Dependency Tree

Universal Dependencies - Marathi - UFAL

LanguageMarathi
ProjectUFAL
Corpus Parttest

Select a sentence

s-1 ते विकणे त्याच्या जिवावर येत होते.
s-2 सावकारी पाशात सारे शेतकरी सापडले.
s-3 शेताचे मूळचे मालक मजूर झाले.
s-4 केशवचंद्रांना ते सहन होत नव्हते.
s-5 आज सकाळी ती शेवटची बाचाबाची झाली.
s-6 सावकार का ही जमीन लाटणार?
s-7 या जमिनीचा मी मालक.
s-8 उद्या मला येथे मजूर म्हणून का कामासाठी यावे लागेल?
s-9 भीमा विहिरीच्या काठी बसून विचार करीत होता.
s-10 त्याचे तोंड चिंतेने जरा काळवंडले.
s-11 इतक्यात त्याची वडील मुलगी भीमी लहान भावंडाला घेऊन आली.
s-12 'बाबा, आईने घरी बोलावले आहे.' ती म्हणाली.
s-13 'कशाला , पोरी?'
s-14 'सावकार आला आहे घरी.'
s-15 'काय म्हणतो तो?'
s-16 'आईला म्हणाला, 'हजार रुपये घ्या शेत द्या!' आणि मला म्हणाला, 'तुझ्या बापाला काही कळत नाही.'
s-17 'बाबा, शेत का तुम्ही विकणार?'
s-18 'प्राण गेला तरी विकणार नाही.'
s-19 'तुझी आई काय म्हणाली?'
s-20 'ती म्हणाली, 'त्यांना विचारा.''
s-21 आणखी आई त्यांना म्हणाली, 'पैसे काय, आज आहेत उद्या नाहीत, जमीन कायमची सत्तेची.''
s-22 ती विकून कुठे जायचे?
s-23 शहाणी आहे तुझी आई!
s-24 भीमा मुलीबरोबर घरी आला.
s-25 सावकार निघून गेला होता.
s-26 बायकोने सारी बोलणी भीमाच्या कानावर घातली.
s-27 'साप आहे तो मेला!
s-28 'तो आपला सत्यानाश केल्यावाचून राहणार नाही!' तो म्हणाला.
s-29 ' त्यांच्या बाबतीत देव मेला, तसा आपल्या बाबतीतही मरायचा!'
s-30 'त्यांनी हिंमत सोडली म्हणून त्यांचा देव मेला!'
s-31 जो सत्यासाठी उभा राहतो त्याचा देव मरत नाही.
s-32 समजलीस?
s-33 काही दिवस गेले.
s-34 केशवचंद्राने न्यायालयात फिर्याद केली.
s-35 भीमाकडे असलेली जमीन वास्तविक आपली आहे.
s-36 जुने कागदपत्र सापडले आहेत त्यावरून हे सिद्ध होत आहे, वगैरे त्याचे म्हणणे.
s-37 न्यायाधीश केशवचंद्रांच्या मुठीतले .
s-38 पैशाने कोण वश होत नाही!
s-39 भीमाला न्यायालयात बोलावण्यात आले.
s-40 केशवचंद्राने म्हातारे शेतकरी पैशाने विकत घेऊन साक्षीदार म्हणून आणले होते.
s-41 त्याने आपली बाजू मांडण्यासाठी कायदेपंडितही आणला होता.
s-42 भीमाची बाजू कोण मांडणार?
s-43 तो न्यायाधीशास एवढेच म्हणाला, 'महाराज, देवाधर्माला स्मरून मी सांगतो की ही माझी जमीन आहे.
s-44 वाडवडिलांपासून ही चालत आली आहे.
s-45 सावकाराला बघवत नाही.
s-46 हजार रुपये द्यायला तयार झाला होता .'
s-47 'हजार रुपये ?'

Text viewDownload CoNNL-U