . मुलांना हे दृश्य बघायला खूप मजा येते . अगदी खदखदून हसून दाद देतात ती ! तर मग त्या दिवशी ह्या हॅटमधून आमची म्हातारी जंगलातून आपल्या लेकीकडे गेली . ती हॅटमधूनच का गेली ह्याचे उत्तर देण्यासाठी तिथल्या तिथे एक गोष्ट रचावी लागली . आणि गंमत म्हणजे नंतर मुलांनी येऊन सांगितले , ' आज म्हातारी भोपळ्यातून न जाता हॅटमधून गेली तर आम्हाला खूप मजा वाटली . '
आयला कमाल आहे , मी म्हंटले ते गीतरामयण होते तर . . . . . : S मी तर संध्याकाळची वेळ म्हणुन रामरक्षा म्हणणार होतो . . . . . . . # o असो , पुढच्या ओसरीला सामुदायिक शुभंकरोति म्हणायचा कार्यक्रम ठेवुयात का ?
हळूहळू काळाची पानं उलटली , हे सगळेच लोक म्हातारे झाले , त्यांची वयं झाली , तसतसे संसारात अनेक बदल आपोआप होत गेले . ज्या गोष्टी आधी महत्त्वाच्या वाटत नव्हत्या , त्या आता वाटायला लागल्या , कोपरे बोथट झाले , काही तर हळवेही . आता माझी आई तिच्या आईची खुशाली , काळजी फोनवरून तरी घेऊ लागली , तिच्याकडे औषधं , खाऊ घेऊन जायला लागली . आता त्यावरून तिची सासू तिला बोलली तरी त्याची फारशी खंत ती करेनाशी झाली . पण मी माझ्या आईशी मारत असे , तशा खळखळून गप्पा , सुटसुटीत ऐसपैस वागणं असं ते नसायचं , नुसताच अबोल ओलावा , अनुभवण्यासारखा .
. . . " दर्ग्यावर होणारे भूत उतरवण्याचे प्रकार दिसत नाहीत का ? कारण तिथे जाण्याची त्यांची हिम्मतच होत नाही " . इति . विकास कर्णिक . . . मी तर म्हणतो सरकारने सगळे दर्गे ( मुस्लिमांच्या ) त्वरित पाडावे फारच चांगले कार्य होईल . . . . . . .
समाज डेव्हीड धवनच्या चित्रपटांनीही बदलतो . डेव्हीड धवनच्या चित्रपटांना सामाजिकता आहे का ? तर , खूप मोठी सामाजिकता आहे . बायकोला मूल होत नाही म्हणून नवरा दुसर्या बाईशी , साध्या भाषेत सांगायचं तर , भानगड करतो , आणि जन्माला येणारं मूल कुटुंबाकडून स्वीकारलं जातं , अशा स्टोर्या जेव्हा गंमत म्हणून सांगितल्या जातात , तेव्हा समाज त्यातून काहीतरी उचलतच असतो . ही सामाजिकता कोणालाच चुकलेली नाही . ' सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर सामाजिक संदर्भ असलेले चित्रपट बनवतात ' , असं म्हटलं जातं , पण केदार शिंदेही सामाजिक संदर्भ असलेले चित्रपट बनवतो , आणि सचिन पिळगावकरही सामाजिक संदर्भ असलेले चित्रपट बनवतात .
राज्याभिषेकाच्या संस्काराने नाही तर स्वकर्तुत्वाने सिंह हा जंगलचा राजा ठरतो .
ज्यांना १ तारखेला शक्य असेल , त्यांनी कृपया आपली उपस्थिती कळवावी .
भ्रमा , तोशिबा c660 कसा आहे ? cs4 चालेल का त्यावर नीट ? धन्स !
मंदिराच्या भिंतीवर असलेले एक चित्र - बोरे चाखून बघताना शबरीमाता
बॉस : आज फिर आप दफ्तर में देर से आए हो ? संता : हां , मेरी मोटरसाईकिल पंक्चर हो गई । बॉस : तो आप बस में क्यों नही आते ? संता : बस खरिदना मेरे लिए मुमकिन नही है । संता : देहात से आए . . .
" कसलं धम्माल सरप्राईज . तुम्ही इथे कसे ? " शमिका मोठ्या प्रेमाने माहीला विचारते .
माझे आई - बाबा एकदा कलकत्त्याला ट्रिपला गेले होते आणि ते हातरिक्षेने शहर पाहायला निघाले होते . तेंव्हा अचानक त्यांना एक थरारक दृष्य दिसले . एक माणूस जीवाच्या आकांताने पळत होता आणि त्याच्या मागे एक जमाव चाकू घेऊन . . . . सायकलरिक्क्षेच्या मर्यादीत वेगामुळे ही सगळी पळापळ आई - बाबांच्या डोळ्यासमोर घडत होती . शेवटी त्या जमावाने त्या माणसाला गाठलेच आणि त्याच्या पोटात चाकू खुपसला . . . मला हे ऐकूनच इतके शहारे आले होते . . . मग दंगलीसारखे , मारामारीसारखे भयानक प्रसंग ज्यांच्या डोळ्यासमोर घडत असतील त्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पनासुद्धा न केलेली बरी . . .
विरोध करणारे विरोधक नसतात , तर खरे म्हणजे हे आपले हितचिंतक असतात , हे आपण , किंवा वेल * * र ह्या जुन्या पीढीतल्या लोकांना कसे कळेल ? ह्या कूटप्रश्नाचे उत्तर द्या .
आरक्षणाच्या मागणीसाठी गेली अकरा दिवस रेलरोको करणाऱ्या गुर्जरांबरोबर चर्चा करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री शांती धारीवाल यांच्यासह तीन मंत्र्याचा समावेश असलेल्या समितीची नियुक्त करण्यात आली आहे .
अगं शाल्मली , वृत्तपत्रांची नक्की जबाबदारी काय आहे हेच विसरले आहेत की काय अशी शंका येते . म . टा . सहसा वाचला जात नाही पण ' सकाळ ' वाचताना अश्या चुका फारश्या जरी लक्षात आल्या नसल्या तरी एक चांगली बातमी देतील तर शपथ . . . . किंवा वाईट बातम्या वाचायची सवय झाल्याने म्हणा , सगळीकडे अंदाधुंदी माजलेली आहे असे वाटते . चांगली बातमी आली की त्यातही काही राजकारण असेल काय अशी शंका येते . जनतेला सतत घाबरलेल्या अवस्थेत ठेवायचा विडा उचललाय असं वाटतं . अगदी साध्या बातम्यांची शीर्षके आकर्षक करायच्या नादात वाचकांची दिशाभूल करतात असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही . आपण ( मी लिहिते ) अनौपचारीक जसं लिहितो तसं मात्र वृत्तपत्रात येऊ नये असं वाटतं .
सभा न्यायदानाच्यासाठीं । सभासद निवडले न्याय तोलुनी देती ॥
टिहरी नगरपालिका परिषद के उप चुनाव में उत्तराखंड आंदोलनकारी उमेश चरण गुसांई ( तोता ) को विजयश्री हासिल हुई । इस उपचुनाव में खास बात यह रही कि पहली बार किसी राष्ट्रीय दल के चुनाव निशान पर चुनाव लड़ने वाले प्रत्याशी को जीत मिली । गुसांई राज्य के एकमात्र ऐसे आंदोलनकारी हैं जिन्हें 6 वर्ष की सजा सुनाई गई थी । हालांकि बाद में पफैसला गुसांई के पक्ष में आया । गुसांई की जीत के …
प्रेमावर आज जग चालले आहे , प्रेम ही भावना असते , तेथे जात , पात किंवा धर्माचा विचार होत नाही . त्याप्रेमातून ज्या नवबालकाचा जन्म होतो तो सोबत धर्म घेऊन येत नाही . खरे तर आता सरकारनेच नोकरीतून , शाळेत प्रवेश देताना , अगर कोनतीही सवलत देताना जात आणि धर्माचा उल्लेख टाळायला पाहिजे . जेव्हा सरकार अशी पावले उचलील तेव्हाच समाजातून जाती धर्माचे उच्चाटन होईल . मोठमोठी भाषणे देनारे मात्र घरातील मुलामुलींवर संस्कार वेगळेच करतात . त्यांची मुले परजातीच्या प्रेमात पडली तर कोण आकांडतांडव करतात , त्यांना सर्व बाजूंनी विरोध करतात . आता हे थांबले पाहिजे . आताची पिढी जी प्रेमात जात , पात धर्म पाळत नाही ती एक प्रकारे ही संकल्पनाच नष्ट करीत आहे .
कालेसाहेब हे मान्य आहे कि अमेरिकेचे धोरण हे फक्त स्वार्थावर अवलंबून आहे . पण एक उदाहरण देतो . ओबामांनी आपल्या पहिल्या वर्षात इजिप्त च्या प्रसिद्ध university मध्ये जे भाषण दिले ते संपूर्ण स्वातंत्र्य समानता आणि सहिष्णुता यावर होते . George Bush जेव्हा दुसर्यांदा प्रेसिडेंट झाले तेव्हाचा त्यांचा innaugural address हा middle east मध्ये लोकशाही हा होता . मला विषयाला फाटे पोदायाचे नाहीत पण काळ निश्चित बदलला आहे . रशिया सारखा आपला मित्र नाही हि खरी गोष्ट आहे पण रशिया त पुतीन विरुद्ध कधी बंद होणार नाही . . .
संध्याकाळ झाली होती . व्यवस्थित ताजेतवाने होवुन बाहेर पडेपर्यंत भास्कररावांनी एक्झीट घेतली होती , सगळ्या आसमंतात एक सुरेख लालीमा पसरायला लागला होता . मोकळं रानच असल्याने दिवसभर चारा गोळा करुन घराकडे परतणार्या पक्ष्यांची सुरेल किलबिल वेडावुन टाकत होती . जेवायला अजुन वेळ होता म्हणुन आम्ही सगुणाबागेचा फेरफटका मारायला थोडे बाहेर पडलो . दिवस मावळतीकडे झुकला होता .
चरित्रं अशी घडतात - प्रा . मिलिंद जोशी , अनुबंध प्रकाशन , किंमत - ११० आणीबाणी आणि आम्ही , संपादन - उषा मेहता , भास्कर सावंत , ग्रंथाली , दादर , मुंबई , पाने - ४०७ , किंमत - ५०० रुपये
देशप्रेमी आणि दहशतवादी ही दोन विशेषणे म्युचुअली एक्सक्लुजिव नाहीत . दोन्ही विशेषणे एकाच व्यक्तीला एकाच वेळी लागू असू शकतात . हिदुस्तानी ( इंडियन ) या चित्रपटात कमलहसन या नटाने अभिनय केलेले एक पात्र देशभक्त आणि दहशतवादी असे दोन्ही असते . पण मुळात , राहुल गांधी यांनी संघाला ( धर्म ) वेडे आणि मूलतत्ववादी म्हटले आहे . " त्यांच्यावर बंदी घालावी " असे त्यांनी म्हटलेलेच नाही ( = दहशतवादी म्हटले नाही ) . किंबहुना , " संघावर बंदी नाही ( आणि नको ) आणि सिमीवर बंदी आहे ( आणि रहावी ) पण तो वेगळा मुद्दा आहे , अन्यथा त्यांच्या मनोवृत्तीत फरक नाही " इतकेच ते मत आहे . " भगतसिंगला दोन डोळे होते आणि कसाबलाही दोन डोळे आहेत " हे वाक्य ' चूक ' नाही .
द्विवेदी जी ब्लॉगरी के दो साल पूरे होने पर बधाई देना भूल गया था सो यहाँ दे रहा हूँ स्वीकार कीजिये । शरद कोकास " पुरातत्ववेत्ता " http : / / sharadkokas . blogspot . com
अनुस्वार म्हणजे थोडक्यात सांगायचे तर एखाद्या स्वरानंतर आलेले अनुनासिक . म् , न् आणि ण् यांचे जरी स्वयंभू अस्तित्त्व असले , तरी ते ज्यावेळी आपापले , एकटे एखाद्या शब्दात येतात तेव्हा अनुस्वाराच्या अर्थाने नाही . त्यामुळे ही तीन अनुनासिके व बाकीची ङ् व ञ् ही अनुनासिके पराश्रित मानली जातात . अनुनासिकांबद्दल व कुठे कोणत्या अनुनासिकाचा उच्चार करावा याबद्दल आधीच्या एका लेखात माहिती दिली असल्याने , पुन्हा सांगत नाही .
ओ . ताटात अन्न टाकू नये . ताटात अन्न टाकून दिल्यास त्यासाठी प्रायश्चित्त घ्यावे .
असेच एकदा जंगलात पुढे जायला वाटच नसल्यामुळे त्यांचा मुक्काम दाट झाडीत पड्तो . सगळीकडे झाडे उन्मळून पडलेली असतात . वातावरण गुढ , काळोख , रातकिड्यांच्या आवाजाने भारून गेलेले असते . याचा अनुभव ज्यांनी ट्रेकींग करताना रात्री जंगलात मुक्कान ठोकला आहे त्यांना आला असेल . अशावेळी मनात नको नको ते विचार येतात . भुतकाळ मनातून पापण्याच्या आड उतरतो . डोळे मिटताएत तोच दगड गडगडल्याचा आवाज कानावर येतो . तो एकताच सर्व आपापल्या बंदूकी सावरत , सरसावत उठतात . एकजण म्हणतो सुध्दा " अस्वलच असणार ! तयार रहा ! " सगळे आपल्या रायफल्स बोल्ट करतात तेवढ्यात एका माणसाचा आवाज ऐकू येतो
श्री गंगानगर ( राजस्थान ) - सीमा रेषेवरून भारतात घुसण्याच्या तयारीत असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाच्या ( बीएसएफ ) जवानांनी ठार मारले . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी रविवारी रात्री भारताच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या या घुसखोराला गोळ्या घातल्या . या नागरिकाला आत्मसमर्पण करण्यास सांगितल्यानंतर त्याने जवानांवर गोळीबार केल्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार मारला गेला . त्याच्या मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून , शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे .
हाच विषय त्यांनी पुढे नेउन अतिशय सोप्या भाषेत त्यावर भाष्य केलेले आहे ते त्यांच्याच शब्दात देण्याचा माझा मनोदय आहे . एकाच बैठकित हे सर्व येथे लिहीणे मला शक्य वाटत नसल्याने मीच ब्रेक घेत आहेत् . वाचकांच्या प्रतिसादावरही बरेचसे अवलंबुन आहे . इतक्या गहन विषयावर इतके सुंदर भाष्य माझ्या तरी वाचनात न आल्याने ते येथे देण्याचा हा खटाटोप करित आहे .
Download XML • Download text