Dependency Tree

Universal Dependencies - Marathi - UFAL

LanguageMarathi
ProjectUFAL
Corpus Partdev

Select a sentence

s-1 थापा मार!
s-2 'त्या तुकड्याचे का कोणी हजार रुपये देईल?'
s-3 'देवाला माहीत आहे!'
s-4 'देव दूर आहे आभाळात.'
s-5 येथे तुम्ही आम्ही आहोत.
s-6 कागदपत्रं काय सांगतात?
s-7 'हे म्हातारे शेतकरी साक्षीदार का खोटे सांगतात?' वकील म्हणाला.
s-8 न्यायाधीशाने भीमाची मालकी काढून घेतली.
s-9 केशवचंद्राचीच जमीन आहे, असा त्याने निर्णय दिला.
s-10 भीमा बाहेर येऊन आकाशाकडे हात करून म्हणाला, 'तुझ्या जगात देवा, का न्याय नाही?'
s-11 'न्याय आमच्या हातात असतो, भीमा.'
s-12 'देवबीव सत्तेजवळ असतो, संपत्तीजवळ असतो.' वकील म्हणाला.
s-13 भीमा दुःखाने घरी गेला.
s-14 तो कपाळाला हात लावून बसला.
s-15 'काय लागला निकाल ?' बायकोने विचारले.
s-16 'आपण चोर ठरलो नि चोर मालक ठरला.'
s-17 'आपण उद्यापासून मजूर झालो.' तो दुःखाने बोलला.
s-18 त्या गावातील सारे गोरगरीब केशवचंद्रांच्या नावे खडे फोडीत होते.
s-19 परंतु करतात काय?
s-20 या प्रांताचा राजा दौऱ्यावर निघाला होता.
s-21 केशवचंद्राने वशिला लावून राजा आपल्या गावी येईल असे केले.
s-22 गाव शृंगारण्यात आला आणि एक सुंदर सभामंडप उभारण्यात आला.
s-23 तेथे राजासाठी सिंहासन तयार करण्यात आले होते.
s-24 राजाच्या सत्कारसमारंभासाठी आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील शेकडो मोठमोठी माणसे येणार होती.
s-25 सरदार-जहागीरदार, सावकार, व्यापारी येणार होते.
s-26 तेथे फक्त गरिबांना येण्यास बंदी होती.
s-27 केशवचंद्राला गावातील लोकांची भीती वाटत होती.
s-28 राजाच्या कानावर ते कागाळ्या घालतील, अशी त्याला शंका होती.
s-29 म्हणून त्याने सर्वांना ताकीद दिली की, त्या दिवशी घराबाहेर फिरकू नका.
s-30 राजा जाईपर्यंत आपापल्या झोपड्यांत बसून राहा.
s-31 सभामंडप भरून गेला होता.
s-32 आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील साऱ्या संपत्तीचे तेथे जणू प्रदर्शन होते.
s-33 नटूनथटून श्रीमंत मंडळी आली होती.
s-34 हां, हे बघा घोडेस्वार!
s-35 आणि वाद्ये वाजू लागली.
s-36 जयघोष कानावर आले.
s-37 सारे शेतकरी भीतीने घरात बसून आहेत; परंतु भीमा कुठे आहे?
s-38 गावाबाहेर एक जुने देवीचे मंदिर होते.
s-39 त्या मंदिरात एक प्रचंड घंटा होती.
s-40 गावात कोणी मेले, तर ती घंटा वाजविण्यात येई.
s-41 भीमा आज त्या मंदिरात गेला आणि ती घंटा दाणदाण वाजवू लागला.
s-42 'कोण मेले?' म्हाताऱ्या गुरवाने विचारले.
s-43 'न्याय मेला.' भीमा म्हणाला.
s-44 'खरेच , न्याय उरला नाही.' देवीचा तो पुजारी म्हणाला.
s-45 घंटेचा आवाज ऐकून देवीच्या देवळाकडे शेतकरी येऊ लागले,'कोण मेले' म्हणून विचारू लागले.
s-46 'न्याय मेला' असे जो तो उत्तर देऊ लागला.

Text viewDownload CoNNL-U