s-1
| त्याला एक मुलगा होता. |
s-2
| एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करित. |
s-3
| परंतु लाडामुळे तो बिघडला. |
s-4
| राजा मनात म्हणाला, 'याला घालवून द्यावे.' |
s-5
| 'टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.' |
s-6
| राजाने राणीला हा विचार सांगितला. |
s-7
| आज ना उद्या सुधारेल तो. |
s-8
| 'नका घालवू त्याला दूर!' ती रडत म्हणाली. |
s-9
| 'तुम्हा बायकांना कळत नाही.' |
s-10
| 'आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे,' तो म्हणाला. |
s-11
| राणी काय करणार, काय बोलणार? |
s-12
| रात्रभर तिला झोप आली नाही. |
s-13
| सकाळी राजा मुलाला म्हणाला, राज्यातून चालता हो. |
s-14
| आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये! |
s-15
| तुमची आज्ञा प्रमाण, असे म्हणून पित्याच्या पाया पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला. |
s-16
| तो आईच्या पाया पडला. |
s-17
| आईने त्याला पोटाशी धरले . |
s-18
| हे घे चार लाडू . |
s-19
| भूक-तहानेचे लाडू, ती म्हणाली. |
s-20
| आईचा आशीर्वाद घेऊन, ते लाडू घेऊन, धनुष्यबाण आणि तलवार घेऊन तो निघाला. |
s-21
| पायी जात होता. |
s-22
| दिवस गेला, रात्र गेली. |
s-23
| चालत होता. |
s-24
| थकल्यावर दगडाची उशी करून वडाखाली झोपे. |
s-25
| त्याला भूक लागली. |
s-26
| त्या लाडूंची त्याला आठवण झाली. |
s-27
| एक झरा खळखळ वाहत होता. |
s-28
| हातपाय धुऊन तेथे बसला. |
s-29
| त्याने एक लाडू फोडला तर आतून एक रत्न निघाले. |
s-30
| त्याला आनंद झाला. |
s-31
| आईला किती चिंता ते मनात येऊन त्याचे डोळे भरून आले. |
s-32
| लाडू खाऊन, पाणी पिऊन तो पुढे निघाला, तर त्याला एक हरिणी दिसली. |
s-33
| तिच्याभोवती तिची पाडसे खेळत होती. |
s-34
| राजपुत्राने धनुष्याला बाण लावला. |
s-35
| तो त्या हरिणीला मारणार होता; परंतु त्याला स्वतःची आई आठवली. |
s-36
| माझी आई मला, तशी ही हरिणी या पाडसांना. |
s-37
| त्याचे हृदय द्रवले. |
s-38
| त्याने बाण परत भात्यात ठेवला. |
s-39
| तो पुढे निघाला. |
s-40
| काही अंतर चालून गेल्यावर मागून कोणीतरी माणूस येत आहे, असे त्याला वाटले. |
s-41
| एक स्त्री येत होती. |
s-42
| साधीभोळी , निष्पाप दिसत होती. |
s-43
| तो थांबला. |
s-44
| ती स्त्री जवळ आली. |
s-45
| कोण तुम्ही, कुठल्या? |
s-46
| या रानावनातून एकट्या कुठे जाता? |
s-47
| मी तुझी बहीण होऊ इच्छिते. |
s-48
| मला नाही म्हणू नकोस, ती म्हणाली. |
s-49
| ये माझ्याबरोबर . |
s-50
| भावाला बहीण झाली. तो म्हणाला. |
s-51
| दोघे जात होती. |
s-52
| दोघांना भूक लागली. |
s-53
| एका खळखळ वाहणाऱ्या झऱ्याच्या काठी दोघं बसली. |
s-54
| त्याने एक लाडू फोडला. |
s-55
| त्यातून पुन्हा एक रत्न निघाले. |
s-56
| अर्धा अर्धा लाडू दोघांनी खाल्ला. |
s-57
| इतक्यात केविलवाणा शब्द कानी आला. |
s-58
| एका सापाने बेडकाला तोंडात धरले होते. |
s-59
| बेडूक वाचवावा तर सापाची भूक कशी शमवायची? |
s-60
| राजपुत्र जवळच्या तलवारीने मांडीचे मांस कापून सापाकडे फेकले. |
s-61
| तो लाल तुकडा पाहून बेडकाला सोडून साप तिकडे धावला. |
s-62
| बेडूक टुणटुण उड्या मारत गेला. |
s-63
| भावाची रक्तबंबाळ झालेली मांडी पाहून बहिणीचे डोळे भरून आले. |
s-64
| ती पटकन कुठेतरी गेली आणि पाला घेऊन आली. |
s-65
| तिने त्या पाल्याचा चोळामोळा करून तो पाला आपला पदर फाडून जखमेवर बांधला. |
s-66
| दोघे पुढे जाऊ लागली. |
s-67
| तो पाठीमागून कोणी येत आहे असे त्यांना वाटले. |
s-68
| दोघे थांबली. |
s-69
| एक तरुण येत होता. |
s-70
| कोण रे तू? |
s-71
| कुठला? |
s-72
| रानावनात एकटा का? राजपुत्राने विचारले. |
s-73
| मला तुमचा भाऊ होऊ दे, तो म्हणाला. |
s-74
| ठीक, हरकत नाही, राजपुत्र म्हणाला. |
s-75
| तिघे चालू लागली. |
s-76
| तो आणखी एक तरुण धावत आला. |
s-77
| तू रे कोण? राजपुत्राने विचारले. |
s-78
| मला तुमचा भाऊ होऊ दे. |
s-79
| नाही म्हणू नका. |
s-80
| तोही म्हणाला. |
s-81
| राजपुत्राने त्यालाही आपल्याबरोबर घेतले. |
s-82
| ती चौघे जात होती. |
s-83
| सर्वांना भुका लागल्या. |
s-84
| दोन लाडू शिल्लक होते. |
s-85
| एका सरोवराच्या काठी चौघे बसली. |
s-86
| राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले. |
s-87
| त्यांतूनही दोन रत्ने बाहेर निघाली. |
s-88
| अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला. |
s-89
| सर्वांना ढेकर निघाली. |
s-90
| आईच्या हातचा लाडू, त्याने नाही तृप्ती व्हावयाची तर कशाने? |
s-91
| जवळच एक शहर दिसत होते. |
s-92
| प्रासादांचे , मंदिरांचे कळस दिसत होते. |
s-93
| राजपुत्र दोन भावांना म्हणाला, त्या राजधानीत जा. |
s-94
| ही रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा. |
s-95
| तेथे नोकरचाकर ठेवा आणि हत्ती, घोडे विकत घ्या. |
s-96
| घोडेस्वार तयार करा. |
s-97
| मला सन्मानाने मिरवत नेण्यासाठी या! |
s-98
| दोघे भाऊ त्या नगरीत गेले. |
s-99
| दोन रत्ने त्यांनी विकली. |
s-100
| त्यांचे दहा लाख रुपये मिळाले. |