Dependency Tree

Universal Dependencies - Marathi - UFAL

LanguageMarathi
ProjectUFAL
Corpus Parttrain

Select a sentence

Showing 301 - 400 of 372 • previous

s-301 मेरीकडे पण कुत्रा आहे का?
s-302 नाही, मेरीकडे कुत्रा नाही आहे, तिच्याकडे मांजर आहे.
s-303 पण ते मांजर घरात आहे, मांजर झोपले आहे.
s-304 त्यांची आई घरात मांजराबरोबर आहे, ती खिडकीतनं बघते आणि तिला जेम्स आणि मेरी खेळताना दिसतात.
s-305 जेम्स पटकन एका मोठ्या, जुन्या झाडापर्यंत पळतो, तो मेरीपासुन लपत आहे.
s-306 तुला कारण माहित आहे का?
s-307 मेरी बसली आहे, आणि तिचे हात तिच्या डोळ्यांसमोर आहेत.
s-308 तिला काही दिसत नाही आहे, आणि ती मोजत आहे.
s-309 ती तसं का करते?
s-310 आणि जेम्स झाडाजवळ काय करत आहे?
s-311 तो एक खेळ आहे.
s-312 मेरीचं मोजून झाल्यावर ती आवतीभोवती बघते.
s-313 ती जेम्सला शोधत आहे.
s-314 'तुला माहित आहे का, तो कुठे आहे? '
s-315 जेम्स कुठे आहे, हे मेरीला माहित नाही.
s-316 ती कुत्र्याला विचारते, तुला जेम्स दिसला का?
s-317 पण कुत्रा तर बोलूच शकत नाही!
s-318 म्हणून मेरीला तिच्या प्रश्नाला काही उत्तर मिळत नाही.
s-319 लोकांना कुत्र्यांशी बोलल्यावर काही उत्तर मिळत नाही!
s-320 मेरी खिडकीच्या मागे तिच्या आईकडे बघते, तिची आई हसत आहे.
s-321 मेरीला वाटते कि तिच्या आईला जेम्स कुठे गेला, हे माहित आहे.
s-322 'सांग मला, तो कुठे आहे! ', ती तिच्या आईला म्हणते.
s-323 'नाही मेरी, मी तुला सांगू शकत नाही' ती उत्तर देते.
s-324 तिला बहुतेक माहित आहे, तो कुठे आहे, पण तिला हे सांगायचे नाही आहे.
s-325 मेरी सावकाश बागेत चालते.
s-326 ती अजून जेम्सला शोधायचा प्रयत्न करत आहे.
s-327 ती टेबलाखाली आणि खुर्च्यांच्याखाली बघते, पण जेम्स तिकडे नाही आहे.
s-328 ती सगळीकडे शोधते पण तिला जेम्स सापडत नाही.
s-329 मग तिला आवाज ऐकू येतो, तो त्या मोठ्या जुन्या झाडाच्या मागून येत आहे.
s-330 तो जेम्स असेल का?
s-331 तोच आवाज परत येत आहे!
s-332 तो पक्षी किंवा प्राणी नाही आहे.
s-333 तिला आता तो नीट ऐकू येत आहे.
s-334 तो जेम्सच असेल!
s-335 मग तिला एक छोटा हात दिसतो आणि जवळ गेल्यावर त्याचं डोकं पण दिसतं.
s-336 ती हसून म्हणते, 'मला तू सापडलास! '.
s-337 मी म्हणून तुला इतकी किंमत देत आहे.
s-338 अरे, आजूबाजूला आता सगळीकडे माझी जमीन!
s-339 मध्ये तुझेच हे शेत आडवे येते.
s-340 मी सांगतो ऐक.
s-341 'आढेवेढे नको घेऊस! ' केशवचंद्र म्हणाले.
s-342 'माझी जमीन विकणार नाही.
s-343 गावातली सगळी जमीन तुम्ही या ना त्या मार्गाने आपलीशी केलीत.
s-344 राग नका मानू दादा; परंतु खरे ते मी सांगतो.
s-345 वाडवडिलांपासून चालत आलेली ही जमीन.
s-346 ही का मी विकू?
s-347 आईला का कोणी विकतो?
s-348 राहू द्या एवढी जमीन.
s-349 पोटापुरे ती देते.
s-350 मुलेबाळे तेथे येतात, खपतात, खेळतात.
s-351 'सत्तेची जमीन सोडू नये, दादा! ' भीमा म्हणाला.
s-352 'भीमा, जमीन नाही ना देत?'
s-353 'कशी द्यायची?'
s-354 'नाही, त्रिवार नाही!'
s-355 'याद राख!'
s-356 तुझी ही मगरूर वृत्ती तुला मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही.
s-357 माझी गिधाडी दृष्टी तुला भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही!'
s-358 'देव काही मेला नाही, केशवबाबा!'
s-359 देव माझ्या तिजोरीत आहे!
s-360 'माझा देव सर्व जग व्यापून राहिलेला आहे!'
s-361 हे तुझे शेत गेले समज आणि तुला पैही मिळता.
s-362 आज मी तुला तू मागशील ती किंमत द्यायला तयार झालो होतो; परंतु तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे.
s-363 'तू तरी काय करशील?'
s-364 असे धमकीचे भाषण करून केशवचंद्र निघून गेले.
s-365 शेतातील विहिरीच्या काठी भीमा बसला होता.
s-366 त्याचे ते लहानसे शेत; परंतु खरेच सोने पिकवी.
s-367 भीमाच्या वाडवडिलांच्या हातची तेथे झाडे होती.
s-368 त्यानेही दोन-चार कलमे लावली होती.
s-369 विहिरीच्या कडेला फुलझाडे होती.
s-370 पलीकडे त्याचा लहानसा गोठा होता.
s-371 भीमाचा शब्द ऐकताच गोठ्यातील गाय हंबरायची.
s-372 खरोखरच त्या शेतावर भीमाचे जीव की प्राण प्रेम होते.

Text viewDownload CoNNL-U