Dependency Tree

Universal Dependencies - Marathi - UFAL

LanguageMarathi
ProjectUFAL
Corpus Parttrain

Select a sentence

Showing 101 - 200 of 372 • previousnext

s-101 दुसरी दोन विकावी लागली नाहीत.
s-102 त्यांनी राजवाडा खरेदी केली, नोकरचाकर ठेवले.
s-103 राजवाडा शृंगारला गेला.
s-104 चांदी-सोन्याची भांडी होती.
s-105 त्या दोघा भावांनी घोडेस्वार तैनातीस ठेवले आणि हत्ती सजविला.
s-106 त्याच्यावर अंबारी ठेवण्यात आली.
s-107 आली सारी मंडळी वनात.
s-108 राजपुत्र अंबारीत बसला.
s-109 बहीण एका पालखीत बसली.
s-110 दोन भाऊ दोन उमद्या घोड्यांवर बसले.
s-111 मिरवणूक निघाली, शहरात आली.
s-112 दुतर्फा लोक बघत होते.
s-113 घरांतून , गच्चीतून लोक बघत होते.
s-114 राजपुत्र राजवाड्यात उतरला.
s-115 तेथील जीवन सुरू झाले.
s-116 राजाच्या कानावर वार्ता गेली.
s-117 राजाचा एक खुशमस्कऱ्या होता.
s-118 राजाने त्याला विचारले, कोण आला आहे राजपुत्र?
s-119 मी बातमी काढून आणतो, तो म्हणाला.
s-120 खुशमस्कऱ्या राजपुत्राकडे गेला.
s-121 पहारेकऱ्यांनी त्याला हटकले.
s-122 तो म्हणाला, मी येथल्या राजाची करमणूक करणारा.
s-123 तुमच्या राजपुत्राची करमणूक करायला आलो आहे.
s-124 नोकराने राजपुत्राला जाऊन विचारले.
s-125 पाठवा त्याला, राजपुत्र म्हणाला.
s-126 खुषमस्कऱ्या आला.
s-127 राजपुत्राची तो करमणूक करू लागला.
s-128 तो तेथील हास्यविनोद ऐकून त्याची बहीणही आली.
s-129 थोड्या वेळाने खुशमस्कऱ्या जायला निघाला.
s-130 येत जा! राजपुत्र म्हणाला.
s-131 राजाने येऊ दिले तर! तो म्हणाला.
s-132 खुशमस्कऱ्या राजाकडे गेला म्हणाला, राजा, राजा, त्या राजपुत्राची बहीण फार सुंदर आहे.
s-133 ती तुम्हालाच शोभेल.
s-134 तुम्ही तिच्यासाठी मागणी करा!
s-135 ठीक आहे, राजा म्हणाला.
s-136 दुसऱ्या दिवशी राजाने राजपुत्राला बोलावणे धाडले.
s-137 राजपुत्र आला, आसनावर बसला.
s-138 कुशल प्रश्न झाल्यावर राजा म्हणाला, तुमची पत्नी फार लावण्यवती आहे असे ऐकतो.
s-139 ती माझी बहीण!
s-140 ती माझी राणी होऊ दे!
s-141 मी तिला विचारीन!
s-142 कळवा मला काय ते!
s-143 राजपुत्र माघारी आला.
s-144 त्याने बहिणीला सारी हकीगत सांगितली.
s-145 ती म्हणाली, राजाला सांग मी व्रती आहे.
s-146 मी कोणाची राणी होऊ शकत नाही!
s-147 राजपुत्राने राजाला त्याप्रमाणे सांगितले आणि तो परत आला.
s-148 राजा विचार करू लागला.
s-149 इतक्यात तो खुशमस्कऱ्या आला.
s-150 काय उपाय? राजाने विचारले.
s-151 त्याला म्हणावे, तुझी बहीण तरी दे, नाहीतर रात्री पायी चाळीस कोस चालत जा त्या अंधाऱ्या दरीतील पांढरी फुले घेऊन उजाडत हजर हो, नाहीतर डोके उडवण्यात येईल!
s-152 राजपुत्राला निरोप कळविण्यात आला.
s-153 तो रडत बसला.
s-154 बहीण येऊन म्हणाली, दादा, का रडतोस?
s-155 त्याने तो वृत्तान्त सांगितला.
s-156 ती म्हणाली, गावाबाहेर जाऊन दोन कोसांवर बसून राहा.
s-157 चिंता नको करूस!
s-158 राजपुत्र पायी निघाला जाऊन बसला.
s-159 बहीण घरातून बाहेर पडली आणि शहराबाहेर पडल्यावरती हरिणी बनली.
s-160 वाऱ्याप्रमाणे ती पळत सुटली.
s-161 अंधाऱ्या दरीतील पांढरी फुले तिने तोडली.
s-162 ती फुले दातात धरून सूर्योदयाच्या आत ती आली.
s-163 पुन्हा बहीण बनून राजपुत्राजवळ ती फुले देऊन ती म्हणाली, जा, राजाला ही नेऊन दे!
s-164 राजपुत्राने ताऱ्याप्रमाणे चमकणारी फुले राजाला नेऊन दिली.
s-165 निरोप घेऊन तो परत घरी आला.
s-166 राजा खुशमस्कऱ्याला म्हणाला, आता कोणता उपाय?
s-167 त्याला सांगा कि, बहीण तरी दे किंवा मागील राणीची समुद्रात पडलेली नथ आणून दे, नाहीतर डोके उडवीन! खुशमस्कऱ्याने सुचविले.
s-168 राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली.
s-169 राजपुत्र रडत बसला.
s-170 एक भाऊ येऊन म्हणाला, दादा, का रडतोस?
s-171 रडू नकोस, दादा.
s-172 शहराबाहेर जाऊन बस.
s-173 चिंता नको करूस!
s-174 राजपुत्र शहराबाहेर जाऊन बसला.
s-175 तो भाऊही बाहेर गेला आणि तो बेडूक बनला.
s-176 डराव, डराव करून त्याने बेडकांना हाका मारल्या.
s-177 लाखो बेडूक जमा झाले.
s-178 तो त्यांना म्हणाला, त्या राजपुत्राने माझा प्राण वाचविला आहे.
s-179 आपण त्याच्यासाठी काही करूया.
s-180 आपण समुद्रात रात्रभर पुन्हा बुड्या मारू.
s-181 मिळतील ते मोती तोंडात धरून आणू, राजाच्या अंगणात ढीग घालू!
s-182 साऱ्या बेडकांनी ऐकले आणि त्याप्रमाणे त्यांनी केले.
s-183 राजाच्या दारात झळाळणाऱ्या मोत्यांचे ढीग पडले.
s-184 भाऊ राजपुत्राकडे येऊन म्हणाला, राजाला अंगणातील मोत्यांपैकी राणीच्या नथीचे मोती निवडून घ्यायला सांग.
s-185 लाटांनी नथ मोडली.
s-186 मोती अलग झाले.
s-187 घ्या म्हणावे ओळखून!
s-188 राजपुत्र राजाला तसे सांगून आपल्या राजवाड्यात परत आला.
s-189 राजाने खुशमस्कऱ्याला विचारले, आता काय?
s-190 तो स्वर्गात कसा जाणार?
s-191 तुमच्या वडिलांना मेल्यावर सरणावर घालून स्वर्गात पाठविले.
s-192 त्याच रस्त्याने राजपुत्राला पाठवू!
s-193 राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली.
s-194 राजपुत्र सचिंत होऊन बसला.
s-195 तो दुसरा भाऊ येऊन म्हणाला, दादा, का दु:खी?
s-196 राजपुत्राने सारी कथा सांगितली.
s-197 रडू नका.
s-198 मी देतो तो रस अंगाला लावा आणि चितेवर निजा.
s-199 तुम्हांला वेदना होणार नाहीत; परंतु जळून तर जाल.
s-200 राजाला सांगून ठेवा, की माझी राख मात्र माझ्या घरी पाठवा!

Text viewDownload CoNNL-U